Vinanti Patra in Marathi Language : Today, we are providing विनंती पत्र मराठी नमुना For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. ध्वनिवर्धकाचा आवाज कमी करण्याबाबत विनंती पत्र मराठी नमुना महोदय, मी आपल्या परिसरात राहणारा, इयत्ता १० वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. लवकरच गणेशोत्सवास प्रारंभ होईल. सालाबादप्रमाणे आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करतो. लोकशिक्षणाचे साधन म्हणून असे उत्सव साजरे झालेच पाहिजेत.
Vinanti Patra in Marathi Language : Today, we are providing विनंती पत्र मराठी नमुना For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Vinanti Patra in Marathi Language to complete their homework.
विनंती पत्र मराठी नमुना Vinanti Patra in Marathi Language
अ. ब. क.
५१२, स्नेहसदन,
शनिवार पेठ,
पुणे - ४११ ०२८
१४/८/२०१३
प्रति,मा. व्यवस्थापक,
समस्त गणेश उत्सव समिती,
पुणे. स. न. वि. वि.
विषय :- ध्वनिवर्धकाचा आवाज कमी करण्याबाबत.
महोदय,
मी आपल्या परिसरात राहणारा, इयत्ता १० वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. लवकरच गणेशोत्सवास प्रारंभ होईल. सालाबादप्रमाणे आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करतो. लोकशिक्षणाचे साधन म्हणून असे उत्सव साजरे झालेच पाहिजेत. कारण या निमित्ताने युवाशक्ती एकत्र येऊन लोकोपयोगी कामे करते. राष्ट्रप्रेम, ऐक्याची भावना त्यामुळेच वाढीस लागते. त्यामुळेच मी ही या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो पण.
Read also : शालेय भांडारासाठी साहित्याची मागणी करणारे पत्र
Read also : शालेय भांडारासाठी साहित्याची मागणी करणारे पत्र
जेव्हा असे उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरे होतात तेव्हा समाजातील सर्व घटकांना त्रास न होता समाधान, आनंद कसा मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमांमध्ये ध्वनिवर्धकाचा वापर अटळ आहे; पण त्याचा त्रास आजारी, वृद्ध आणि विद्यार्थी यांना होणार नाही. हे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. माझ्यासाठी तर हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. नेमकं गणेशोत्सवाच्या काळात आमची परीक्षा सुरू होत आहे. ध्वनिवर्धकाच्या आवाजाने अभ्यासात लक्ष लागणे कठीण आहे, तरी आपणास नम्र विनंती की, ध्वनिवर्धकाचा आवाज मर्यादित ठेवून मला सहकार्य करावे. आपण माझ्या विनंतीचा नक्की विचार कराल अशी आशा बाळगतो.
आपला कृपाभिलाषी
Vinati patra
ReplyDeleteMitrala sahit sahbhagi honaychi vinati karnaychi patra
Delete