Mi Nisarg Boltoy Marathi Nibandh and Speech : Today, we are providing मी निसर्ग बोलतोय मराठी निबंध भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11...
Mi Nisarg Boltoy Marathi Nibandh and Speech : Today, we are providing मी निसर्ग बोलतोय मराठी निबंध भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mi Nisarg Boltoy Marathi Nibandh and Speech to complete their homework.
मी निसर्ग बोलतोय मराठी निबंध भाषण Mi Nisarg Boltoy Marathi Nibandh and Speech
'देवा, तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो.' इयत्ता दुसरीच्या वर्गातील मुले मोठ्या आवाजात कविता म्हणत होती. खूप छान कविता आहे ही, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी!
Read also : मी रविवार बोलतोय मराठी निबंध
Read also : मी रविवार बोलतोय मराठी निबंध
निसर्ग मानवाचा मित्र आहे, त्याचा श्वास आहे. निसर्गाचा अन् मानवाचा जन्मोजन्मी असणारा ऋणानुबंध अधिकाधिक घट्ट होण्यासाठीच तर तुमच्या पाठ्यपुस्तकातील गद्य-पद्य पाठांची योजना असते ना! कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता मी 'निसर्ग' तुम्हा सर्वांना भरभरून देत असतो, याची जाणीव नाही का ठेवणार?
हिरवेगार गालिचे, विविध रंगी फुलपाखरे, फुलांचे सुंदर रंग, त्यांचे देखणेपण आणि त्यांचा गंध, खळखळत वाहणाऱ्या नद्या, लाटांनी गर्जना करणारे समुद्र, झाडांनी झाकलेले डोंगर, दऱ्या-खोऱ्यातून सळसळणारा वारा, मोर, वाघ, हत्ती यासारखे प्राणी आणि पक्षी ही सगळी माझीच रूपे !
Read also : निसर्ग माझा गुरु मराठी निबंध
Read also : निसर्ग माझा गुरु मराठी निबंध
ओळखलंत ना आता, मी निसर्ग या माझ्या विविध रूपांमधून तुम्हाला नेहमीच भेटतो. माझ्या सानिध्यात राहायला तुम्ही खूप उत्सुक असता. शाळेला सुट्टी लागायचा अवकाश की कथी एकदा गावी जातो, असं तुम्हाला वाटतं.
गावाकडच्या नदीत तासन्तास डुंबत राहायला, शेतातून फिरायला, डोंगर चढायला, कैया, करवंदे काढायला तुम्हाला खूप आवडतं ना?
गावामध्ये शहरासारखं सिमेंटचं जंगल नसतं. गावात रात्री अंगणात झोपून आकाशातील चांदण्या मोजण्याचा खेळ तुम्ही खेळता, सुरपारंब्यासारख्या खेळांनी भूकही चांगली लागते आणि झोप ही!
माझं महत्त्व जाणता; पण स्वार्थासाठी निर्दयीपणे माझ्या शरीरावर घाव घालता, नद्यांना बांध घालता, बेछूट वृक्षतोड करता, वने भुईसपाट करता, प्राण्या-पक्ष्यांना बेघर करता. या तुमच्या सर्व कर्माची फळे तुम्हालाच भोगावी लागणार आहेत. "वृक्षो रक्षति रक्षित” हे माहीत असूनही तुम्ही निसर्गामध्ये हस्तक्षेप करता.
"आधीच त्यांनी केला झाडावरती घाव।
पाणी-पाणी करत खुळे, फिरती गावोगाव ।।" ही अवस्था यायला कितीसा वेळ लागेल?
Read also : मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी
Read also : मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी
वृक्षांचा महिमा काय वर्णावा? आपली पाने, फुले, फळे एवढेच नाहीतर आपले संपूर्ण शरीर मानवाच्या चरणी अर्पून ते जगतात. मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा वृक्ष भागवतात. हे वृक्ष, या नद्या यांचं अस्तित्व धोक्यात आणलंय मानवाने! वृक्ष नसतील तर पाणी नाही आणि पाणी म्हणजे जीवन. त्यामुळे मानवाचे अस्तित्वच नष्ट व्हायला कितीसा वेळ लागेल?
'बहुरत्नां वसुंधरा । जाण जाणो विचार करा ।'
हे तुम्ही जाणता, तरी निसर्गापासून दूर जाता. जंगल तोडीमुळे नैसर्गिक पर्यावरणाशी संबंधच त्यामुळे तुटतो. नैसर्गिक साखळीही नष्ट होते.
तुम्ही प्राणी-पक्ष्यांची हत्या करता, मला हे आवडत असेल का? मोठ-मोठे कारखाने बांधून दूषित हवा वातावरणामध्ये मिसळून प्रदूषण वाढवता, त्यामुळे आवश्यक ती शुद्ध हवा न मिळाल्याने अनेक आजारांना तुम्हीच बळी पडता. आपल्या बुद्धीच्या आणि कार्यक्षमतेच्या जोरावर 'निसर्गाचा स्वामी' बनल्यासारखं तुम्ही वागत आहात. अहंकार आणि अविचाराने माझ्यावरच नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत एका भीषण शोकांतिकेची सुरुवात तुम्ही केलीत; पण अजूनही वेळ गेलेली नाही. पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही. तद्वत पर्यावरणाशिवाय माणूस जगणं अशक्य, हे त्रिकालाबाधित सत्य तुम्ही कसं जाणत नाही?
Read also : माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध
Read also : माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध
आपली भूमी, हवा, पाणी, वनश्री आणि साधनसंपत्ती या सर्वांचे जतन आणि संवर्धन करणं तुमच्याच हातात आहे. मित्रांनो, एक मोलाचा सल्ला ऐकताल माझा?
"झाडे असती मित्र आमुचे, त्यांच्याशी दोस्ती करायची! मायेनं ती वाढवायची, उगीच नाही तोडायची!
डोंगर, टेकड्या आमचे साथी, लावून झाडे त्यावर आपण, शोभा त्यांची वाढवायची!"
COMMENTS