Essay on Bhagat Singh in Marathi Language : In this article read "माझा आवडता क्रांतिकारक मराठी निबंध", "क्रांतिवीर सरदार भगतसिंग निबंध मराठी", "Marath
Essay on Bhagat Singh in Marathi Language : In this article read "माझा आवडता क्रांतिकारक मराठी निबंध", "क्रांतिवीर सरदार भगतसिंग निबंध मराठी", "Marathi Essay on Sardar Bhagat Singh" for Students.
क्रांतिवीर सरदार भगतसिंग निबंध मराठी - Marathi Essay on Sardar Bhagat Singh
क्रांतिवीर सरदार भगतसिंग निबंध मराठी - "फाशी दिल्याने क्रांती थांबत नाही. क्रांतीला कोण रोखू शकेल? आणि क्रांती म्हणजे हिंसा नव्हे. क्रांती म्हणजे समाजव्यवस्थेत बदल. शाश्वत पायावर म्हणजेच सत्याच्या नि न्यायाच्या पायावर समाजाची रचना आम्ही करू इच्छितो. हे आमचे ध्येय. क्रांतियज्ञाच्या वेदीवर आम्ही आपले जीवन धुपाप्रमाणे ठेवीत आहोत; जे ध्येय आमच्याबरोबर आहे त्याच्यासाठी केवढाही त्याग केला तरी अपुराच आहे."
सरदार भगतसिंगाचा जन्म 1907 च्या सप्टेंबरमध्ये झाला. ज्या दिवशी ते जन्मले त्याच दिवशी तुरुंगात त्यांचे एक चुलते वयाच्या केवळ 28 व्या वर्षी मरण पावले. सरदारांचे दुसरे चुलते अजितसिंह यांना 20 वर्षांची हद्दपारी होती. त्यांची हद्दपारी नेहरू सरकारने रद्द केली आणि ते मायभूमीला परत आले. सरदारांच्या वडिलांचे नाव किसनसिंग, त्यांचे आजोबा अर्जुनसिंग व आजी जयकुंवर फार देशाभिमानी होती. भगतसिंगांचा खटला चालला होता. तेव्हा 80 वर्षांचे वृद्ध आजोबा अभिमानाने खटला ऐकायला येऊन बसत. आजीने एकदा सुफी अंबाप्रसाद या अज्ञात देशभक्ताला घरात थारा दिला होता. पोलीस आले; परंतु तिने दाद दिली नाही. त्यावेळेस लाहोरला खालसा हायस्कूल होते; परंतु ही शिक्षणसंस्था शिखांची असनही ती राजनिष्ठ म्हणून वडिलांनी आपल्या मुलास दयानंद अँग्लोवैदिक हायस्कूलातच घातले. त्यांना देशावर प्रेम करणारा धर्म हवा होता.
परंतु असहकार आला. जालियनवाला बागेत हत्याकांड झाले. पंजाबवर लष्करी धिंगाणा होता. काँग्रेसने बहिष्कार पुकारला. भगतसिंग शाळा सोडून बाहेर पडले. त्यावेळेस त्यांचे जेमतेम 14 वर्षांचे वय, लाहोरच्या नॅशनल कॉलेजात ते दाखल झाले. तेथेच सुखदेव, यशपाल, वगैरेंशी मैत्री झाली. पहिल्या महायुद्धात अनेक शिखांवर बंडाचे खटले झाले होते. त्यांच्या त्यागाच्या कथा भगतसिंग ऐके. 'बाबर अकाली' पक्ष पंजाबात होता. त्यांच्याही गोष्टी कानावर येत. भगतसिंगांच्या वडिलांनी त्या क्रांतिकारकांना हजारो रुपयांची मदत केलेली होती. भगतसिंग लाहोर सोडून कानपूरला आले. तेथे हुतात्मा गणेश शंकर विद्यार्थी यांची नि त्यांची मैत्री जमली. 17-18 वर्षांचे वय, परंत क्रांतिकारक संघटना करण्याचे ठरले; कारण महात्माजींचा सत्याग्रह थांबला होता. त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले, तेव्हा त्यांनी विधायक कामाला वाहून घेतले.
पंडित मोतीलाल नेहरू, देशबंधू दास यांनी स्वराज्य पक्ष काढला. देशाच्या अशा परिस्थितीत तरुणांनी पुन्हा क्रांतिकारक संघटना आरंभिली. 'हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन' स्थापण्यात आली. सचिंद्रनाथ संन्याल, जोगेशचंद्र पंडित, रामप्रसाद बिस्मिल इत्यादी तरुण यात होते. भगतसिंगही सामील झाले. त्यांनी बलवंत नाव घेतले. 1926 मध्ये काकोरीला खजिना लुटला गेला. पुढे धरपकडही सुरु झाल्या. भगतसिंग लाहोरला गेले. इकडे काकोरी कटांतील आरोपी लखनौच्या जिल्हा तुरुंगात प्रथम होते. त्यांना पळवून नेण्याचा एक धाडसी कट सरदार भगतसिंगांनी केला; परंतु जमले नाही. काकोरी कटातील वीर फाशी गेले. अनेकांना दीर्घकालीन सजा झाली. भगतसिंगांच्या मनावर या गोष्टींचा अपार परिणाम झाला. ते लाहोरला खूप अभ्यास करू लागले. लाला लजपतराय यांनी तेथे "सर्व्हट्स ऑफ पीपल' नावाची संस्था सुरू केली होती. तेथे ग्रंथालय होते. भगतसिंगांनी शेकडो पुस्तके वाचली. आयर्लंड, इटली, रशिया इत्यादी देशांच्या स्वातंत्र्याचे, क्रांतीचे इतिहास वाचले. त्या ग्रंथालयाची जी नोंद वही आहे ती बघितली तर इतकी पुस्तके वाचणारा त्या ग्रंथालयास कोणी मिळाला नव्हता असे दिसेल, नसलेली पुस्तके ते मागवायला लावीत. लालाजींचे तर भगतसिंगवर पुत्रवत प्रेम जडले. 1926 मध्ये लाहोरला रामलीलेची मिरवणूक होती. कोणी तरी बाँब फेकला. पोलिसांनी भगतसिंगांनाच अटक केली. ते म्हणाले, “मी बाँब फेकला नाही. रामलीलेच्या मिरवणुकीवर का मी बॉब टाकीन?" त्यांना 60 हजारांच्या जामिनावर मोकळे करण्यात आले. हायकोर्टाने पुढे जामीन रह केला.
आईवडिलांनी एका सुंदर मुलीबरोबर लग्न ठरविले. भगतसिंग म्हणाले. “माझा विवाह ध्येयाशी लागलेला आहे. मातृभूमी दास्यमुक्त होईपर्यंत कोणत्याही मोहात न गुंतण्याचा मी निश्चय केला आहे."
लाहोरात त्यांनी 'नवजवान सभा' काढली. तिच्या पंजाबभर शाखा होत्या. भगतसिंगांनी पंजाबभर 'काकोरी दिन' साजरा केला. अनेक हुतात्म्यांचे नि क्रांतिकारकांचे फोटो मिळवून त्यांनी स्लाइड्स तयार केल्या. लाहोरच्या बॅडले हॉलमध्ये मॅजिक लँडनने हे सारे दाखविण्यात आले. प्रत्येक क्रांतिकारकाचा परिचय भगतसिंगांनी लिहिला होता. अलोट गर्दी जमली होती. पंजाब सरकारने या कार्यक्रमावर पुढे बंदी घातली. काकोरी कटानंतर संघटना विस्कळीत झाली होती. ती पुन्हा नीट उभारायची ठरले. भगतसिंगांनी अनेक ठिकाणी तरुण मिळावे म्हणन दौरा काढला. काशी विद्यापीठात तेव्हा शिवराम राजगुरु शिकत होते. ते त्यांना मिळाले. कलकत्याचे बटुकेश्वर दत्त मिळाले.
भगतसिंग वगैरे क्रांतिकारकांनी आपल्या संघटनेचे नाव बदलले. समाजवादी रचना व्हावी असे अभ्यासाने त्यांना वाटले. "हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन' असे नाव घेतले. आग्रा शहरात त्यांनी दोन घरे भाड्याने घेतली होती. तेथे तरुण राहत. कधी डाळे-चुरमुरेच खात. कडाक्याच्या थंडीत पांघरायला नसे. नेम मारायला शिकणे, इतिहास, अर्थशास्त्र यांचा अभ्यास, डोंगर चढणे, दया उतरणे, पोहून जाणे इत्यादी गोष्टी शिकत अशा वेळेस लालाजींवर मार पडल्याची बातमी आली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांनी लाहोरला जायचे ठरविले. चंद्रशेखर आझाद हेही दूर उभे राहणार होते. पळून जायचे नाही, ज्योतीन मुकर्जीप्रमाणे पोलिसांशी लढत देत मरायचे असे ठरले.
17/12/1928 लालाजींना लाठ्या मारणारा सार्जट सँडर्स फटफटीवरुन जात होता. गोळ्या घालण्यात आल्या. सँडर्स मरून पडला. चौघे रिव्हाल्वर घेऊन उभे होते. कोणी आले नाही. ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी लाहोरभर भिंतीवर पत्रके "लालाजींचा बदला घेतला - हिंदी सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन," अशी लावली गेली.
चंद्रशेखर आझाद गोसाव्याच्या मेळाव्यात गेले नि निसटले. भगतसिंगांनी गोया ऑफिसचा पोशाख केला, ते गोरे गोरे होते. बरोबर सुकदेव हे पट्टा घातलेले शिपाई आणि राजगुरु टिफिन कॅरियर घेऊन जाणारे बबर्जी झाले! नवी कोरी करकरीत ट्रंक बरोबर. ट्रंकेवर लाहोरांतीलच एका बड्या अधिकाऱ्यांचे नाव आणि स्टेशनात आले तिघे. ट्रंकेवरचे नाव पाहून पोलिसांनी मुजरा केला!
भगतसिंग वगैरे कलकत्याला गेले. 1928 डिसेंबरमध्ये तेथे राष्ट्र सभेचे अधिवेशन होते. काही बंगाली क्रांतिकारक काळ्यापाण्यावरून सुटून आले होते. भगतसिंग त्यांना भेटले; परंतु काही दिवस सशस्त्र क्रांतीत पडायचे नाही असे बंगाली क्रांतिकारकांनी ठरवले होते. भगतसिंगांनी त्यांच्याजवळून । बाँबविद्या घेतली. अज्ञात लोकांना निवारा म्हणून कलकत्यास एक हॉटेल त्यांनी सुरू केले आणि परतले. पंजाबात व अन्यत्र त्यांनी बॉम्ब तयार करणे सुरु केले. या सुमारास दिल्लीच्या विधिमंडळात सरकारने "पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेड डिस्प्युटस अॅक्ट' ही दोन बिले आणली. असेंब्लीत बॉम्ब फेकायचे ठरले. कोणी माणसावर नाही टाकायचा, पळून जायचे नाही. हिंदुस्थान किती असंतुष्ट आहे हे बॉम्बच्या आवाजाने ब्रिटिशांच्या कानात घुसवायचे. सभांनी ते नाही घुसत. तीन दिवस खिशात रिव्हॉल्वर आणि बॉम्ब घेऊन बटुकेश्वर आणि भगतसिंग असेंब्लीच्या गॅलरीत जात होते. भगतसिंग रुबाबात जायचे. जणू मोठा साहेब वाटे. 8/4/1929 ला त्यांनी बॉम्ब टाकले. धूरच धूर. सभासद पळाले. कोणी संडासात लपले. पंडित मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल आणि सर जेम्स क्रेशर हे चौघे आपापल्या जागी स्थिर होते. भगतसिंग, बटुकेश्वर तेथे उभे होते. भरलेले रिव्हॉल्वर हाती होते; परंतु त्यांनी कोणाला मारले नाही. एखाद्याची हत्या हे त्यांचे ध्येयच नव्हते. नाहीतर तो बॉम्बही कोणावर त्यांनी टाकला असता. ते पोलिसांच्या स्वाधीन झाले खटला सुरू झाला. "इन्किलाब जिंदाबाद, कामगार वर्गाचा जय असो." अशा घोषणा कोर्टात येताना करीत. त्या नवीन घोषणा होत्या.
भगतसिंगांनी जी कैफियत दिली ती चिरंजीव आहे. क्रांतीचे शास्त्रीय तत्त्वज्ञान तिच्यात त्यांनी मांडले. ते म्हणतात, "वाटेल त्याची कत्तल करणारे आम्ही भाडोत्री सैनिक नाही. आम्ही इतिहासाचा सखोल अभ्यास केला आहे. आम्हाला येथील शासनपद्धतीचा बॉम्ब टाकून सक्रिय विरोध करायचा होता. आम्ही मानवीजीवन पवित्र मानतो. मानव्याच्या सेवेसाठी आम्ही प्राण देऊ; परंतु राजकीय स्वातंत्र्यासाठी नि:स्वार्थी हिंसा ही हिंसा होत नाही. गरिबाल्डी, शिवाजी महाराज का हिंसक? व्यक्तीला अर्थ नाही. परंतु संघटित सशस्त्र क्रांती करण्याचा गुलाम राष्ट्राला हक्कच आहे.
हे निवेदन देशी व विदेशी 14 पत्रांतून एकदमच प्रसिद्ध झाले! त्या दोघांना दहा-दहा वर्षांची सक्त मजुरी देण्यात आली. एका दूरच्या ओसाड तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. याच सुमारास सांडर्स कटाच्या बाबतीतही काही धरपकड चालू होती. श्री.जतीद्रनाथ वगैरेंना अटक करण्यात आली होती. लाहोरच्या तरुंगात ते होते. राजकीय कैद्यांना निराळ्या रीतीने वागवावे म्हणून अन्नसत्याग्रह सुरु झाला. जतींद्रनाथ एनिमाही घेता ना. त्यांची स्थिती चिंताजनक झाली. मोठमोठ्या पुढाऱ्यांनीही सांगितले; परंतु व्यर्थ. “भगतसिंगांनी सांगितले तर ते ऐकतील," कोणी म्हणाले. सरदार भगतसिंगांना लाहोरला आणण्यात आले. भगतसिंगांनी त्यांना एनिमा घ्यायला लावले. सुपरिटेन्डेट खानसाहेब खरीददीन जतींद्रनाथांना म्हणाले, "तुम्ही थोरामोठ्यांचे ऐकले नाही. यांचेच का?" जतींद्र म्हणाला, "शूर भगतसिंगांची योग्यता केवढी आहे ते तुम्हांस माहीत नाही. अशा थोर पुरुषाच्या शब्दाचा अपमान करणे मला शक्य नाही." जतींद्रनाथांना मुक्त करा म्हणून भगतसिंगांनी राजकीय कैद्यांच्या चौकशी समितीला सांगितले; परंतु सरकारने नाकारले. जतींद्र उपवास करून देवाघरी गेला.
आणि सँडर्सच्या खुनाचा खटला सुरु झाला. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव हे मुख्य आरोपी सिद्ध झाले. हे क्रांतिकारक कोर्टात जयघोष करीत, कोर्टात प्रार्थना करीत, बाहेरच्यास संदेश पाठवित. 1929 डिसेंबरमध्ये काँग्रेस भरली लाहोरला. त्यावेळेस पंडित मोतीलाल नेहरू त्यांना भेटून आले. ते म्हणाले. “एका असामान्य व्यक्तीला भेटलो. त्यांची विचारसरणी ऐकून माझ्याहून हे किती श्रेष्ठ असे वाटले. एका 'पुरुषा' ची भेट झाली. म्हणून फार आनंद झाला." इकडे मिठाचा सत्याग्रह सुरु होता. तिकडे हा खटला चालला होता. राजगुरूंची आई कोर्टात यायची. प्रेमळ भगतसिंग धावत जाऊन त्या मातेचे दोन्ही हात आपल्या हातांत प्रेमाने घेऊन म्हणत., "मा,रो मत! राजगुरु जीता रहेगा, खाली भगतसिंग मर जायगा.' परंतु ऑक्टोबर 1930 रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशीच्या आधी भगतसिंगांच्या आईला भेटही देण्यात आली नाही. फक्त राजगुरूंच्या आईला भेटायची परवानगी मिळाली; परंतु भगतसिंगांच्या आईस परवानगी नसेल तर मलाही नको असे ती महाराष्ट्रीय माता म्हणाली!
महात्माजींनी असे फाशी देऊ नका लिहिले. यंग इंडियात त्यांनी गौरवपर लेख लिहिला. "माझा मार्ग निराळा असला तरी भगतसिंगाचे शौर्य, निष्कलंक चारित्र्य, त्याग त्याबद्दल मला अपार आदर आहे." परंतु सरकारने ऐकले नाही. 23 मार्च 1931 ला सायंकाळी 7 वाजता तिघांना वधस्तंभाकडे नेले. तिघांनी एकमेकास शेवटचे भेटून घेतले. भगतसिंग गोया मॅजिस्ट्रेटला म्हणाले. “अत्युच्च ध्येयासाठी हिंदी क्रांतिकारक मृत्यूला आनंदाने कशी मिठी मारतात हे पाहण्याचे भाग्य तुम्हाला मिळाले. अच्छा!" 7 वाजून 33 मिनिटांनी त्यांच्या गळ्याला फास लागला. तिघे अमर झाले. शतश: प्रणाम! भगतसिंग गोरे गोरे दिसत. 5 फूट 10 इंच उंची. गोड आवाज. एकदा तुरुंगात बॅ. असफअल्ली त्यांना भेटायला जात होते. तर बेड्यांच्या झणत्कारावर ते गाणे गात होते. ते एका पत्रात लिहितात, "क्रांतिकारक असीम प्रेमळ असतो." एकदा एका सहकाऱ्याला देवी आल्या. त्यांनी त्यांची शुश्रूषा
COMMENTS