Putle Bolu Lagle Tar Marathi Nibandh : Today, we are providing पुतळे बोलू लागले तर मराठी निबंध लेखन For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ...
Putle Bolu Lagle Tar Marathi Nibandh : Today, we are providing पुतळे बोलू लागले तर मराठी निबंध लेखन For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Putle Bolu Lagle Tar Marathi Nibandh to complete their homework.
पुतळे बोलू लागले तर मराठी निबंध Putle Bolu Lagle Tar Marathi Nibandh
'जे देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले.'
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे या एकमेव ध्येयाने प्रेरित झालेल्या अनेक क्रांतिकारकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली, हा इतिहास आपणा सर्वांनाच ज्ञात आहे; तसेच समाजसुधारणेच्या ध्येयप्राप्तीसाठी स्वतः पणतीप्रमाणे जळून समाजाला प्रकाशाची वाट दाखविणाऱ्या थोर समाजसुधारकांनी केलेल्या असाधारण कार्याचे आभार शब्दांत व्यक्त करणे केवळ असंभव आहे.Read also : मी समाजसेवक झालो तर मराठी निबंध
छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, महर्षी धोंडो कर्वे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर या आणि अशा अनेक गुणवंतांच्या कार्याचा आदर्श सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावा, आपल्याला त्यातून प्रेरणा, स्फूर्ती मिळत राहावी म्हणून आपण त्यांची 'स्मृती' पुतळ्यांच्या रूपाने जतन करण्याचं ठरवलं खरं; पण हे पुतळे बोलू लागले तर... काय असतील त्यांचे विचार, त्यांच्या भावना?
मला वाटतं प्रत्येक पुतळा हेच म्हणेल, “बाबांनो, का रे आम्हा सर्वांना उन्हा-तान्हात, पाण्या-पावसात रात्रंदिवस उभं राहण्याची शिक्षा दिलीत? प्रवाहाविरुद्ध लढलो, हा आमचा गुन्हा झाला का रे?
Read also : वृत्तपत्रे बंद झाली तर मराठी निबंध
Read also : वृत्तपत्रे बंद झाली तर मराठी निबंध
गमतीचा भाग सोडून द्या. आम्हाला तुमच्या भावना कळतात बरं! पण खरं सांगा, आमच्या जयंती-पुण्यतिथीशिवाय तुम्हाला आमची आठवण कधी येते?
हां, त्या दिवशी मात्र आम्हाला स्वच्छ अंघोळ घालून, हार घालून मोठ्या समारंभपूर्वक आमचे पूजन करता. आमच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांसमोर भाषणे देता.
मी तर ऐकलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मुंबईमध्ये चक्क समुद्रात उभा करणार आहेत. छान कल्पना आहे! शिवरायांचे कार्यच इतके महान आहे की, प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा. मग शिवप्रेमींना ही कल्पना सुचली नसती तरच नवल होते. लंडनमध्ये तर संपूर्ण जगातील सुप्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे बनवून, त्यांना एकत्र ठेवून पुतळ्यांचं संमेलनच भरवलंय जणू! आपल्या देशातीलही काही जणांची तिकडे वर्णी लागलीय बरं का!
Read also : शालेय जीवनातील गमती जमती मराठी निबंध
तर असो, त्या संमेलनावरून धडा घेत बहुधा चौका-चौकात उभारलेले हे पुतळे आता एका 'राखीव' बागेमध्ये एकत्रित बसविण्यात येणार आहेत, असं माझ्या कानावर आलंय. का तर म्हणे, वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा येतो. रस्ते लहान पडताहेत! आणि खरचं आहे ते!
एक गंमत आठवली म्हणून सांगतो, मागच्या वर्षी 'सकाळ' या वृत्तपत्रातून आगळी-वेगळी एक स्पर्धा जाहीर झाली होती. पुणेकरांच्या 'जनरल नॉलेज'ची! स्पर्धा अशी होती की दररोज 'सकाळ' वृत्तपत्रातून एका चौकातील पुतळ्याचा फोटो प्रसिद्ध करून हा चौक कोणता आहे? आणि या चौकातील 'हा' पुतळा असणारी महान व्यक्ती कोण आहे?
ही अनोखी स्पर्धा पाहून आम्हाला तर हसूच आले. तुम्हाला काय वाटतं, किती जणांचे लक्ष रोजच्याच रस्त्यावरून जाताना तिथं असणाऱ्या पुतळ्याकडे जात असेल? कोण जिंकलं असेल ही स्पर्धा?
Read also : मला पंख फुटले तर निबंध माहिती
एखाद्या बागेत, हिरव्यागार वनश्रीच्या सान्निध्यात आम्हाला नेऊन बसवलं तर आमची काहीच हरकत नाही. सद्यःस्थितीवर गप्पा मारत-मारत आम्हा सर्वांच्या आयुष्याची संध्याकाळ तरी मजेत जाईल. नाही तरी चौकात उभं राहून गाड्यांचे कर्णकर्कश आवाज आणि धुरांचे लोट नाकातोंडात जाऊन आमचा जीव गुदमरतच होता; पण सांगणार कोणाला? तोंड दाबून प्रदूषणाचा मार!
शिवाय कोणाच्या न् कोणाच्या जयंती, पुण्यतिथीला तुम्ही यालंच की! त्या निमित्ताने कार्यकर्ते, नगरसेवक, मंत्री-महोदयही हजेरी लावतील आमची 'धुलाई होईल आणि तुम्हाला नाचायला-मिरवायला निमित्त मिळेल, नाही का? आणि वाहतुकीतला ‘अडसर दूर झाला म्हणून नागरिकही सुसाट वेगाने घराकडे धावतील.
Read also : वर्तमानपत्रे बंद झाली तर निबंध मराठी
दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत एक 'पर्यटन स्थळ' बालचमूंसाठी निर्माण झाल्यानं पालकही खूश होतील. एकाच वेळी वेगवेगळे पुतळे दाखवून 'इतिहास' शिकवण्याचा 'इतिहास' ते करतील आणि पुतळ्यांची विटंबना करून समाजात विद्रोह पसरवणाऱ्या देशद्रोहींना ती संधीच मिळणार नाही. त्यामुळे पोलिसांवरील 'ताणही थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल, हे निश्चित! इतर गोष्टींप्रमाणे याही गोष्टीत पाश्चात्त्यांचं अनुकरण करायला काय हरकत आहे?
कालाय तस्मै नमः।
COMMENTS