झोपडी व महाल यांच्यातील संवाद लेखन मराठी - Jhopdi va Mahaal Yanchyateel Samvad Lekhan: झोपडी: मला साधेपणाने राहायला आवडते. चार कुडाच्या भिंती नि जमीन
झोपडी व महाल यांच्यातील संवाद लेखन मराठी - Jhopdi va Mahaal Yanchyateel Samvad Lekhan
झोपडी व महाल यांच्यातील संवाद लेखन मराठी
झोपडी: मला साधेपणाने राहायला आवडते. चार कुडाच्या भिंती नि जमीन हे माझे वैभव आहे.
महाल: तुला दारिद्र्यात राहण्याची आवड आहे का? माझ्याकडे बघ किती नवलाईच्या वस्तू आहेत! माझा श्रीमंती थाटच वेगळा!
झोपडी: मोठेपणाचा बडेजाव काय कामाचा? तू स्वतःला पहाऱ्यात कैद करून घेतोस. माझ्याकडे मुक्त निसर्ग आहे. अंगणात झोपून ताऱ्यांकडे पाहणे किती आनंददायी आहे!
महाल: कसले आनंददायी? तू कोत्या स्वभावाची आहेस. माझ्याकडे झोपण्यासाठी मऊ मऊ गादी आणि झुंबराचा लखलखाट! माझा तोराच वेगळा आहे!
झोपडी: ठीक आहे! पण या सर्व नाशिवंत गोष्टी आहेत. खरे वैभव म्हणजे मनाला वाटणारे सुखसमाधान! माझ्याकडील माणसे आनंदाने व प्रेमाने राहतात. तुझ्याकडे येण्या-जाण्याला कायम 'मज्जाव' असतो आणि चोऱ्यांची कायम मनात भीती!!
महाल: हो ग ताई, याचा विचारच नव्हता मी केला!
झोपडी: हरकत नाही. शेवटी माणसांना निवारा देणे हे आपले काम, ते आपण चोख करूया. बडेजाव काय कामाचा?
महाल: खरे आहे तुझे म्हणणे. मी आता तू सांगितलेस त्या मूल्यांचेच आचरण करीन.
झोपडी व महाल मराठी संवाद लेखन मराठी
झोपडी: तू किती मोठी आणि मी लहान !
महाल: हो ग खर आहे तुझं. पण बघ ना ! मी फक्त आकाराने मोठा आहे. तुझ्यात राहणारी माणसं मनाने किती मोठी आहेत. किती आनंदी जीवन जगतात ते.
झोपडी: तुझे म्हणणे खरंच बरोबर आहे.
महाल: नुसता वरवरचा दिखाऊपणा काय कामाचा ?
झोपडी: हो माझ्या घरी येण्यास कोणालाही अटकाव नसतो.
महाल: आणि माझ्या घरात येण्यास परवानगी घ्यावी लागते.
झोपडी: माझ्या घरात ना तिजोरी ना कुलूप.
महाल: पण माझ्या दारात पहारेकरी.
झोपडी: माझ्या घरात निसर्गाचे सानिध्य.
महाल: माझ्या घरात कृत्रिमतेचा वास.
झोपडी: माझ्या घरात समाधानी माणसं.
महाल: हो रे बाबा तुझं बरोबर. माझा फक्त डोल मोठा पण खर्या अर्थाने मोठी तर तूच आहेस.
COMMENTS