Essay on Importance of Books in Marathi : In this article " ग्रंथ माझा गुरू मराठी निबंध ", " ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध ...
Essay on Importance of Books in Marathi: In this article "ग्रंथ माझा गुरू मराठी निबंध", "ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध", "Granth Maza Guru Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Importance of Books", "ग्रंथ माझा गुरू मराठी निबंध", "ग्रंथ माझा गुरू मराठी निबंध" for Students
"ग्रथासारखा गुरू नाही रे जगात
ग्रंथासारखा मित्र नाही भरत मनात
ग्रंथासारखा दास कसा मिळेल विकत?
ग्रंथ सारखा रे बसावा वाचत वाचत
सदोदित वाचती राहावे, वाचनाचे धडे गिरवावे
माणसा, माणूसपण यावे
नित्यपूजन करावे संस्कृतीचे!"
ग्रंथाचे माहात्म्य सांगण्यासाठी वरील ओळीच पुरेशा आहेत. नाही? लोकमान्य टिळकांचे एक वाक्य, ग्रंथांवर त्यांचे असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी वाचल्याचे मला आठवते. ते म्हणत, "स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करीन. कारण जिथे पुस्तके असतात तिथे स्वर्ग निर्माण होतो."
ग्रंथ, पुस्तके, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, कथा, थोरामोठ्यांची चरित्रे, विज्ञान कथा, शब्दकोश या आणि अशा अनेक साहित्यांतून ज्ञान, माहिती अगदी ओसंडून वाहत असते.
वाचनाची आवडच आपल्याला या विविध साहित्यप्रकारांची ओळख करून देते. ज्ञान, माहिती याबरोबरच मनोरंजनाचेही कार्य होते. त्यातूनच वाङ्मयीन अभिरुची निर्माण होते. वाचनातून आपल्या मनावर मूल्य संस्कार कोरले जातात. आपले व्यक्तिमत्त्व संपन्न होण्यास मदत होते.
वाचनामुळे अभ्यास, ज्ञानोपासना हे हेतू तर साध्य होतातच; पण विविध लेखकांच्या विचारांचा परिचय त्यांच्या लेखनातून होत असल्याने जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. थोरा-मोठ्यांची चरित्रे वाचून प्राप्त परिस्थितीवर मात करीत ते कसे मोठे झाले याचेही ज्ञान होते. ध्येयाने झपाटलेली ती माणसे मग स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, महात्मा जोतिबा फुले असोत की डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत ते आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचले ते कळते.
ग्रंथ म्हणजेच पुस्तके हे आपल्याला कधीही अंतर न देणारे गुरू असतात. ग्रंथ हे आपल्याशी कधीही न भांडणारे मित्र असतात. या ग्रंथाचे वाचन आपण अगदी कुठेही, बसमध्ये-ट्रेनमध्ये विनासायास करू शकतो. ग्रंथातून इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेता येतो. २१ व्या शतकातील संगणकाशी मैत्री कशी करावी हे सांगतात ग्रंथ. रुचिरासारख्या पुस्तकातून जिभेचे चोचले कसे पुरवावे हे समजते. इसापनीतीच्या कथांतून मनोरंजनाबरोबर योग्य-अयोग्य. चांगले-वाईट यांची समज होते. वाचनामुळेच अभिव्यक्ती उत्तम प्रकारे साधता येते. वाचनामुळे आपले विचार दृढ होतात. आपल्या भावना, विचार, अनुभव, कल्पना प्रकट करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये वाचनामुळेच येते.
म्हणूनच श्री. दि. इनामदारांच्या काव्यातील या ओळींनी निबंधाचा शेवट करावासा वाटतो.
'ग्रंथ ज्ञानाचे ललाट
ग्रंथ विज्ञानाची वाट
ग्रंथ सुखाचा सम्राट
जीवनात.'
COMMENTS