शिक्षक आणि विद्यार्थी संवाद लेखन मराठी - Shikshak ani Vidyarthi Samvad Lekhan Marathi: विद्यार्थी: सर, या वर्षी सहलीला आपण कुठे जायचं? शिक्षक: विद्यार
शिक्षक आणि विद्यार्थी संवाद लेखन मराठी - Shikshak ani Vidyarthi Samvad Lekhan Marathi
शिक्षक आणि विद्यार्थी संवाद लेखन मराठी
विद्यार्थी: सर, या वर्षी सहलीला आपण कुठे जायचं?
शिक्षक: विद्यार्थ्यांनो, यावेळी सिंहगडावर सहलीला जायचे आहे.
विद्यार्थी: सिंहगड नको सर, दुसरीकडे कुठेतरी सहलीला न्या.
शिक्षक: विद्यार्थ्यांनो तुम्हीच सुचवा चांगल ठिकाण मग.
विद्यार्थी: सर आरे कॉलनी, सर येतूर जंगल, सर एलिफंटा.
शिक्षक: अरे, सर्वांनी गोंधळ घालू नका. एकेकाने सांगा. मग आपण विचार करू व ठरवू. ‘आशा, तुला कोठे सहल जावी असे वाटते?’
विद्यार्थिनी (आशा): सर, आपण पनवेल जवळील कर्नाळा अभयारण्य पहायला जावे असे मला वाटते. त्या ठिकाणी आपल्याला अनेक पशू, पक्षी, प्राणी व वनवाश्यांच्या गमती-जमती पाहता येतील व त्यांच्याशी संवाद साधता येईल.
शिक्षक: विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आवडणार्या ठिकाणाचे नाव कागदावर लिहा. आपण सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करून एक नाव ठरवू.
विद्यार्थी: बरोबर सर, कोणावर ही अन्याय नाही. सगळ्यांना समान संधी.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद लेखन
शिक्षक: मुलांनो तुम्हाला मराठी भाषा बोलायला आवडते का?
विद्यार्थी: हो ती तर आपली मराठी बोलली आहे माय भाषा आहे.
शिक्षक: उत्तम! मला खूप बरे वाटले हे ऐकून आजच्या काळात मराठी भाषेचे महत्त्व खूप कमी होत चाललेले आहे यावर तुम्ही काय भाष्य करू शकता?
विद्यार्थी: सर आपल्याला मराठी भाषेचा अभिमान बाळगायला हवा. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे.
शिक्षक: अगदी बरोबर बोलताय तुम्ही मुलांनो आपली भूमी ही संतांची भूमी आहे थोर संतांनी आपल्या अभंगाद्वारे भारुड द्वारे आपल्याला खूप काही शिकवले आहे.
विद्यार्थी: सर जर मराठी हा विषय शाळेत नसता तर तर आम्हाला या थोर संतांविषयी कधीच माहिती पडले नसते कसे वाचावे कसे लिहावे हे समजले नसते.
शिक्षक: हो खरे आहे, आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांनी या माय भूमी साठी खूप काही केले आहे त्याची आपणास जाण असायला पाहिजे.
विद्यार्थी: राजामुळे आपण या महाराष्ट्रभूमीत ताठ मानेने जगत आहोत ते नसते तर कदाचित आपल्याला या भूमीत गुलाम गिरीची वागणूक मिळाली असती.
शिक्षक: मुलांनो आज-काल सगळ्यांना मराठी पेक्षा इंग्रजी बोलायला जास्त आवडते त्यामुळे मराठी भाषेवरचे प्रभुत्व कमी होत चाललेले दिसते शाळेत सर्व विषय शिकवले जातात पण आपल्या भाषेवर चा पगडा आपण कधी सोडू नये हे नेहमी लक्षात ठेवा.
विद्यार्थी: आम्हीसुद्धा मराठी भाषेवर चे प्रेम असेच कायम ठेवू.
COMMENTS