ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर मराठी माहिती - Shridhar Venkatesh Ketkar Information in Marathi ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या थो
ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर मराठी माहिती - Shridhar Venkatesh Ketkar Information in Marathi
ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर मराठी माहिती - ज्ञानकोश संपादून महाराष्ट्राला अशी कामे करता येतात ही श्रद्धा त्यांनी दिली. शब्दकोश, चरित्रकोश, धर्मकोश, व्यायामकोश असे विविध कोशवाङ्मय मराठीत निर्माण झाले, होत आहे, याची स्फूर्ती ज्ञानकोशप्रकारांनी दिली. ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या थोर स्मृतीला पूज्यभावाने प्रणाम करणे हे महाराष्ट्रीयांचे कर्तव्य आहे.
डॉ. केतकर यांची महाराष्ट्रीयास आठवण आहे का? केवढी विद्वत्ता, केवढे धैर्य! त्यांच्या स्मृतीस प्रणाम करू या. ज्ञानकोश संपादून महाराष्ट्राला अशी कामे करता येतात ही श्रद्धा त्यांनी दिली. शब्दकोश, चरित्रकोश, धर्मकोश, व्यायामकोश असे विविध कोशवाङ्मय मराठीत निर्माण झाले, होत आहे, याची स्फूर्ती ज्ञानकोशप्रकारांनी दिली.
ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या थोर स्मृतीला पूज्यभावाने प्रणाम करणे हे महाराष्ट्रीयांचे कर्तव्य आहे. ज्ञानकोशकार केतकरांनी मराठीत एक नवीन युग निर्मिले. अमेरिकेत "हिंदुधर्मातील जाती" या विषयावर निबंध लिहून त्यांनी डॉक्टर पदवी मिळविली. ते हिंदस्थानात आले. त्यांच्या डोळ्यासमोर मराठी ज्ञानकोशाची भव्य कल्पना उभी राहिली. शंभर-शंभर रुपयांचे भांडवल त्यांनी उभारले. शंभर रुपये भरणारास ज्ञानकोशाचे सर्व भाग मिळणार होते. याशंभराची किंमत पुढे अर्थात वाढली. प्रथम नागपूरला हे मंडळ काम करू लागले. पुढे पुण्यास आले आणि तेथेच हे भगीरथ कार्य त्यांनी अनेकांच्या सहकार्याने पुरे केले. त्या कार्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. सरकारने पाठिंबा दिला नव्हता. डॉक्टर केतकरांच्या निष्ठेने हे काम पार पाडले.
ज्ञानकोशाचे पहिले पाच प्रस्तावना खंड अपूर्व आहेत. तसाच हिंदुस्थानच्या इतिहासाचा शेवटचा एक खास भागही महत्त्वाचा आहे. ज्ञानकोशाचे प्रस्तावना खंड बाहेर पडू लागले. त्यांचा महाराष्ट्रात अभ्यास व्हावा अशी डॉक्टरांची इच्छा. त्यांनी त्या भागांची परीक्षा ठेवली. मी पहिल्या भागाच्या परीक्षेसाठी बसलो होतो. निम्मे बक्षीस मिळाले. ते घ्यावयास मी त्यांच्याकडे गेलो होतो. मी ते बक्षीस ज्ञानकोश घेण्यासाठी खर्च करायचे ठरविले. डॉक्टर मला म्हणाले, "तुम्ही ज्ञानकोशाचे महाराष्ट्रात प्रचारक व्हा." मी म्हटले, "मी मुखदुर्बळ मनुष्य. कोणाला आग्रहाने सांगणे जमत नाही." ते म्हणाले, “अमेरिकेत जाण्यापूर्वी मी असाच होतो; परंतु आता संकोच सारा गेला. भीड गेली." त्यावेळची त्यांची मुद्रा अजून डोळ्यासमोर आहे. ते अपार काम करीत. ज्ञानकोशाचे खंड गड्याच्या डोक्यावर देऊन दादर वगैरे भागात जाऊन ते खपविण्यासाठी खटपट करीत. ते नेहमी म्हणायचे. "भरपूर पगार घ्या. भरपूर काम करा. आमचे प्राध्यापक कमी पगार घेऊन त्याग दाखवू बघतात; परंतु ज्ञानाच्या सीमा वाढवतील तर शपथ."
मी त्यांना पुण्यात खाली सूटबूट, तर वर पगडी असे पाहिले आहे. कधी हरदासी अंगरखा घातलेले पाहिले आहे. एखाद्या हॉटेलमध्ये जातील. चिवडा, शंकरपाळे खातील, लकडी पुलाजवळ करवंदे खात उभे असलेले मी त्यांना पाहिले आहे. औपचारिकपणा, फाजील शिष्टाचार त्यांना आवडत नसावा.
त्यांच्या कादंबऱ्या त्यांच्या विशाल अनुभवातून जन्मलेल्या आहेत. नाना धर्माचे, नाना जातिजमातीचे, नाना देशांचे, नाना प्रांतांचे त्यांचे मार्मिक परीक्षण. ते सारे अनुभवधन त्यांनी कादंबऱ्यातून ओतले. ब्राह्मणकन्या या कादंबरीतील शठेवटची 'नवीन स्मृती' नवदृष्टी देणारी आहे. डॉक्टर केतकर हे विचारांना धक्के देणारे होते. त्यांची प्रज्ञा खोल नि व्यापक होती. समाजाचा त्यांचा अभ्यास गाढ होता. लोकमान्य टिळक आणि इतिहाससंशोधक राजवाडे यांच्याविषयी त्यांना अपार भक्ती.
हिंदुधर्मातील अनेक गोष्टींबद्दल त्यांना आदर होता. त्यांनी जर्मन विदुषीबरोबर विवाह केला; परंतु क्रात्यस्तोम यज्ञ करून त्यांनी त्यांना हिंदू करून घेतले. या विदुषीचे नाव शीलवती बाई. महर्षी । सेनापती बापटांसारखे थोर धर्मज्ञ या विवाहात पुरोहित होते. डॉक्टर केतकर प्रस्तावना खंडाच्या पहिल्या भागात म्हणतात, “हिंदुधर्मातील संग्राहकता राहिली असती तर महंमद पैगंबर हेही एक अवतार मानले गेले असते व अनेक पंथांप्रमाणे हा एक महमदी पंथ हिंदुधर्मात राहिला असता." एखादे वेळेस किती उच्च नि उदार विचार ते मांडित. एक कोटी टिळक फंडाचे काय केलेत असा हिशोब विचारणान्यांना ते म्हणाले, “असहकार हा एक नवीन शब्द गांधीनी हिंदी जनतेस शिकविला. एक कोटी रुपयांहून त्याची किंमत अधिक आहे." डॉ. केतकर हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. ज्ञानाची उपासना त्यांनी शिकविली. सहकारी तत्त्वावर एकत्र येऊन साहित्य सेवा करायला त्यांनी शिकविले. त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक प्रणाम.
COMMENTS