झाड व झोका संवाद लेखन मराठी - Jhad va Jhoka Samvad Lekhan Marathi- झोका: तुझ्या फांदीला बघ झुला मी बांधला. झाड: पण माझी फांदी म्हणजेच आहे एक झुला.
झाड व झोका संवाद लेखन मराठी - Jhad va Jhoka Samvad Lekhan Marathi
झाड व झोका संवाद लेखन मराठी
झोका: तुझ्या फांदीला बघ झुला मी बांधला.
झाड: पण माझी फांदी म्हणजेच आहे एक झुला.
झोका: खाली-वर, वर-खाली मी झोकात किती झुलतो !
झाड: अरे, पण माझ्यामुळेच तू इतका खुलतो !
झोका : मागे-पुढे आहे माझी ठेक्यावरती लय.
झाड : मी नसेन तर होईल तुझा लगेचच विलय.
झोका : तू तर आहेस एका जागी पूर्ण गाडलेला.
झाड : मी घट्ट आहे मातीत म्हणूनच तुझा झोका वाढलेला.
झोका : तू एका जागी स्थिर, बघ मी किती गतिमान !
झाड : नको धरूस फुकटचा हा व्यर्थ अभिमान !
झोका : तू येतोस का झुल्यावर? येईल तुला मजा.
झाड : मी जर हललो जागेवरून तर तुलाच होईल सजा.
झोका : नको, नको रे झाडा! तू तर माझा मोठा भाऊ !
झाड : आरामात झोके घे तू; आपण दोघे सुखात राहू!
झोका व झाड या दोघांमधील संवाद खालीलप्रमाणे
झोका: झाडदादा, बघ ना झोके घेताना किती मज्जा येते!
झाड: तू मजेत आहे हे बघून मलाही आनंद मिळतो.
झोका: मी तर तुझ्याच खांद्यावर खेळतो.
झाड: अरे, तुझ्याप्रमाणेच अनेक पक्षी माझ्या अंगाखांद्यावर खेळतात, बागडतात.
झोका: होय रे, त्या वेळी किती छान दिसतोस तू!
झाड: जेव्हा मूलं तुझ्यासोबत झोके घेतात, तेव्हा किती हर्षभरीत होतोस तू!
झोका: तेच आपलं जीवन नाही का?
झाड: खरं आहे रे. दमला भागला वाटसरु माझ्याकडे येतो, तेव्हा मी त्याच्यावर सावली धरतो.
झोका: हेच ते, हेच ते. तू पाहतोस ना हल्ली पावसातही मुले झुंडीने येतात माझ्याकडे.
झाड: त्या वेळी वरून पाऊस बरसत असतो आणि तुझ्या मनात आनंद बरसत असतो.
झोका: खूप धमाल येते रे!
झाड: हेच आपले सवंगडी! हेच आपले नातेवाईक!
झोका: खरंय रे, ते आपल्या साथीने आनंद मिळवतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो.
झाड: सगळेजण असेच आनंदात राहू दे.
संवाद लेखन मराठी झाड व झोका
झोका : झाडा मला एक गोष्ट सांग; तुला माझा त्रास नाही का रे होत?
झाड : कसला त्रास रे?
झोका : अरे म्हणजे मी तुझ्या एका खांद्याला लटकलेला असतो सदानकदा, तुझा खांदा (फांदी) दुखत नाही का रे?
झाड : (हासते) नाही रे बाबा. नाही दुखत.
झोका : नाही नाही असं शक्यच नाही. असं कसं नाही दुखत? माझं वजन आणि तुला बांधलेले दोर त्यामुळे तुझी चिडचिड होत असेल ना? काढून फेकून द्यावं वाटत असेल ना तुला?
झाड : (पुन्हा हासते) बरं मला एक सांग तुझ्यावर किती मुली मुले बसून झोका घेतात. कधीकधी दोघे दोघे जण मिळून तुझ्या अंगावर चढतात आणि झोका घेतात...
झोका : (झाडाचे बोलणे मधेच थांबवत) हो ना ते पण आहे म्हणजे माझ्या वजनासोबत तूला त्यांचंपण वजन पेलावं लागतं.
झाड : हो रे बाबा ते सर्व मान्य पण एक सांग अगदी खरंखरं..
झोका : काय?
झाड : जेव्हा लहान लहान मुलं तुझ्यावर झोके घेतात आणि आनंदानी सुखावून जातात, टाळ्या वाजवतात; तेव्हा तुला कसं वाटतं? राग येतो काsss त्यांचा?
झोका : अरे नाही. अजिबात नाही. उलट मला खूप आनंद होतो. त्यांचे हसरे चेहरे पाहून माझा दिवस छान जातो. एखाद्या दिवशी ती मुले नाही आली कि मला रुखरुख वाटते.
झाड : (स्मित करून) पहा बारं तू त्यांचं वजन पेलतो, तुझ्या अंगाखांद्यावर ती बसतात, उभे राहतात तरी तुला ती मुलं प्रिया आहेत, तसंच माझं पण आहे. मला पण खूप आनंद होतो आणि त्रास असा काही जाणवतंच नाही, तो कुठच्या कुठं पळून जातो. आणि ती मुलं नसली तरी तू माझा सोबती; तुझा कसला रे त्रास मला.
झोका : (स्मित करून) हममम असे आहे तर!
झाड : हो माझ्या संख्या! (आणि दोघे एकमेकांशी गळाभेट घेतात.)
COMMENTS