झाड व माणूस संवाद लेखन मराठी - Jhad ani Manus Samvad Lekhan Marathi: झाड: हाय, माझ्या प्रिय बुद्धिवान माणसा कसा आहेस? माणूस: मजेत. झाड: हं.. तू मजेतच
झाड व माणूस संवाद लेखन मराठी - Jhad ani Manus Samvad Lekhan Marathi
झाड व माणूस संवाद लेखन मराठी
झाड: हाय, माझ्या प्रिय बुद्धिवान माणसा कसा आहेस?
माणूस: मजेत.
झाड: हं.. तू मजेतच असणार माझे उपकार आहे ना तुझ्यावर.
माणूस: कसले उपकार ?
झाड: माझ सेवा केंद्र चालू असत ना 24*7 ऑक्सिजन देण्याच त्यामुळे.
माणूस: हो बरोबर.
झाड: अरे आजपर्यंतचे ठिक आहे पण, उदयाच काय ?
माणुस: उदयाच काय म्हणजे समजल नाही बुवा...
झाड: हे बघ आता होळी येतेय, म्हणजे तू मला मारणार माझे तुकडे तुकडे करणार, माझा भोवती आगीचा वणवा लावणार आणि माझे अस्तित्व नष्ट करणार.
माणूस: हो . ( माणूस विचारात पडलाय - अरे बापरे उद्यापासून जगायची चिंता आहे पण सण सुद्धा साजरा करायचा आहे काय करावे)
झाड: काय रे काय विचार करतोय ?
माणूस: काही नाही झाड महाराज सण कसा साजरा करायचा आणि जगायच कस प्रश्न पडला आहे.
झाड: पडला ना प्रश्न, म्हणजे बघ मला मारलस तर तुझा ऑक्सिजन नष्ट होइल आणि तुलाही माझ्यासारख जाळाव लागेल. खुप विचार कर.
माणूस: झाड महाराज आम्ही तस काही करणार नाही. आम्ही सारे आमचा मनातील दृष्ट , वाईट विचारांची होळी करु.
झाड: हं... समजल ना माझाशी टक्कर केली तर तूझा विनाष होइल.
आणि हे बघ मला जाळशील म्हणजे पुन्हा प्रदुषण आणि oxygen चा नाश. त्या पेक्षा इतर लोकांच्या मनात चांगले विचार रुजव एकोप्याने रहा.
स्वस्थ रहा... मस्त जगा...आनंदी रहा
झाड आणि माणूस मध्ये संवाद लेखन मराठी
मे महिन्याची एक दुपार असते. एक माणूस (राम) त्याचे काम करून चालत घरी परतत असतो. चारी बाजूला कोरडी जमीन असते, तेवढ्यात त्या मोठ्या शेता मध्ये त्याला दिसते एक भव्य झाड.
तो त्या झाडाखाली जातो व बसतो.
झाड: अरे बापरे! एवढ्या दुपारच्या वेळेला कोण आलं आहे ?
राम: मी राम, झाड तू बोलू शकतो ? खूप आश्चर्याची गोष्ट आहे!
झाड: हो बाबा, कधी कधी मी बोलते.
राम: ह्या येवढ्या मोठ्या शेतात फक्त तू एकटाच आहेस, असे मला दिसले म्हणून सावली चा आनंद घेण्यासाठी मी खाली बसलो आहे.
झाड: तुला मी आता काय सांगू ?
इकडची लोक खूप क्रूर आहेत, ह्या शेतात त्यांना एक मोठा मॉल बांधायचा आहे म्हणून माझ्या सगळ्या मित्रांना त्यांनी मारून/कापून टाकले.
माझा बुंदा रुंद असल्याने मला ती लोकं कापू नाही शकले.
राम: अरे बापरे खूप विचित्र प्रसंग आहे, थांब मी पलिके कडे तक्रारच करतो.
माणूस व झाड एकमेकांशी बोलत आहेत अशी कल्पना करून त्यांच्यातील संवाद खालील दिले आहे.
माणूस - अहो, वृक्ष दादा अशा शांत का बसले आहात?
झाड - मला रडू येत आहे, मला काहीही करायला आवडत नाही.
माणूस - काय झालं, अस का बोलता तुम्ही .
झाड - मग काय करू, तुम्ही माणसांने माझे सर्व झाड मित्राना तोड़ून दिले , आपले घर बांधणयासाठी, मोठया मोठया बिल्डिंगे बनवितात तुम्ही लोक .
माणूस - हो, माहित आहे, जनसंख्या वाढ़ली म्हणून माणसांना हे सर्व करावे लागले पण तुम्ही काळजी घेऊ नका, आम्ही संकल्पना केली आहे " झाड लावा, झाड जगवा" . माझे मित्र ही मझ्याशी सहयोग करतात .
झाड - खरच ! अस करणार तुम्ही लोक.
माणूस - हो, झाड वाचवा असा अभियान देश भरात चालला आहे .
झाड - मला खूप आनंद झाला हे ऐकून , तू किती चांगला आहे, सर्व माणूस का नाही तुझ्या सारखे ?
माणूस - आता सर्वाना तुमचे महत्व कळले आहे, असे कोणी करणार नाही, मी खात्री देतो तुम्हाला .
COMMENTS