पुस्तक आणि मोबाईल यांच्यातील संवाद लेखन मराठी - Pustak ani Mobile Samvad Lekhan Marathi: पुस्तक: कारे! का हसत आहेस सांग ना. मोबाईल: तुला का सांगू, तू
पुस्तक आणि मोबाईल यांच्यातील संवाद लेखन मराठी - Pustak ani Mobile Samvad Lekhan Marathi
पुस्तक आणि मोबाईल यांच्यातील संवाद लेखन मराठी
मोबाईल खुप जोर जोरात हसत होता, काही वेळाने पुस्तकाने विचारले
पुस्तक: कारे! का हसत आहेस सांग ना.
मोबाईल: तुला का सांगू, तू पडून रहा ना त्या बॅगेतच.
पुस्तक: अरे कंटाळा आला रे या बॅगेत पडून, मुले आता माझ्या पासून दूर गेलीत अस वाटत रे, म्हणून मी म्हटलं तुझ्याशी बोलावं...
मोबाईल: अरे! असं नाही ते, तू अस बोलू नकोस रे! मी तुझ्याशी मस्करी करत होतो.
पुस्तक: तसं नाही रे खरंच मी खूप कंटाळलोय, पाहिले मुले मला घेऊन वाचत बसायचे, शाळेत घेऊन जायचे, गृहपाठ करायचे आणि आता मला बघतच नाही, दिवसभर तुलाच घेऊन बसतात, तुझ्याशीच खेळतात.
मोबाईल: अरे हो सध्या शाळा बंद असल्याने सध्या मुलं माझा उपयोग अभ्यासासाठी करत आहेत पण तू तर इतिहासापासून रार्वाना शिकवत आलास आणि पुढेही तूच उपयोगात येणार आहेस तर तू वाईट वाटून घेऊ नकोस कारण माझा जास्त उपयोग झाला तर मुलांच्या डोळ्यांना त्रासच होणार आहे तर तू निशिंत रहा.
संवाद लेखन मराठी पुस्तक आणि मोबाईल
मोबाईल: या काळामध्ये सगळेच माझा वापर करतात. कोणी कामासाठी, कोणी अभ्यास करण्यासाठी तर कोणी गेम खेळण्यासाठी. तुला तर सगळे विसरतचं चालले आहेत.
पुस्तक: अरे माझं अस्तित्व तुझ्या पहिले या जगात आले आहे.
मोबाईल: पण आता तर जास्त माझा उपयोग होतो ना! सगळ्या गोष्टींसाठी लोक माझा वापर करत आहेत.
पुस्तक: हो मी मानतो की तुझे पण अस्तित्व या जगात महत्वाचे आहे.
मोबाईल: या काळात माझे अस्तित्व तुझ्याहूनही महत्वाचे झाले आहे.
पुस्तक: पण मोबाईल घेऊन घरबसल्या कोणी डॉक्टर, इंजिनीअर, पोलिस, शिक्षक तर नाही बनत ना..? त्यासाठी अभ्यास करावा लागतो. आणि तुझे अस्तित्व ही माझ्यामुळेच आहे.
मोबाईल: ते कसं काय?
पुस्तक: तुला बनवायला ही सर्वप्रथम माझा अभ्यास करावा लागला होता. तुझ्या मधले ‘अ,ब,क,ड’ असे अक्षर पुस्तकातून मोबाईल मध्ये रूपांतरित करून टायपिंग हा प्रकार आला.
मोबाईल: मला माफ कर! मला वाटले माझे अस्तित्व तुझ्यापेक्षाही महत्वाचे आहे.
पुस्तक: जाऊ दे, तुला समजले ना..
मोबाईल: होय!
पुस्तक: साधू संतांच्या काळापासून तर आतापर्यंत माझा वापर होत आहे आणि ही परंपरा अशीच चालत राहावी अशी मी आशा करतो.
COMMENTS