Mi Shetkari Boltoy Marathi Nibandh and Speech : Today, we are providing मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध आत्मकथा For class 5, 6, 7, 8, 9, 1...
Mi Shetkari Boltoy Marathi Nibandh and Speech : Today, we are providing मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध आत्मकथा For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mi Shetkari Boltoy Marathi Nibandh and Speech to complete their homework.
मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध Mi Shetkari Boltoy Marathi Nibandh and Speech
"काया मातीत, मातीत तिफन चालते
तिफन चालते..." रामराम मंडळी, मी शेतकरी बोलतोय. कुणी मला अन्नदाता, तर कुणी मला बळीराजा म्हणतात.
आपल्या देशात ७० टक्के शेती होती. आपला देश कृषिप्रधान देश म्हणून
Read also : मी संगणक बोलतोय मराठी निबंध
Read also : मी संगणक बोलतोय मराठी निबंध
ओळखला जायचा. पावसाचा लहरीपणा म्हणून म्हणा किंवा वाढती लोकसंख्या म्हणून म्हणा किंवा साक्षरता वाढली म्हणून म्हणा, लोकांनी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवून आपल्या शेतजमिनी विकायला सुरुवात केली आणि गावांचे स्वरूपच बदलू लागले की हो!
वैशाख वणवा कधी एकदा संपतोय, असं आम्हाला होऊन जातं. जमिनीची आणि अंगाचीही काहिली झालेली असते. जनावरांच्या आणि माणसांच्याही पाण्याची गंभीर समस्या सतावत असते.
शेतकरी मोठ्या आशेने आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो. आणि अचानक 'ढग ढोल वाजवतो, वीज थयथय नाचते' असे दृश्य डोळ्यांसमोर येते आणि माझ्या डोळ्यात 'हिरवं स्वप्न' तरळू लागते. मग आम्हा शेतकरीबांधवांची लगबग सुरू होते.
Read also : मी निसर्ग बोलतोय मराठी निबंध
Read also : मी निसर्ग बोलतोय मराठी निबंध
दिवस-रात्र शेतात कष्ट करण्याची आमची तयारी असते. पाऊस वेळेवर आणि हवा तेवढा पडला तर शेतात धान्य, भाज्यांची समृद्धी पाहून आमचा जीव हरखून जातो; पण असं नेहमीच घडत नाही. निसर्गामध्ये मानवाने हस्तक्षेप केल्यामुळे निसर्गराजा रुसला तर नसेल ना?
गरिबी, कर्जबाजारीपणा, निरक्षरता या कारणांमुळे आम्ही आमचा माल शहरापर्यंत नेऊ शकत नाही, नेमका याचाच गैरफायदा 'दलाल' घेतात. आमचा माल कवडीमोलाने घेऊन तो शहरात विकून ते 'मालामाल' होतात.
एकदा माझ्या शेतात मी टोमॅटो पिकवले होते. आदल्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव आल्याचे कळले होते म्हणून; पण माझ्यासारख्याच बांधवांनीही हाच विचार करून टोमॅटोचे पीक घेतले. झालं, परिणाम व्हायचा तोच झाला. बाजारात बघतो तो सगळीकडे लाल लाल टोमॅटो. इतक्या मेहनतीने, कष्टाने पिकवलेले टोमॅटो कमी भावाने विकताना डोळ्यांत अश्रू आले.
Read also : मी रविवार बोलतोय मराठी निबंध
Read also : मी रविवार बोलतोय मराठी निबंध
आमचं जगणंच मुळी पावसावर अवलंबून आहे. त्याच्या लहरीपणामुळे मी माझ्या घरातल्या, कुटुंबाच्या गरजाही भागवू शकत नाही. मग नैराश्य येतं आणि कमकुवत मनाचा माझा एखादा बांधव आत्महत्येसारखं पाप करून आपल्या कुटुंबियांना दुःखाच्या खाईत लोटतो.
मी मात्र ठरवलंय, माझ्या लेकराबाळांना शाळा शिकवणार. शिक्षणाचं महत्त्व मी जाणलंय. शेतीसंबंधी असणाऱ्या शिक्षणामुळे माझी मुले नवनवीन प्रयोग करतील आणि आपल्या कुटुंबाला सुखी करतील.
मी शिकलो नाही म्हणून सावकाराच्या जाळ्यात अडकलो. कारण बी-बियाणं, शेतीची अवजारं, नांगरायला बैल यासाठी लागणारे पैसे व्याजानं सावकाराशिवाय कोण हो देणार? मग काय, तो सांगेल त्या कागदावर गुपचूप अंगठा द्यावा लागतो.
Read also : मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी
Read also : मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी
तसं चावडीवर बसल्यावर सरकारच्या काही योजनेविषयी येतं कानावर म्हणा! शिक्षणामुळं गावातही खूप बदल होतोय ही चांगली बाब आहे; पण शेतीची जमीन घरे बांधण्यासाठी विकणं कितपत खरं आहे? अहो, अन्न ही तर आपली पहिली गरज आहे. खायलाचं नसेल तर जगालच कसे?
म्हणून मला वाटतं सरकारने 'बळीराजा'चा विचार सर्वांत आधी करायला हवा. त्याच्या गरजांकडे लक्ष द्यायला हवं. आम्हाला 'अन्नदाता' म्हणता आणि आम्हीच उपासमारीनं मरावं का?
तुमच्याशी बोलून मन हलकं झालं बघा. बरं मग येतो तर आता, ओळख ठेवा बरं का पाव्हणं.
COMMENTS