Susangati Sada Ghado Marathi Nibandh : Today, we are providing सुसंगती सदा घडो मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Stud...
Susangati Sada Ghado Marathi Nibandh: Today, we are providing सुसंगती सदा घडो मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Susangati Sada Ghado Marathi Essay / Nibandh to complete their homework.
सुसंगती सदा घडो मराठी निबंध Susangati Sada Ghado Marathi Nibandh
इसापनीतीमधील माकड आणि सुसरीच्या मैत्रीची ही कथा. एकदा एका माकडाची आणि एका सुसरीची मैत्री होते. माकड त्या तलावाकाठी असणाऱ्या जांभळाच्या झाडावर बसून तलावात असणाऱ्या सुसरीला रोज गोड जांभळे खायला टाकत असते. त्या माकडाबद्दल आणि गोड जांभळाबद्दल सुसर आपल्या घरच्यांना जेव्हा सांगते तेव्हा त्या माकडाचे गोड काळीज खाण्याची इच्छा त्यांना होते. म्हणून मग मेजवानीचे आमंत्रण देऊन, माकडाला फसवून आपल्या घरी नेण्याचे सुसर ठरवते. अर्ध्या वाटेत गेल्यावर मात्र त्याला न राहवून ते 'सत्य' सांगते. माकड चतुर असल्याने “अगं, सुसरीबाई, आधी नाही का सांगायचेस, मी तर काळीज झाडावरच ठेवून आलो. चल, आपण परत जाऊन झाडावरून काळीज घेऊन येऊ या.” ते ऐकून सुसरही लगेच मागे फिरते. तलावाच्या काठाजवळ येताच माकड टणकन् उडी मारून झाडाकडे झेप घेते. “अगं वेडे, काळीज कधी झाडावर ठेवून येतात का? बरे झाले, माझा जीव वाचला. तुझ्याशी मैत्री करून मी दिलेल्या गोड जांभळाच्या बदल्यात चांगली परतफेड करणार होतीस ना? तुझ्याशी मैत्री म्हणजे असंगाशी संग झाला ग बाई! पुन्हा इकडे येऊही नकोस आणि माझ्याशी बोलूही नकोस."
Read also : मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध
मित्रांनो, लहानपणी तुम्ही ही गोष्ट ऐकलीच आहे. गोष्टीचे तात्पर्य काय की, आपल्याला संगत चांगली हवी. संग म्हणजे मैत्री! एक खराब आंबा पेटीतील इतर चांगले आंबेही खराब करतो.
अगदी रामायण-महाभारतातही अशी अनेक उदाहरणे आपल्याला आढळून येतील.
कैकयी राणीला मंथरादासीने चुकीचा सल्ला दिला नसता तर 'रामायण' घडलेच नसते. नाही का?
महाभारतात कर्ण हा कुंतीचा ज्येष्ठ पुत्र असूनही दुर्योधनासारख्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाच्या संगतीमुळे सगळ्यांच्या प्रेमाला पारखा होतो.
निसर्गातील उदाहरण द्यायचे झाले तर केळीच्या वृक्षाशेजारी बोरीच्या काटेरी झाडाचे वाढणे किती धोकादायक! कारण केळीचे पान नाजूक, नखानेसुद्धा फाटणारे! त्याला जर बोरीचे अणकुचीदार काटे लागले तरी ते फाटल्याशिवाय राहील कसे?
Read also : हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध
Read also : हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध
बरं का दोस्तांनो, वाईट गोष्टींचे आपण चटकन अनुकरण करतो; पण चांगल्या गोष्टी शिकायला मात्र वेळ लागतो. चांगल्या गोष्टी आपल्याला सरस्वतीच्या मंदिरात म्हणजेच शाळेत शिकायला मिळतात. शाळेत आपल्यावर चांगले संस्कार होतात. आपले जीवन समृद्ध व्हावे, आपले भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून शाळेतच प्रयत्न होतात. आपल्या मित्रांवरून आपली पारख होते बरं का! आपल्याला चांगल्या गोष्टी सांगणारे, आपल्यातले दोष दूर करण्याचा प्रयत्न करणारे मित्र आपण करायला हवेत.
संगतीचा जसा वाईट परिणाम होतो तसाच चांगलाही होतो. आता हेच बघा ना, अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर लोकांना मारून त्यांचा अंगठा कापून आपल्या गळ्यातील माळ बनवायचा. एकदा गौतम बुद्धांनी त्याला झाडाचे पान तोडून आणायला सांगितले. पान तोडून आणल्यावर तेच पान त्याला परत जाऊन चिकटवण्यास सांगितले. “ते कसं शक्य आहे?" या अंगुलीमालच्या प्रश्नावर गौतम बुद्धांनी दिलेलं उत्तर काय होतं माहिती आहे? “जर चिटकवू शकत नाहीस तर तोडलंस का?" त्यानंतर मात्र अंगुलीमाल या दरोडेखोराच्या जीवनातच फरक पडला. आता तो एक सद्गृहस्थ झाला होता. जसा आपल्या वाल्याचा वाल्मीकी झाला ना अगदी तसा!
Read also : मला पंख असते तर मराठी निबंध
Read also : मला पंख असते तर मराठी निबंध
आपल्या जीवनाला चांगले किंवा वाईट वळण लागते ते आपल्या संगतीमुळेच, म्हणून आपली संगत चांगली असावी.
COMMENTS