Autobiography of Donkey Essay in Marathi : In this article गाढवाची कैफियत निबंध मराठी for students. गाढवाचे आत्मचरित्र निबंध मराठी for ...
Autobiography of Donkey Essay in Marathi: In this article गाढवाची कैफियत निबंध मराठी for students. गाढवाचे आत्मचरित्र निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Autobiography of Donkey", "गाढवाची कैफियत निबंध मराठी" for Students
एखादया व्यक्तीचा 'उद्धार करायचा असेल तर माणसाला माझं नाव चटकन् आठवतं!
गधड्या, गाढवा, एवढं साधं तुला कळत नाही?
बरोब्बर! ओळखलंत ना, मी कोण ते?
शेतात राबण्यासाठी, कुंभाराला माती आणण्यासाठी, ओझी वाहण्यासाठी विनातक्रार काम करणारं माझ्याशिवाय आहे तरी कोण? भर उन्हात, पाण्यापावसात एवढं राब-राब राबून पदरात काय, तर उपहासाने काढलेले उद्गार!
काटकपणा, चिकाटी, सहनशीलता या माझ्या गुणांचं कौतुक तुम्ही कधी करता का? उलट मी 'बिनडोक प्राणी आहे असा समज तुम्ही सोयिस्करपणे करून घेतलात. हेटाळणी, कुचेष्टा हेच माझ्या नशिबी!
एकदा काय गंमत झाली सांगू? मी आणि माझे मालक शेतातून दिवसभर काम करून, दमून-भागून घराकडे परतत होतो. निघायला तसा थोडा उशीरच झाला होता. रात्रीच्या अंधारात माझा पाय कसा कोण जाणे मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरला आणि मी धपकन् एका खोल खड्यात पडलो की! मी खूप घाबरलो. जोरजोरात ओरडायलाच सुरुवात केली. माझ्या मालकांना काहीच सुचेना. मला आता बाहेर कसं काढावं? शेवटी काहीतरी निश्चय करून त्यांनी मातीच्या ढिगाऱ्यातील माती माझ्या अंगावर टाकायला सुरुवात केली. मला कळेना, मालकाचा हेतू तरी काय असावा? त्यांच्या मनात काही काळंबेरं तर नाही ना? मी खूप घाबरलो. मालकांनी माझ्या अंगावर माती टाकली की, मी लगेच ती झटकून उभा राहायचो. रात्रभर मालक माझ्या अंगावर माती टाकत राहिले आणि मी धडपडत-पडपडत माती झटकत राहिलो. असं करता-करता झुंजूमुंजू झालं. पक्ष्यांचे आवाज ऐक येऊ लागले. कोंबडा आरवला. सूर्यदेवाच्या आगमनाची जणू चाहूल आम्हाला लागली.
माझे मालक दमून तिथंच खाली जमिनीवर झोपते. उन्हें अंगावर यायला लागली. सगळीकडे स्वच्छ सूर्यप्रकाश झाला. मी आजूबाजूला पाहिलं तर खडा दिसेचना. मी ज्या खात्यात पडलो होतो तो तर खड्डा मातीनं भरून गेला होता. मी पटकन उडी मारून खल्याच्या बाहेर आलो आणि मालकाच्या जवळ जाऊन आज्ञाधारक बालकासारखा उभा राहिलो. थोड्या वेळानं मालकांना जाग आली. मला पाहताच त्यांना आनंद झाला. खूप प्रेमान त्यांनी मला जवळ घेतलं.
असाच एकदा पाठीवर भरलेला भारा घेऊन मी जात होतो. नदीवरच्या लाकडी छोट्या पुलावरून पलीकडे जायचं होतं. पाठीवरच्या ओझ्यानं मी पार वाकलो होतो. घड चालताही येत नव्हतं. अचानक लाकडी खाचेत माझा पाय अडकता आणि मी सरळ नदीत पडलो धपकन्! हंऽहंऽहंऽऽ फारच गर पाणी होतं ते! सुरुवातीला तर मला हुडहुडीच भरली; पण जसजसा सूर्यनारायण डोक्यावर येऊ लागला, त्या पाण्यातून मला बहेर यावंसंच वाटेना. मग बसलो हूंबत. बऱ्याच वेळानंतर मला मालकांची आठवण आली. तसा पटकन उठण्याचा प्रयत्न केला. अरे, हे काय? पठीवरचं ओझं हलकं कसं झालं? बा! पाण्यात पडल्यामुळे झालं तर!
दुसऱ्या दिवशी मी पाठीवरचं ओझं कमी व्हावं म्हणून मुद्दामच पाण्यात पडलो. दुसऱ्या दिवशीपण ओह हलकं झालं. मग मी ठरवलं. आपण रोज असं पाण्यात पडून आपलं ओझं हतकं करून घ्यायचं.
मात्र तिसऱ्या दिवशी मी मुद्दाम पाण्यात पडल्यावर ओझं हलकं होण्याऐवजी जड झाल्यानं मला पाण्यातून बाहेर येताच येईना.
एका झाडाखाली लपून माझे मालक माझ्यावर लक्ष ठेवून होते. मला पाण्याबाहेर येता येत नाही, हे पाहून ते पुढे झाले त्यांनीच मला पाण्याबाहेर काढलं. मला म्हणाले, "परवा तुझ्या पाठीवर मिठाचं पोतं होतं, सगळं मीठ पाण्यात विरघळलं म्हणून तुझं ओझं हलकं झालं; पण बच्च. आज मी 'कापसाच्या गाठोडी तुझ्या पाठीवर लादल्या होत्या, त्या हलक्या न होता पाण्यानं जड झाल्या बरं! चला आता घरी. माझं एवढं नुकसान केलंप्त ना, यांब तुझी पाठ सोलूनच काढतो आता. करशीत पुन्हा असा शहाणपणा?
मी मान खाली घालून मालकाच्या मागे धापा टाकत चलत होतो; पण त्याचक्षणी मनाशी निश्चय केला, पुन्हा असं वागायचं नाही.
दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्यासाठीच माझा जन्म झालाय. केवढा भाग्यवान मी! मी तर समाजसेवक आहे. पावसाने ओढ दिली की तुम्हाला आमचं लग्न लावून दयावंसं वाटतं, सरकारचा निषेध करावासा वाटला की, निदर्शने करण्यासाठी तुमच्या सेवेत आम्ही हजर असतो.
माझं रूप बेंगळूर असलं, मी उकिरडे फुकत असलो तरी पाण पाणी मात्र पित नाही बरं. मी पाणी हुंगून पितो, आणि हो. मालकाची सेवा करण्यातच माझ्या जन्माची सार्थकता आहे.
COMMENTS