Karmaveer Bhaurao Patil Essay in Marathi : In this article, we are provoding कर्मवीर भाऊराव पाटील माहिती मराठी निबंध,"Karmaveer Bhaurao Patil Informat
कर्मवीर भाऊराव पाटील माहिती मराठी निबंध - Karmaveer Bhaurao Patil Essay in Marathi
मागासलेल्या समाजातून ज्ञान-विज्ञानसंपन्न, नव-संपन्न, नवतरुण असे कार्यकर्ते निर्माण करण्याची आवश्यकता कर्मवीरांनी ओळखली. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे भूतकाळातील अनुभव जमेस धरून वर्तमानात वावरत असताना भविष्याकडे दृष्टी ठेवणारा ऋषी! कर्मवीर श्री. भाऊराव पाटील यांना सातारा येथे एक लक्ष रुपयाची थैली कृतज्ञतापूर्वक देण्यात आली.
मी त्यांच्या संस्था पाहिल्या आहेत. मुले स्वयंपाक करीत आहेत, सफाई करीत आहेत, सारे पाहिले आहे. भाऊरावांनी या कार्यात तनमनधन ओतले. त्यांच्या पत्नीने मंगलसूत्रही संस्थेस शेवटी समर्पिले होते. त्याग व कष्ट नि अपार निष्ठा यांच्या पायावर त्यांनी थोर काम उभे केले.
विशेषत: मागासलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना पुढे आणणे हे त्यांचे गौरवास्पद कार्य आहे. "भविष्य राज्य तुमारा मानो; अए मजदूरों और किसानो" असे आपण म्हणतो, तो भार खांद्यावर घेऊ शकतील असे खंदे नवतरुण निर्माण करणे त्यासाठी आवश्यक. ह्या नवतरुणांना ज्ञानविज्ञानसंपन्न घडवण्याची आवश्यकता कर्मवीरांनी ओळखली. हे त्यांचे ऋषित्व. ऋषी हा त्रिकालज्ञ लागतो. भूतकाळातील अनुभव जमेस धरून वर्तमानात वावरत असताना जो भविष्याकडे दृष्टी ठेवतो तो ऋषी.
महर्षीनी अनेक तरुणांना परदेशात पाठविले आहे. कोणी परत आले आहेत. अशा रीतीने ज्यांना आपण मागासलेले म्हणतो त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न करणे, त्यांच्यात प्रखर अशी ज्ञानज्वाला पेटविणे हे थोर कार्य होय. श्री भाऊरावांनी तीन तपांवर सेवा करून आपले नाव अजरामर केले आहे. आपल्या सेवेचा कळस म्हणून गांधी विद्यापीठ-जेथून ग्रामीण विधेतील पारंगत विद्यार्थी बाहेर पडतील-सहकारी शिक्षण, मधुमक्षिका शिक्षण, चर्मोद्योग, दुधालये अशा अनेक विषयातील तज्ज्ञ पदवीधर बाहेर पडतील असे विद्यापीठ त्यांच्या हातून उभे केले जावो हीच मंगल आशा प्रकट करून महर्षीच्या सेवेला प्रणाम करतो. त्यांच्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो.
COMMENTS