Shaletil Gamti Jamti Essay in Marathi Language : Today, we are providing शालेय जीवनातील गमती जमती मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9,...
Shaletil Gamti Jamti Essay in Marathi Language: Today, we are providing शालेय जीवनातील गमती जमती मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Shaletil Gamti Jamti Essay in Marathi Language to complete their homework.
शालेय जीवनातील गमती जमती मराठी निबंध Shaletil Gamti Jamti Essay in Marathi
'रम्य ते बालपण'
खरंच अगदी या क्षणालापण मला लहान व्हावंसं वाटतंय. आपण शाळेत केलेल्या गमती-जमती आठवायला सुद्धा लागल्या की!
माझी शाळा आमच्या घरापासून खूपच जवळ होती, इतकी की शाळेची घंटाही मला ऐकू यायची. त्यामुळे शाळेत जाईपर्यंत माझा खेळ सुरूच असायचा.
एकदा तर काय, आम्ही मुले खेळात इतके रंगून गेलो की शाळेची घंटा ऐकूच आली नाही.
Read also : एकीचे बळ मराठी निबंध
तासाभराने आईच्या हाकेने भानावर आलो आणि धावत-पळत शाळा गाठली. पी. टी. शिक्षक परबसरांनी शिक्षा म्हणून मैदानावर ५० उठबशा तर काढायला लावल्याच; पण पाठीवर असा काही दणका घातला की दिवसा होळ्यांसमोर काजवे चमकले.
बऱ्याच मुलांसारखा माझाही नावडता विषय अर्थातच गणित. खरं तर, गणित शिकविणारे मानेसर खूप छान समजावून फळ्यावर गणित सोडवून सांगायचे; पण आम्ही पडलो कच्चे!
एकदा त्यांच्या तासाला मी माझ्या शेजारी बसणाऱ्या मित्राला मोरपीस दाखवत होतो. ते त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला फळ्यावर गणित सोडवून दाखवायला सांगितलं. बाप रे! एवढी मोठी शिक्षा? मला तर कापरंच भरलं. हातपाय थरथरायला लागले. आता सर्वांसमोर सर आपला कान धरणार, आपल्याला रागावणार या कल्पनेनं मी घाबरून गेलो. पुन्हा एकदा सरांनी मला हाक मारली. “चल, पटकन गणित सोडवून दाखव बरं! कालच आपण हे शिकलोय, चल ये."
Read also : माझा शाळेतील पहिला दिवस निबंध मराठी
मी भीत भीतच फळ्याजवळ गेलो. देवाचे नाव घेऊन हातात खडू घेतला. फळ्यावरचे गणित मन लावून सोडवू लागलो. एकामागोमाग एक पायऱ्या सोडवत उत्तरापर्यंत कधी पोहोचलो ते कळलचं नाही. अचानक भानावर आलो ते सरांच्या टाळ्या ऐकूनच. अरे, म्हणजे मी बरोबर गणित सोडवत होतो? सरांनी चक्क मला शाबासकी दिली. माझ्या वर्गमित्रांनीही टाळ्या वाजवून माझं कौतुक केलं.
त्या दिवसानंतर माझ्या मनातील गणिताबद्दलची भीती मात्र गायब झाली, ती कायमची! आणखी एक गंमत सांगण्यासारखी आहे.
माझा एक गणेश नावाचा मित्र रोजच मागच्या बाकावर मान खाली घालून झोपा काढायचा. एकदा मराठीच्या तासाला मॅडमच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याला उठवलं. तो खूप घाबरला होता. त्याला वाटलं मॅडम आता चांगलंच रागावणार! पण झालं उलटंच, मॅडमनी त्याला तोंड धुवायला खाली पाठवलं. आल्यावर त्याला आस्थेने जवळ घेऊन त्याची चौकशी केली. मॅडमचा अंदाज खरा ठरला. गणेश घरची गरिबी असल्याने सकाळी लवकर उठून पेपर आणि दूध घरोघर जाऊन देण्याचं काम करत असे; पण आम्हा मित्रांना सांगायला त्याला लाज वाटे. मॅडमला त्याने सांगितलं की, पेपर, दूध उशिरा मिळालं तर साहेबलोक रागे भरतात, कधी तर शिव्याही देतात, त्या ऐकायला नको म्हणून लवकरात लवकर सगळी कामे करतो. एवढ्या लहान वयात त्याला आलेला शहाणपणा आम्हा सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेला.
Read also : शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी
चिडवाचिडवी हा तर मधल्या सुट्टीतील आमचा आवडता खेळ. भराभर डबा संपवून खेळायचं. एकदा काय झालं एका मुलाला त्याच्या व्यंगावरून काही मुलांनी चिडवलं, तर तो रडायलाच लागला. सुट्टीनंतरच्या तासाला आलेल्या शिक्षकांना त्याने सगळयांची नावे सांगितली. "असं एकमेकांना चिडवून दुखवू नये. शारीरिक व्यंग जन्मतःच सोबत येतं." असं त्यांनी समजावल्यावर मात्र आमची चिडवाचिडवी बंद झाली.
अशा बालपणीच्या आठवणी मनाच्या कुपीत बंदिस्त होत्या. आज त्या कुपीचे झाकण उघडले आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळला.
आठवणी आठवल्या की, देवाकडे पुनःपुन्हा म्हणावेसे वाटते, “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा."
COMMENTS