Story on Friendship in Marathi : In this article, we are providing " छानशी मैत्री कथा लेखन ", " Marathi Kahani on Friendship...
Story on Friendship in Marathi : In this article, we are providing "छानशी मैत्री कथा लेखन", "Marathi Kahani on Friendship" for student.
Marathi Story on "Friendship", "छानशी मैत्री कथा लेखन" for student
एका जंगलामध्ये एक पांढराशुभ्र लाल मण्यांसारख्या डोळ्यांचा ससा राहत होता. त्याचं घर जंगलातल्या मोठ्या डेरेदार वृक्षाच्या ढोलीत होतं. दिवसभर ससा त्या डेरेदार वृक्षाच्या आसपास टुणुक-टुणुक उड्या मारत खेळायचा आणि जरा खुट्ट झालं की, पटकन आपल्या ढोलीत जाऊन लपायचा.
एकदा काय झालं. त्याच झाडावर एक माकड येऊन बसलं. त्याच्या हातातील फळ खाता खाता खाली पडलं. झालं! नेमकं सशाच्या अंगावर! भित्रा ससा घाबरला, ढोलीत जाऊन लपला. माकडाला त्याची गंमत वाटली. माकडच ते, गेले ना हो ढोलीच्या तोंडापाशी! “अरे सशा, भितोस काय मित्रा, चल ये बाहेर बरं! असं एवढ्यातेवढ्या गोष्टीला घाबरायचं नाही. ये, अरे मी माकड! तुझ्यासारखाच या जंगलातील रहिवासी!" हे ऐकल्यावर भित्रा ससा हळूहळू पुढे आला. त्याला पाहिल्यावर माकड म्हणालं, “आता आपली-तुपली दोस्ती बरं का! आता चल, तुला मी एका मोठ्या प्राण्याशी माझ्या मित्राची ओळख करून देतो. तो प्राणी आकाराने खूप मोठा आहे; पण तू घाबरू नको बरं का! मी आहे ना आता तुझा दोस्त!"
बोलत बोलत माकड आणि ससा जंगलातून चालले होते. एवढ्यात एक अजम्न प्राणी समोरून येताना सशाला दिसला. ससा तर लटपटायला लागला. तो मागे वळून धूम ठोकणार एवढ्यात माकडाने त्याला अडवलं. “अरे, अरे, कुठे पळतोस? हाच आपला तिसरा मित्र आहे, मी तुझी याच्याशी मैत्री करून देणार आहे. चल, मागे फीर!” ससा घाबरत घाबरत म्हणाला, “नको रे बाबा, हा एवढा मोठा प्राणी. मला एका झटक्यात खाऊन टाकेल." "अरे, नाही खाणार, मी सांगतो त्याला." नको, नको, मी पाया पडतो तुझ्या, मला जाऊ दे.” भित्र्या सशाला कसं समजावं हेच माकडाला कळेना. शेवटी तो म्हणाला, “तू थांब, स्टॅच्यू मी आलोच!” टुणकन उडी मारून माकड हत्तीच्या कानात काहीतरी पुटपुटला. हत्तीनेही मग मान डोलावून संमती दिली. माकडाने थांबायला सांगितल्यामुळे ससा थिजल्यासारखा एका जागी उभा होता.
एवढ्यात तो अजम्न प्राणी म्हणजेच हत्ती आणि माकड तिथं आलं. हत्ती सशाला म्हणाला, “अरे ससा, आजपासून आपल्या तिघांची मैत्री. आजपासून मी कोणताच प्राणी मारणारही नाही आणि खाणारही नाही." "अरे या जंगलातील आपण सारे प्राणी मिळून न भांडता गुण्यागोविंदाने राहूया! माणसांपुढे एक आदर्श ठेवूया. इथून पुढे मी फक्त शाकाहार करणार, गवत खाणार. मग तर झालं?" तेव्हा कुठे ससा निर्भय झाला आणि हत्ती तेव्हापासून शाकाहारी!
COMMENTS