Me Fala Boltoy Essay in Marathi : In this article " मी फळा बोलतोय मराठी निबंध ", " Fulache Manogat Marathi Nibandh " for...
Me Fala Boltoy Essay in Marathi: In this article "मी फळा बोलतोय मराठी निबंध", "Fulache Manogat Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Me Fala Boltoy", "मी फळा बोलतोय मराठी निबंध", "Fulache Manogat Marathi Nibandh" for Students
मुलांनो, शाळेत तुमचं स्वागत करण्यासाठी छान चित्र, सुविचार लिहिला जातो. काळ्याकुट्ट माझ्या अंगावर रंगीत खडूने आकर्षक, सुंदर हस्ताक्षरात तुमचे शिक्षक तुमचं स्वागत करायला सज्ज होतात. आईचं बोट धरून आलेले तुम्ही थोड्याच दिवसात शाळेत रमता.
गणिताच्या तासाला तुमच्या सरांचं माझ्याशिवाय पान हालत नाही. चित्रकला हा काय तोंडी शिकवायचा विषय आहे का? तुमचे चित्रकलेचे सर किती कमी वेळात तुमच्या समोर छानसं चित्र रेखाटतात. तुमची सेवा करण्याची संधी मला मिळते म्हणून मी अगदी खूश असतो. वर्षातून एकदा तरी मला रंग देऊन चकचकीत करतातच!
मधल्या सुट्टीत तर माझ्या अंगावर रेघोट्या काढणारी काही मुलं पाहिली की, मात्र मला राग येतो बरं का! काही हुशार मुलं गणितं सोडविण्यासाठी जेव्हा माझ्याजवळ येतात तेव्हा मला आनंदच होतो.
गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही माझा छान वापर करता. आणि हो, वर्गात शिक्षक नसताना वात्रट बोलणाऱ्या मुलांची नावं पण तुम्ही माझ्या अंगावरच तर लिहिता. शाळेतील प्रत्येक वर्गात मला मानाचं स्थान असतं. माझ्याशिवाय शाळा अपूर्णच! शाळेच्या व्हरांड्यातील प्रत्येक भिंतीवरील फळ्यावर सुविचार, बातम्या, कविता, चित्रं यांनी सुशोभित करून तुम्हीच शाळेची शोभा वाढवता..
दररोज वर्गशिक्षक वर्गात आल्यावर रोजची तुमची हजेरी माझ्या उजव्या कोपऱ्यात लिहून, मग विषयाचं नाव लिहून शिकवायला सुरुवात करतात.
ऑफ तासाला शब्दांच्या स्पेलिंगच्या भेंड्या फळ्यावर खेळणं हा तर तुमचा आवडता छंद; शिवाय तुमच्या मॅडमही तुम्हाला फळ्यावर लिहिण्यासाठी जवळ बोलवतातच की! परवा नाही का, मॅडमनी लेखकाचं नाव लिहिलं आणि तुम्हाला धड्याचं नाव विचारलं ! मजा आली ना, तो खेळ खेळताना! प्रत्येक वर्गात सुविचार लिहायचा. एक बातमी सांगायची असं तुम्हाला वर्गशिक्षकांनी ठरवूनच दिलंय ना!
माझी आणि डस्टरची दोस्ती आहे बरं का! किती प्रेमानं, मायेनं तुम्ही माझ्या अंगावरून डस्टरचा हात फिरवता. त्याचा मला स्पर्श झाला की, होत्याचं नव्हतं होतं अगदी आणि पुन्हा नव्यानं मी कामासाठी तयार होतो.
COMMENTS