डॉक्टर आणि पेशंट संवाद लेखन मराठी - Doctor and Patient Samvad Lekhan Marathi: पेशंट: नमस्कार डॉक्टर साहेब, डॉक्टर: नमस्कार या बसा तुमचे नाव काय आहे आण
डॉक्टर आणि पेशंट संवाद लेखन मराठी - Doctor and Patient Samvad Lekhan Marathi
डॉक्टर आणि पेशंट संवाद लेखन मराठी
पेशंट: नमस्कार डॉक्टर साहेब
डॉक्टर: नमस्कार या बसा तुमचे नाव काय आहे आणि वय किती आहे सांगा.
पेशंट: माझे नाव रामदास आहे मी 24 वर्षाचा आहे.
डॉक्टर : सांगा बघू तुम्हाला काय त्रास आहे तुम्हाला कसं वाटतंय.
पेशंट: साहेब मला तीन चार दिवसापासून माझे अंग गरम वाटत आहे आणि सोबतच पूर्ण शरीरामध्ये दुखणं वाटत आहे आणि पोट पण दुखत आहे.
डॉक्टर: बर बर याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय वाटत ते मला सांगा
पेशंट: आणखी हो साहेब मला थोडा अशक्तपणा पण वाटत आहे आणि थोडा खोकला पण वाटत आहे.
डॉक्टर: रामदास तुम्हाला असे वाटण्या अगोदर तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेले होते का ? आणि तुम्ही काही बाहेरचे पदार्थ खाल्ले होते काय?
पेशंट: हो साहेब माझे मार्केटिंगचे गावात असल्याने बाहेर गावी मला सतत फिरावे लागते म्हणून मी बाहेर गावी गेलो होतो. आणि बाहेर तेथे मी वाटेत एका हॉटेलमध्ये जेवण केले होते.
डॉक्टर: बरं हे थर्मामीटर घ्या आणि चेक करून थर्मामीटर वरील मला आकडा सांगा आणि मी एक रक्ताची चाचणी लिहून देतो ते तुम्ही करून मला लगेच दाखवा.
पेशंट: हो साहेब
(पेशंट रक्ताची चाचणी केल्यानंतर)
पेशंट: हे घ्या डॉक्टर साहेब रिपोर्ट आत्ताच आलो मी करून
डॉक्टर: घाबरण्याचे काही कारण नाही तुम्हाला साधा ताप आलेला आहे कारण अति झेरॉक्स सुरू आहे मी काही औषधं लिहून देतो ते तुम्ही वेळेवर घ्या आणि सोबत गरम पाणी प्या आणि बाहेरचं जेवण टाळा. आणि एवढ्या औषध संपल्यानंतर मला एकदा दाखवण्याकरिता या
पेशंट :ठीक आहे डॉक्टर साहेब येतो मग
डॉक्टर :या धन्यवाद
डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधील संवाद लेखन मराठी
पेशंट: डॉक्टर, काल रात्रीपासून मला थोडा ताप आहे.
डॉक्टर: तुम्हाला थंडी वाजत नाहीये ना?
पेशंट: थोडीशी थंडीही जाणवते, पण संपूर्ण शरीर दुखत आहे.
डॉक्टर: तुम्हालाही शिंक येत आहे का?
पेशंट: सकाळी चार-पाच शिंका आल्या.
डॉक्टर: पोट खराब होत नाही का?
पेशंट: होय, डॉक्टर! आज पोट साफ नाही.
डॉक्टर: (प्रिस्क्रिप्शन हातात देत) ही औषधे घ्या. दोन दिवस औषध. दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा चार तासांच्या अंतराने घ्याव्यात. झोपताना एक गोळी दुधासोबत घ्यावी.
पेशंट: टाळण्यासारखे काही आहे का?
डॉक्टर: जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा. तुम्ही खिचडीसारखे हलके पदार्थ खाऊ शकता.
पेशंट: डॉक्टर, किती पैसे देऊ?
डॉक्टर: पन्नास रुपये.
पेशंट: इथे जा, धन्यवाद.
COMMENTS