Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh : Today, we are providing मी संगणक बोलतोय मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Stude...
Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh : Today, we are providing मी संगणक बोलतोय मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh to complete their homework.
मी संगणक बोलतोय मराठी निबंध Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh
विज्ञानाचे युग हे आले,
चला, सामोरे जाऊ या वर्गात मॅडम कविता शिकवत होत्या. मॅडमनी मध्येच प्रश्न विचारला, “विज्ञानाचे युग म्हणजे काय सांगाल बरं?" "मॅडम, मी सांगू?" संग्राम नावाचा चुणचुणीत मुलगा पटकनं उभा राहिला. मॅडम, आता आपण सगळीकडेच संगणकाचा वापर म्हणजेच विज्ञानाचा वापर करतो. मोबाइलचा, लिफ्टचा करतो, म्हणजे विज्ञानाचा वापर करून कमी श्रमांत काम करतो त्यालाच विज्ञानाचे युग म्हणायचे ना?" हो! अगदी बरोबर उत्तर दिलंस तू." "चला, तर मग आज गृहपाठ म्हणून घरून एक निबंधच लिहून आणा." निबंधाचा विषय 'मी संगणक बोलतोय....'
Read also : मी निसर्ग बोलतोय मराठी निबंध
Read also : मी निसर्ग बोलतोय मराठी निबंध
"मित्रांनो, तुम्ही जशी पुस्तकांशी मैत्री करता तशीच माझ्याशीपण मैत्री करा मग पहा, तुमच्या प्रत्येक कामात मी मित्रासारखाच धावून येतो की नाही ते!
अगदी सुरुवातीला मी जेव्हा भारतात आलो तेव्हा माझी किंमत आणि माझी घ्यावी लागणारी काळजी यामुळे सगळ्यांनाच मला स्वतःजवळ बाळगणे शक्य नव्हते; पण आता तुम्ही पाहताच की पोस्ट, बँका, मोठमोठे मॉल्स, सिनेमा तिकिटे, रेल्वे, आरक्षण, शाळा, मोठी कार्यालये, एवढेच नाही तर जवळजवळ घरोघरी माझे दर्शन तुम्हाला होते.
तुम्हाला नुकतीच शाळेत जाणारी मुले संगणकावर खेळ खेळताना दिसतील. अगदी लीलया त्यांची छोटी-छोटी बोटे माझ्या अंगाखांद्यावर फिरतात, किती आनंद होतो म्हणून सांगू? कारण हीच मुले उद्याच्या भारताची शिल्पकार असतील. आपल्या माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं “२०२० साल भारत महासत्ताक राष्ट्र बनेल" हे स्वप्न ते सत्यात उतरवतील. गेल्या काही दशकांत माझ्यामुळेच तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. असं एकही क्षेत्र उरलं नाही जिथं माझा वापर होत नाही.
Read also : मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी
Read also : मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी
मी तुम्हा माणसांपेक्षा कित्येक पटींनी जास्त वेगाने आणि जादा काम करू शकतो. किचकट हिशोबसुद्धा काही सेकंदात करून मोकळा होतो; पण मला दिलेली माहिती मात्र अचूक हवी बरं का! तुम्ही चुकीची माहिती दिलीत तर उत्तरंही चुकीचीच मिळणार. नाही का?
माझ्या पोटामध्ये प्रचंड प्रमाणात माहितीचा साठा करून ठेवता येतो. मग हव्या त्या वेळी हवी ती माहिती तुम्हाला चटकन पाहता येते.
आणि हां, मी तुमच्यासारखे खूप काम केलं म्हणून दमत नाही हं! एकच काम सारख्याच अचूकतेने करण्यात माझा हात कुणीही धरू शकणार नाही.
विविध प्रकारची कामे करणारा मी एक शक्तिशाली, बलशाली, हरहुन्नरी कलावंतच आहे.
माझ्याकडे तुमच्या अनमोल वेळेची बचत होते. हाताने काम करत दमण्यापेक्षा मी ते काम चटकन उरकतो आणि तुम्हाला आरामही मिळतो.
Read also : माझे आजोबा मराठी निबंध
Read also : माझे आजोबा मराठी निबंध
आज बाजारात माझी भावंडे वेगवेगळ्या नावाने तुम्हाला दुकानांमध्ये पहायला मिळतील. माझ्याहीपेक्षा कितीतरी गुणी! डेस्कटॉप्स आणि टॉवर्स, लॅपटॉप आणि नोटबुक्स (ह तर अगदी कमी वजनाचे, हवे तिथे हलवता येणारे) हॅण्डहोल्ड (ह कुठेही घेऊन जाता येणारे, तुमच्या खिशातही सहज मावू शकेल असे), टॅब्लेट पीसीज् हा तर एक विशिष्ट पेनाने आपल्या अंगावर नोंदी करून घेतो. शिवाय लिहून घेतलेल्या मजकुरात बदलही करून देऊ शकतो.
जगभरातली माझी हजारो भावंडे 'इंटरनेट'ने एकमेकांशी संपर्कात राहतात. इंटरनेट हे 'दुहेरी दिशा असलेले' प्रसारमाध्यम आहे.
माझी अंतर्गत रचना किचकट वाटत असली तरी एकदा का तुम्ही माझ्याशी दोस्तीचा हात पुढे केलात की, पाहा मी काय काय कमाल करून दाखवतो ते!
माझ्याशी खेळता खेळता वेबसाइट, पासवर्ड, ई-मेल, इंटरनेट, माऊस, ईबँकिंग, सर्च चॅटिंग, ई-बुक, वेबकॅम, लॉगऑन, ब्लॉग, ऑनलाइन, टेलीकॉन्फरन्सिंग अशा अनेक इंग्रजी शब्दांची तुम्हाला ओळख होईल.
Read also : मी रविवार बोलतोय मराठी निबंध
Read also : मी रविवार बोलतोय मराठी निबंध
संगणकावर रोज वृत्तपत्र वाचणे, महाविद्यालयात प्रवेश घेणे, विजेचे, दूरध्वनीचे बिल भरणे ही कामे तर होतातच; पण अमेरिकेतील डॉक्टरांच्या सूचनेनुसार इथं भारतातील अवघड शस्त्रक्रियापण पार पाडतात, हे आश्चर्य नाही का?
संपूर्ण जगाला जवळ आणण्याचं काम मी करतोय. ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. त्याच आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणजे माझा शोध होय.
मग मित्रांनो, तुम्ही तुमच्या आजी-आजोबांनाही 'संगणक साक्षर बनवणार ना?"
COMMENTS