दोन मित्रांमधील संवाद लेखन मराठी - Dialogue Writing Between Two friends in Marathi: सूरज - गुड मॉर्निंग, राजन. कुठे जात आहात? राजन- गुड मॉर्निंग, मी
दोन मित्रांमधील संवाद लेखन मराठी - Dialogue Writing Between Two friends in Marathi
दोन मित्रांमधील संवाद लेखन मराठी
सूरज - गुड मॉर्निंग, राजन. कुठे जात आहात?
राजन- गुड मॉर्निंग, मी बाजाराला जात आहे.
सूरज- तू खुश दिसत आहेस, काय खरेदी करणार आहेस?
राजन- मी पतंग खरेदी करणार आहे. माझ्याकडे 50 रुपये आहेत.
सूरज- तू तुझ्या अख्ख्या पैशाने पतंग विकत घेणार आहेस का?
राजन- हो उद्या बसंत आहे.
सूरज- मला वाटतं आपण पतंग उडवू नये.
राजन- मला यात काही नुकसान दिसत नाही.
सूरज- आपण हायस्कूलमध्ये शिकतो, आपण उदाहरणे मांडली पाहिजेत. पतंग उडवणे हानिकारक आहे.
राजन- आमच्या शिक्षकानेही तेच सांगितले.
सूरज- तुम्ही तुमचे पैसे आणि वेळ वाया घालवाल.
राजन- पण ते एका दिवसासाठी असेल.
सूरज- आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितले की आम्ही वेळ आणि पैसा वाया घालवू नका.
राजन- ठीक आहे, मग मी पतंग उडवणार नाही.
दोन मित्रांमध्ये संवाद लेखन मराठी
राजू : आपल्या फळ्यावरची सूचना वाचली का ?
संजू : हो वाचली नं आणि मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे. मी नावही दिलंय. अरे तू येतोस नं ?
राजू : हे काय विचारणं झालं? माझी तर खूप दिवसांपासून तयारी सुरु आहे.
संजू : तयारी ? अन् ती कशी काय ?
राजू : अरे! ती सूचना तर आता आली व आत्ता सर्वांना कळले; पण माझी तयारी आधीच झाली.
संजू : कोणती तयारी केलीस रे तू?
राजू : जंगलतोड आणि त्याचे परिणाम हे वारंवार ऐकून माझ्या मनावर इतका परिणाम झाला, की झाड आपणच लावायची असा मी निश्चयच केला. मी खूप रोपे तयार केली. अनेक झाडांच्या बिया गोळा करून ठेवल्यात.
संजू : वा राजू तू छान तयारी केली. मी तुला हे करायला मदत करीनच; पण माझ्याजवळसुद्धा जेवढ्या बिया आहेत त्या मी घेऊन येणार आहे.
राज् : आपण दोघे मिळून आपल्या परिसरात सुद्धा त्यादिवशी काही झाडं लावू.
संजू : राजू मला तुझा मित्र असल्याचा अभिमान वाटतो, कारण तू सूद्धा माझ्यासारखाच वृक्षप्रेमी आहेस.
वरील संवादाचा मजकूर केवळ नमुना आहे. दिलेल्या विषयावर विद्यार्थ्यांनी अधिक प्रभावी संवादलेखन करावे.
दोन मैत्रिणी मधील संवाद लेखन मराठी
अनुराग - अरे दिनू! कालच आपला दहावीचा निकाल लागला ना? मग चल पुढील शिक्षणासाठी आपण कॉलेजचा फॉर्म आणायला जाऊया. मी निघालोय तू पण येतोस ना?
विलास - नाही रे अभय. तू जा मी नाही येत.
अनुराग - अरे पण का? काही अडचण आहे का?
विलास - अरे मी आता पुढील शिक्षण न घेण्याचे ठरविले आहे. मला काही तरी कामधंदा करायचा आहे.
अनुराग - काय? तू पुढील शिक्षण घेणार नाहीस? अरे पण तुला तर आपल्या सर्व मित्रांमध्ये सर्वत्र जास्त गुण मिळाले आहेत. मग तू असे का म्हणतोस?
विलास - मला माझ्या वडिलांना घरखर्चात मदत करायची आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.
अनुराग - ऐक राजू! तुझे बोलले मला पटले आहे तरीही माझ्या मते तू कॉलेजचे शिक्षण घेत घेत एखादे काम ही करू शकतोस. म्हणजेच तुझे शिक्षणाचे नुकसान ही होणार नाही.
दिवाकर - पण माझा अभ्यास बुडाला तर तो कसा काय कळेल मला?
अनुराग - अरे मित्रा! आम्ही तुझे मित्र आहोत ना? आम्ही तुला तुझ्या बुडलेल्या अभ्यासात मदत करू. जेणेकरून तू शिकू ही शकशील आणि तुझ्या घरच्यांना घरखर्चात मदत ही करू शकशील.
दिवाकर - पण हे सगळे खरंच जमेल का मला?
अनुराग - का नाही जमणार तुला? तू हुशार आहेस, मेहनती आहेस आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच तुला तुझ्या घरची परिस्थिती बदलायची आहे. बरोबर ना?
दिवाकर - हो बरोबर.
विलास - मग ऐक मित्रा! शिक्षणामुळेच तू तुझ्या घरची आर्थिक परिस्थिती बदलू शकतोस. चांगले शिक्षण घेतलेस तर पूढे जाऊन तुला चांगली नोकरी मिळेल व हळू हळू कुटुंबाची आर्थिक जबाबदारी तू निर्धास्तपणे घेऊ शकशील व तुझ्या वडिलांना आराम मिळेल.
दिवाकर - मला तुझे म्हणणे पटले आहे दिनू. आता मला शिक्षणाचे महत्व चांगले कळले आहे. मला जर माझ्या कुटुंबासाठी काही हातभार लावायचा असेल तर आता शिक्षण अर्धवट सोडून मी छोटी मोठी कामे करून चालणार नाही. त्यापेक्षा मी शिक्षणाचा आधार घेऊन माझे भवितव्य सुधारु शकेन.
अनुराग - चल तर मग कॉलेजला प्रवेश घेऊया.
दिवाकर - धन्यवाद मित्रा. चल.
Dialogue Writing Between Two friends in Marathi
दुर्गेश: अरे विजय, कसा आहेस?
विक्रम: संजय, मी ठीक आहे! तू कसा आहेस?
दुर्गेश: मी पण ठीक आहे! पण तू शाळेत यायला नेहमी उशीर का करतोस? जर तू दररोज इतका उशीरा आलास, तर तु अडचणीत येशील.
विक्रम: हो रे, तुझं म्हणणं बरोबर आहे. खरचं, मी नेहमी वेळेवर यायचा प्रयत्न करतो, पण मला शक्य होत नाही.
दुर्गेश: का नाही शक्य होत तुला? तू सकाळी किती वाजता उठतोस?
विक्रम: मी सहसा सकाळी ९ वाजता उठतो. खरं तर, मी रात्री उशीरा पर्यंत टीव्ही पाहत असतो, आणि मग झोपायला उशीर होतो.
दुर्गेश: अरे आपण लवकर उठले पाहिजे आणि लवकर उठण्याचे फायदे मिळवले पाहिजेत. तुला ही म्हण माहीत नाही का? “लवकर झोपणे आणि लवकर उठणे माणसाला निरोगी, श्रीमंत आणि शहाणा बनवते!”
विक्रम: चल! या सगळ्या गोष्टींवर तुझा विश्वास आहे?
दुर्गेश: होय नक्कीच!
विक्रम: बर! सांग मग लवकर उठण्याचे काय फायदे आहेत?
दुर्गेश: म्हणीप्रमाणे, ते आपल्याला निरोगी, श्रीमंत आणि शहाणे बनवते.
विक्रम: पण मला शाळेसाठी वक्तशीर होण्यास याची कशी मदत होईल?
दुर्गेश: जर तु सकाळी लवकर उठलास तर, तुला नाश्ता करायला, गृहपाठ करायला भरपूर वेळ मिळेल. त्यानंतर तुझी आंघोळ करून शाळेसाठी तयार होऊ शकतोस आणि वेळेपूर्वी आधी पोहचू शकतोस.
विक्रम: हो रे तुझे बरोबर आहे. सकाळी लवकर उठून मी माझ्या वेळेचा अजूनही सदुपयोग करू शकतो. आणि मी सकाळी नदी किनारी फेर फटका मारायलाही जाऊ शकतो, खर तर मला आवडते ते!
दुर्गेश: नक्कीच! सकाळी लवकर उठले तर मन आणि शरीर ताजेतवाने राहते.
विक्रम: होऊ, तुझे म्हणणे बरोबर आहे. मी अंधारात होतो. रात्री उशीरा झोपण्यापेक्षा मी लवकर झोपत जाईन, आणि सकाळी लवकर उठत जाईन.
दुर्गेश: हा निच्छितच छान निर्णय आहे. उद्या आपण दोघे जाऊयात, नदीकाठी फेरफटका मारायला.
विक्रम: होय नक्कीच, मी तुला उद्या सकाळी भेटेन.
COMMENTS