Pavsalyatil Ek Divas Essay in Marathi Language : Today, we are providing पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10,...
Pavsalyatil Ek Divas Essay in Marathi Language : Today, we are providing पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Pavsalyatil Ek Divas Essay in Marathi Language to complete their homework.
पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध Pavsalyatil Ek Divas Marathi Nibandh
उन्हाळी सुट्टी संपून नुकतीच शाळा सुरू झाली होती. जूनचा मध्य उजाडला होता, तरीही पावसाची चिन्हे दिसत नव्हती.
यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली होती. संपूर्ण उन्हाळ्यात कडकडीत उन्हाने धरणीमाता तापून गेली होती. वळवाचा पाऊसही पडला नव्हता. जमिनीला भेगा पडल्या होत्या.
गावाबरोबरच शहरातही पाणीटंचाई तीव्रतेने जाणवत होती. शेतकरी, पक्षी, प्राणी सगळेच जण पावसाची चातकासारखी आतुरतेने वाट पाहत होते.
Read also : शालेय जीवनातील गमती जमती मराठी निबंध
त्या दिवशी मी नेहमीसारखाच सकाळी ११ वाजता शाळेत जायला निघालो. म्हणायला पावसाचे दिवस; पण कडकडीत ऊन असल्याने मी रेनकोट बरोबर घेतला नव्हता. माझी शाळा घरापासून लांब आहे. आजूबाजूची दुकाने, घरे, बसेस, गाड्या बघत रमत-गमत मी चाललो होतो.
Read also : शालेय जीवनातील गमती जमती मराठी निबंध
त्या दिवशी मी नेहमीसारखाच सकाळी ११ वाजता शाळेत जायला निघालो. म्हणायला पावसाचे दिवस; पण कडकडीत ऊन असल्याने मी रेनकोट बरोबर घेतला नव्हता. माझी शाळा घरापासून लांब आहे. आजूबाजूची दुकाने, घरे, बसेस, गाड्या बघत रमत-गमत मी चाललो होतो.
अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. धुळीचे चक्रीवादळ जमिनीवर घुमू लागले. पांढरे ढग काळे होऊ लागले. ऊन दिसेनासे होऊन होरपळणारी सृष्टी ढगांच्या सावलीखाली झाकली गेली. विजांचा कडकडाट झाला आणि त्यापाठोपाठ गारांचा मारा व पावसाचे टपोरे थेंबही कोसळू लागले.
मी भिजू नये म्हणून एका घराच्या आडोशाला उभा राहून रस्त्यावरची गंमत मोठ्या उत्सुकतेने न्याहाळत होतो. पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी लहान मुलांबरोबर मोठी माणसेही घराबाहेर आली होती, गारा वेचत होती. सगळेजण पावसाच्या धारांमध्ये मनसोक्त भिजत नाचत होते.
Read also : माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध
Read also : माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध
रस्त्यावरून मातीमिश्रित पाण्याचे लोट वाहू लागले. रस्त्यातील खड्डे पाण्याने भरले. पक्षी आनंदाने चिवचिवाट करू लागले. आपले पंख पसरून इकडूनतिकडे उगीचच मिरवू लागले. झाडे-झुडपे अंघोळ केल्यासारखी स्वच्छ होऊन आनंदाने डुलू लागली. धुळीने भरलेल्या बसेसही चकाकू लागल्या आणि हे काय? मी पावसाची गंमत बघत इथं काय उभा राहिलोय? मला शाळेत नाही का जायचं? आता उशीर झाला म्हणून पीटीचे शिक्षक तांबोळी सर मला मैदानावर भर पावसात उभं तर करणार नाहीत ना दिवसभर? आणि मग सर्दी, डॉक्टर, औषधे नको रे बाबा! असा विचार करून मी घाईघाईने, रस्त्याच्या कडेने शाळेकडे निघालो.
Read also : माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध
एवढ्यात एक बस खड्डा चुकविण्यासाठी माझ्या इतकी जवळ आली की हॉर्न ऐकून मी दचकलोच. बसने एक खड्डा चुकवला खरा; पण रस्त्यावरच्या दुसऱ्या खल्यात तिचे चाक गेले आणि त्यात साठलेले पाणी माझ्या अंगावर एखाद्या कारंज्यासारखे उडाले. शी! मी त्या चिखलमिश्रित पाण्याने न्हाऊन निघालो आणि माझे कपडे घाण झाले. आता अशा अवतारात मी शाळेत कसा जाणार? माझं हसंच होईल म्हणून मी माघारी घराकडे वळालो; पण आता रस्त्याच्या कडेने न जाता चक्क पावसात भिजत भिजत त्याचा आनंद घेत चाललो होतो, मनात पावसाचे आभार मानत. कारण काल सुट्टी असूनही खेळण्याच्या नादात गणिताचा गृहपाठ करायलाच विसरलो होतो; पण शिक्षक रागावतील म्हणून आईने थोडेच घरी राहू दिले असते? आता मला आयते कारणच मिळाले. शिवाय आईपण आजच्या पावसाने खूशच असणार! कारण तिचा आवडता पावसाळा आजपासून सुरू झाला होता ना!
Thank you for this
ReplyDelete