Maza Avadta Kavi Kusumagraj Marathi Nibandh : Today, we are providing माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10...
Maza Avadta Kavi Kusumagraj Marathi Nibandh : Today, we are providing माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maza Avadta Kavi Kusumagraj Marathi Nibandh to complete their homework.
माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध Maza Avadta Kavi Kusumagraj Marathi Nibandh
“नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत; पण त्याहून सुंदर आहे तो माणूस!" हे उत्कट उद्गार आहेत कविवर्य कुसुमाग्रज यांचे. त्यांचा जन्मदिन जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो. कुसुम या त्यांच्या बहिणीचे मोठे बंधू म्हणून कुसुमाग्रज, लेखक वि. वा. शिरवाडकर आणि सामाजिक बांधिलकी जपणारे तात्या! एकच.
'कुसुमाग्रज' या नावाने त्यांनी काव्यलेणी कोरली. 'तात्यासाहेब' या नावाने माणसांच्या मैफिलीत रमलेल्या एकाच व्यक्तीची ही तीन रूपे!
Read also : माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध
Read also : माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध
२७ फेब्रुवारी, १९१२ रोजी सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यनगरीत तात्यासाहेबांचा जन्म झाला.
एक कवी, कलावंत आणि मनस्वी माणूस म्हणून लोकांनी तात्यासाहेबांवर उदंड प्रेम केले.
'विशाखा' या काव्यसंग्रहाने त्यांना उदंड कीर्ती मिळवून दिली. काव्याबरोबर कथा, कादंबरी, नाट्यलेखन अशा अनेक लेखनकलांनीही ते समृद्ध होते.
रसिकांना भरभरून काव्यानंद देणारे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, संवेदनशील मनाचे कवी कुसुमाग्रज आपल्या काव्यांतून समाजाच्या वेगवेगळ्या थरांतील लोकांच्या अडीअडचणी, अन्यायाबद्दलची चीड, स्वातंत्र्यभाव, तळागाळातील लोकांबद्दल जिव्हाळा व्यक्त करतात.
'गगनापरी जगावे, मेघापरी मरावे,
तीरावर नदीच्या, गवतातुनी उरावे'
कसं जगावं, असा प्रेमळ सल्ला ते देतात.
'कशास आई भिजविसि डोळे, उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषाकाल'
या ओळी प्रत्येक राष्ट्रप्रेमीच्या मनात, स्वातंत्र्यासाठी प्रेरणा व आश्वासन देणाऱ्याच ठरल्या.
'कणा' या कवितेतून शिक्षक आणि विद्यार्थी यामधील तरल नातं ते उलगडून दाखवितात.
'पैसे नकोत, सर
जरा एकटेपणा वाटला
पाठीवरती हात ठेवून
नुसते लढ म्हणा!'
यातून प्रयत्नवादाचा पुरस्कार, प्रसंगाला तोंड देण्यासाठी समर्थ हाताची गरज ते पूर्ण करतात.
'कोलंबसाचे गर्वगीत' ही कविता उच्चतम ध्येयवाद अंगात बाणवण्याची प्रेरणा देते.
Read also : सुमंत मुळगावकर माहिती मराठी
Read also : सुमंत मुळगावकर माहिती मराठी
सूर्याच्या भोवती पृथ्वीची प्रदक्षिणा हे भौगोलिक सत्य 'पृथ्वीचे प्रेमगीत' या अप्रतिम प्रेमगीतातून ते उत्कटपणे सादर करतात.
'प्रिय हा भारत देश', 'गर्जा जयजयकार' अशा काव्यातून देशाभिमान, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूची पर्वा न करणारे देशभक्त, सत्याग्रही डोळ्यांसमोर उभे राहतात.
मराठीच्या पाठ्यपुस्तकातून त्यांची दरवर्षी नव्याने ओळख होत गेली. कथी 'नटसम्राट'मधील आप्पा बेलवलकर भावले, तर कधी सरदारांच्या पराक्रमाची गाथा गाणाऱ्या 'सात' या कथाकाव्यांतून, तर कधी विषण्ण मनाने दुखावलेल्या 'जालियानवाला बाग' काव्यातून ते काळजाला भिडले.
कुसुमाग्रजांची मानवतेवर असीम श्रद्धा होती. त्यांच्या लेखनाला कारुण्याची झाक आहे. आपल्या शब्दज्योतींनी त्यांनी मानवी मनातले अग्निकण फुलविले. माणसातल्या सत्याचे, शिवाचे, सुंदरतेचे दर्शन घडविले.
तात्यासाहेबांच्या साहित्य सत्तेचा सन्मान पुणे विद्यापीठाने त्यांना 'डी.लिट.' पदवी देऊन केला, तर साहित्य मंडळाने 'गौरव वृत्ती' प्रदान करून त्यांचा सत्कार केला.
Read also : महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध
Read also : महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध
तात्यांच्या ८५व्या वाढदिवशी स्वित्झर्लंडमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री या ख्यातनाम संस्थेने या महाकवीचे नाव आकाशातील एका नक्षत्राला देऊन त्यांना आगळी व अजरामर भेट दिली. तात्यासाहेबांच्या इच्छापत्रानुसार साहित्य, भाषा, विज्ञान, कला, क्रीडा आदी क्षेत्रांतील कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेल्या 'कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्य आदर्शवत चालले आहे. त्यातूनच गोदागौरव पुरस्कार, जनस्थान पुरस्कारांची निर्मिती झाली.
नाशिक येथील कुसुमाग्रज काव्य उद्यान म्हणजे एका ऋषितुल्य महाकवींचा वरप्रस्थाश्रमच जणू!
'जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी,
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहील मी'
असं म्हणत १० मार्च, १९९९ रोजी नाशिक येथे त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकाशाचे वेड असलेला हा कवी नक्षत्ररूपाने साऱ्या जगालाच प्रकाश देत राहील! अगदी जगाच्या अंतापर्यंत!
COMMENTS