Maza Avadta Sant Gadge Baba Marathi Nibandh : Today, we are providing माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10,...
Maza Avadta Sant Gadge Baba Marathi Nibandh : Today, we are providing माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maza Avadta Sant Gadge Baba Marathi Nibandh Lekhan to complete their homework.
माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध Maza Avadta Sant Gadge Baba Marathi Nibandh
संत महात्मे होऊन गेले।
चरित्र त्यांचे पहा जरा।
आपण त्यांचे विचार ऐकावे ।
हाच सापडे बोध खरा ॥
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ही संतमंडळी नसती तर तळागाळापर्यंत धर्माचे ज्ञान पोहोचले नसते.
संतांनी सांगितलेला धर्म कर्मकांडापुरता मर्यादित नव्हता, तर मानवता धर्म हाच खरा श्रेष्ठ धर्म आहे, असा विचार त्यांनी मांडला.
Read also : गाडगे महाराज मराठी माहिती
Read also : गाडगे महाराज मराठी माहिती
संत ज्ञानेश्वर ज्यांनी विश्वशांतीसाठी देवाजवळ पसायदान मागितले, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' म्हणून पर्यावरणाचे महत्त्व आपल्या अभंग आणि ओव्यांमधून पटवून देणारे विश्ववंद्य संत तुकाराम महाराज, आधी प्रपंच करावा नेटका असे बजावणारे, शिवरायांच्या स्वराज्य उभारणीस प्रोत्साहन देणारे राष्ट्रसंत रामदास, ग्रामविकासाचे महत्त्व जाणून त्याच कार्याला जीवन समर्पित करणारे व ग्रामगीत लिहिणारे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज, पंजाबपर्यंत महाराष्ट्राची संत परंपरा नेणारे संत नामदेव तसेच ग्रामीण भागातील अज्ञानी लोकांना आपल्या ज्वलंत कीर्तनाने प्रेरित करणारे संत गाडगे महाराज. अशा श्रेष्ठ संतांच्या योगदानाने आपली महाराष्ट्र भूमी पावन झाली आहे.
Read also : माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी
Read also : माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी
गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी, १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. आईचे नाव सखूबाई. कीर्तन व स्वतःचे आचरण याद्वारे बहुजन समाजातील मागासवर्गीयांमधील अंधश्रद्धा, अज्ञान, आळस, व्यसन, कर्मकांड यांची जळमटे दूर करणारे, समाजाला जागवणारे संत गाडगे महाराज हे माझे आवडते संत आहेत.
त्यांनी समाजाला स्वच्छतेचा, आरोग्याचा मंत्र दिला म्हणून ते समाजसेवकही होते.
"दगडाच्या देवा दह्याच्या घागरी ।
गरिबाच्या घरी ताक नाही ॥"
कर्मकांड, अंधरूढींवर प्रहार करणारे अभंग-चरण ते गात.
असा कसा तुमचा देव ।
कोंबड्याचा घेतो जीव?
जनजागृतीसाठी आपल्या काही टाळकऱ्यांसमवेत गावोगाव ते कीर्तन करीत फिरत असत. मधूनच श्रोत्यांना खोचक प्रश्न विचारून स्वतःच त्यांची उत्तरे देत. स्वच्छतेचे मूल्य समाजाला समजावण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले. अस्वच्छता, दूषित पाणी हे आपले शत्रू आहेत. त्यांना दूर सारण्यासाठी बाबांनी स्वतः हातात खराटा आणि झाडू घेतला. पाणवठा, उकिरडा, बखळी, पटांगण, देवालय स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला. प्राणी, पक्षी, जनावरं या सर्वांमध्ये जीव असतो, तो आपण जाणला पाहिजे, ही त्यांची शिकवण.
Read also : माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध
Read also : माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध
“जीव वाचोनं पुण्य, जीव घेणं पाप' ही भूतदया त्यांना त्यांच्या अशिक्षित आईकडून लहानपणीच शिकायला मिळाली.
पंढरपूर, देहू, आळंदी अशा तीर्थक्षेत्री यात्रेकरूंना विनामूल्य राहता यावे म्हणून धनिकांकडून देणग्या मिळवून धर्मशाळा बांधल्या. स्वतः शिकलेले नसले तरी प्रखर आणि चिकित्सक बुद्धीमुळे भोवतालचा बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा आणि व्यसनांमध्ये बुडून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत असल्याचं लक्षात आल्यानं कीर्तनांतून समाजाचा उद्धार करण्याचं त्यांनी ठरवलं.
कण कण करुनि बाबा झिजले
दुःखी भोळ्या लोकांसाठी।
वण वण करुनि जना शिकविले
स्वच्छ, सुखी हे जगण्यासाठी ॥
आजही कुठल्या संसर्गजन्य आजाराची चाहूल लागली तर संत गाडगे महाराजांच्या स्वच्छता अभियानाची आठवण होते. 'गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला' असं भजन करीत या थोर समाजसेवक संताचा मृत्यू २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती येथे झाला.
Read also : माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध
COMMENTS