Rajarshi Shahu Maharaj Nibandh in Marathi Language : Today, we are providing राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध, माहिती, भाषण For class 5...
Rajarshi Shahu Maharaj Nibandh in Marathi Language : Today, we are providing राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध, माहिती, भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Rajarshi Shahu Maharaj Nibandh in Marathi Language to complete their homework.
राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध Rajarshi Shahu Maharaj Nibandh in Marathi Language
जेव्हा समाजात 'अधर्म' माजतो तेव्हा धर्मरक्षणार्थ सत्पुरुषांचा जन्म होतो, असं म्हणतात.
थोर समाजसुधारक, बहुजन समाजाचा उद्धारक व कुशल राज्यकर्ता म्हणून ख्याती पावलेले कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागल येथे २६ जुलै १८७४ रोजी झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील आणि आई राधाबाई.
Read also : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध
Read also : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध
दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे शिवाजी महाराज यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च, १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले आणि ते कोल्हापूर राज्याचे छत्रपती शाहू महाराज झाले.
शाहू महाराजांचे व्यक्तिमत्त्व धिप्पाड होते. उंची ५ फूट ९ इंच आणि वजन १९७ पौंड होते. चालण्याची ढब मर्दानी ऐटबाज अशी होती.
आत्मसंयम आणि आत्मनिश्चय हे शाहू महाराजांचे दुर्मीळ गुण होते. अत्यंत चाणाक्ष, विलक्षण बुद्धिमत्ता लाभलेले; पण शांत स्वभावाचे ते राजे होते.
"महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी शाहू महाराजांचे स्थान फार वरच्या दर्जाचे आहे.” महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराजांच्या कार्याबद्दल दिलेली ही पावती किती बोलकी आहे.
Read also : छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध
Read also : छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध
'लोकांचा राजा' ही जनतेनेच त्यांना दिलेली पदवी होती. कोल्हापूर संस्थानचे अधिपति, बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न करणारे समाजसुधारक दलितांचा उद्धार करणारे, पुरोगामी दृष्टी असल्याने 'द्रष्टे पुरुष' म्हणून शाहू महाराज मान्यता पावले होते.
आर्थिक प्रगती साधण्यासाठी शेतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच देशाच्या उन्नतीसाठी उद्योग या दोन्ही क्षेत्रात सहकाराने आपण विकास साधू शकतो, हा 'द्रष्टा' विचार त्यांनी लोकांना दिला.
युरोपचा दौरा करून आल्यानंतर तेथील भौतिक प्रगती, शेती सुधारणा, उद्योगधंदे, धरणे, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, लोकशाही, जीवनपद्धती, वैज्ञानिक प्रगती, सार्वजनिक शिस्त, देशभक्तीची भावना या सर्वांचा महाराजांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.
खासबाग येथील कुस्त्यांचा आखाडा, नाटकासाठी भव्य पॅलेस थिएटर, भोगावती नदीवर बांधलेले राधानगरी धरण अशा मोठ्या प्रकल्पांची सुरुवात युरोप दौयानंतरच झाली.
Read also : लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध
Read also : लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध
नाटक, नृत्य इ. कला तसेच शाळेमधील व्यावसायिक शिक्षण, धार्मिक शिक्षण, संस्कार, सूतकताई, मातकाम, शेतकी, विणकाम इ. कडे स्वतः शाहू महाराज जातीने लक्ष घालत.
शूद्रातिशूद्रांच्या प्राथमिक शिक्षणाच्या बिकट प्रश्नास हात घालणाऱ्या म. जोतीराव फुल्यांनंतर राजर्षी शाहू महाराजांचेच नाव घेता येईल. शिक्षण ही सर्व प्रकारच्या सुधारणांची गुरुकिल्ली आहे, या विचारावर त्यांची नितांत श्रद्धा होती.
स्वावलंबन, स्वदेशी बलोपासना, राष्ट्रप्रेम यांचे संस्कार कीर्तनाद्वारे समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. स्वतः कीर्तन करून लोकशिक्षण करणारा हा राजा! कीर्तनाची कथानके छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरून गुंफलेली असत.
महाराजांचे शैक्षणिक कार्य महाराष्ट्रभर पसरले होते. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, उत्तमोत्तम शिक्षक आपल्या शिक्षण संस्थांवर त्यांनी नेमले. महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा शाहू महाराजांनी पुरस्कार केला.
१९१७ मध्ये पुनर्विवाह कायदा तर १९१८ मध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा करून तसे विवाहही घडवून आणले.
Read also : वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध
Read also : वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध
कै. डॉ. सूर्यकांत खांडेकर यांनी मोठ्या दिलाच्या, आदर्श राज्यकर्ता शाहू महाराजांना काव्यातून वाहिलेली ही श्रद्धांजली
"हिरे, माणके, सोने उधळा, जयजयकार करा।
जय राजर्षी शाहूराजा, तुजला हा मुजरा।
महाराष्ट्राचा उद्धारक तू, रयतेचा राजा।
पददलितांचा कैवारी तु, श्रमिकांचा राजा।
पराक्रमी तु, उज्ज्वल दैवत शूर मराठ्यांचे।
स्वातंत्र्याचे तूच मनोहर स्वप्न भारताचे।"
अशा या शिक्षणमहर्षीचे निधन ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे झाले.
COMMENTS