Mi Mulgi Bolte Marathi Nibandh : In this article मी मुलगी बोलतेय निबंध मराठी for students. Marathi Essay on Mi Mulgi Bolte for class 5,...
Mi Mulgi Bolte Marathi Nibandh: In this article मी मुलगी बोलतेय निबंध मराठी for students. Marathi Essay on Mi Mulgi Bolte for class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Mi Mulgi Bolte", "मी मुलगी बोलतेय निबंध मराठी", "Mi Mulgi Bolte Marathi Nibandh"
आज माझ्यासारख्या कितीतरी अभागी कळ्या या जन्म घेण्याआधीच नष्ट होतात, खुडल्या जातात.
आईच्या उदरातून दिसामाजी वाढत असताना सुंदर स्वप्नं रंगवत असतात. आपल्या माता-पित्यांना पाहण्याची ओढ त्यांना असते; पण केवळ तो मासाचा गोळा मुलगी आहे म्हणून नाकारला जातो. केवढं हे दुर्दैव!
आई आहे म्हणून जन्म आहे. एकटा पुरुष बाळाला जन्म देऊ शकेल?
जन्माला आल्यानंतरही मुलीची परवड थांबेल असं नाही. जन्म देणारी आईच जर डावं-उजवं करू लागली तर... मुलगा वंशाचा दिवा असेल आणि मुलगी समईतील वात, दोन्ही घरे उजळवणारी. असा का विचार करत नाहीत लोक?
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. गर्भलिंग चाचणीवर बंदी असतानाही मुलींची संख्या मुलांपेक्षा कमीच! आपली मानसिकता कधी बदलणार बरं? स्त्री-पुरुष समानता हे मूल्य केवळ पाठ्यपुस्तकातून शिकायचं आणि विसरायचं का? आई-बाबा मला शिकून खूप मोठं व्हायचंय. तुमची सेवा करायचीये. आई, तुझी सावली होऊन मला राहायचंय आई, मी कोणताच हट्ट करणार नाही. तुला आणि बाबांना त्रास होईल, असं मुळीच कधी वागणार नाही. मी नशीबवान म्हणून मला तुमच्या उदरी जन्म मिळाला. किती आनंदानं तुम्ही माझं स्वागत केलंत. सगळ्याच मुलींचं असं स्वागत का बरं होत नाही? अशी कोणती चिंता पालकांना वाटत असते? गरीब-श्रीमंत दोघांनाही मुलगाच हवा असतो. तो कसाही वागला तरी चालतो.
आता शिक्षणानं समाजात हळूहळू क्रांती होतीये. एकच मुलगी असणारे अनेक पालक सुशिक्षित घरात दिसताहेत; पण अंधश्रद्धा आणि अशिक्षित समाज मात्र अजूनही उदासीन दिसतोय. माझ्या वर्गात पाच मुलींना ४-४ बहिणी आहेत. कमावणारे फक्त बाबा एकटेच असूनही त्यांना अजून 'भाऊ' हवा आहे. सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांची मी चरित्रं वाचलीत. कल्पना चावला, किरण बेदी, प्रतिभाताई पाटील यांच्यासारखं मला धाडसी काम करायचंय. नाव मिळवायचंय. नीला सत्यनारायण माझा आदर्श आहे. मंदा आमटेंसारखं झोकून काम करायचंय,
त्यांना भाऊ हवा की नाही, मला ठाऊक नाही; पण त्यांच्या बाबांना मात्र मुलगा हवाय.
मुलगीच नसेल तर राखी पौर्णिमा, भाऊबीज तरी साजरी कशी होणार? मुलं लग्न कोणाशी करणार?
मला तर समाजाला ओरडून सांगावंसं वाटतंय की, मुलगा आणि मुलगी एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. त्यांना स्वीकारा नाही तर अशी वेळ येईल की, आज हुंडा मुलीचा बळी घेतोय. मात्र भविष्यात मुलं हुंडा देऊन मुलींशी लग्नास उत्सुक असतील. आई, माझ्यासारख्या अनेक कळ्या टाहो फोडताहेत गं. तुमच्याप्रमाणेच इतरांनाही त्यांना जगण्याची संधी दया, आई-वडिलांचं नाव त्या नक्की मोठं करतील.
COMMENTS