Maza Avadta Chand Marathi Nibandh Lekhan : Today, we are providing माझा आवडता छंद मराठी निबंध लेखन For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ...
Maza Avadta Chand Marathi Nibandh Lekhan : Today, we are providing माझा आवडता छंद मराठी निबंध लेखन For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maza Avadta Chand Marathi Nibandh Lekhan to complete their homework.
माझा आवडता छंद मराठी निबंध लेखन Maza Avadta Chand Marathi Nibandh Lekhan
काल रविवार होता. शाळेला सुट्टीच होती. म्हणून संध्याकाळी बाबा मला म्हणाले, “चल, आज तुला एक अनोखे प्रदर्शन पहायला नेतो.” मित्रांनो, त्या प्रदर्शनात मी काय-काय पाहिलं सांगू?
छोटा हंडा, छोटी कळशी, छोटी परात, छोटा गॅस, छोटा मिक्सर, छोटं घंगाळ, छोटी बादली, छोटी सांडशी, छोटी-छोटी पातेली, छोट्या-छोट्या बरण्या असा सगळा भातुकलीचा तांब्या-पितळीचा संसार!
Read also : माझा आवडता छंद गायन, वाचन मराठी निबंध
Read also : माझा आवडता छंद गायन, वाचन मराठी निबंध
जवळजवळ १००० छोटी भांडी तिथं छान मांडून त्यांचं प्रदर्शन भरवलं होतं. प्रदर्शन पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही ओसंडून वाहत होतं. प्रदर्शन भरविणारे पती-पत्नी दोघंही येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे समाधानाने देत होती. त्यातूनच आम्हाला कळलं की, असा चिमुकला संसार गोळा करण्याचा त्यांचा छंदच आहे.
येता येता बाबांनी मला सांगितलं, “अरे माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. त्यांना गणपतीची विविध रूपे आकषून घेतात. त्यांनी गणपतीच्या वेगवेगळ्या रूपातील ७०-८० मूर्ती जमवून घरातील दिवाणखाना सजवला आहे.
"बाबा, माझ्या मित्रांपैकी कुणी मोरपिसे, पिंपळाची पाने, बसची तिकिटे, वेगवेगळी नाणी, नेत्यांचे फोटो असं काही ना काही साठवतात बरं!" "हो का? मग तुला कसला छंद आहे हे आम्हाला पण कळू देत."
Read also : माझा आवडता ऋतू मराठी निबंध
Read also : माझा आवडता ऋतू मराठी निबंध
"बाबा, आपल्या घरी येणाऱ्या दैनिक वृत्तपत्रांमधून सुविचार, म्हणी, बोधकथा, विनोद, ग्राफिटी या सगळ्यांचं मी कात्रण करतो आणि एका वहीत वेगवेगळे भाग पाडून तारखेनुसार चिकटवून ठेवतो. सकाळ, लोकमत, लोकसत्ता या वृत्तपत्रांतून येणाऱ्या अनमोल खजिन्याचा मोठा संग्रहच आता माझ्याजवळ झालाय, माहीत आहे?"
घरी गेल्यावर मी ती वही तुम्हाला दाखवतो. “अरे व्वा! तुला ही कल्पना कशी सुचली बरं?" "मॅडमनी सुचवलं होतं एकदा. आता त्याचा छंदच लागलाय! शाळेमध्ये माझा हा खजिना अनेकांना प्रेरणा देणारा ठरलाय. निबंध लिहिताना मला आणि माझ्या मित्रांना याचा फार उपयोग होतो.”
या छंदामुळे माझे वाचन वाढले. मराठीतील लेखक, त्यांची गाजलेली पुस्तके कोणती हे समजले. ज्या बोधकथांमध्ये तात्पर्य दिलेलं असतं, त्या बोधकथा मधल्या सुट्टीत, ऑफ तासाला वर्गात सांगतो. त्यामुळे मित्रांमध्ये मी हवाहवासा झालोय बरं!
Read also : माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध लेखन
आता मित्रांना पण मराठीची चांगली गोडी लागलीय आणि बाबा, सुविचारांच्या वाचनाने आपोआपच मनाला चांगले वळण लागते. आम्ही म्हणींच्या भेंड्यापण खेळतो. वृत्तपत्रांमधून नेहमीच प्रसिद्ध आणि महान व्यक्तींचा परिचय, त्यांच्या कार्याची ओळख, त्यांच्या जीवनातील संघर्ष वाचनात आला. त्यामुळे त्यांची आत्मकथने वाचण्याचा विचार डोक्यात आला आणि हळूहळू ग्रंथालयातील पुस्तकांविषयी जिव्हाळा वाटू लागला.
Read also : माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध लेखन
आता मित्रांना पण मराठीची चांगली गोडी लागलीय आणि बाबा, सुविचारांच्या वाचनाने आपोआपच मनाला चांगले वळण लागते. आम्ही म्हणींच्या भेंड्यापण खेळतो. वृत्तपत्रांमधून नेहमीच प्रसिद्ध आणि महान व्यक्तींचा परिचय, त्यांच्या कार्याची ओळख, त्यांच्या जीवनातील संघर्ष वाचनात आला. त्यामुळे त्यांची आत्मकथने वाचण्याचा विचार डोक्यात आला आणि हळूहळू ग्रंथालयातील पुस्तकांविषयी जिव्हाळा वाटू लागला.
"शाब्बास, राजू मला खूप समाधान वाटलं, तुझा छंद ऐकून! एखाद्या गोष्टीचा ध्यास घेताना, ती गोष्ट करताना आपल्याला आनंदही मिळतो आणि त्यातून मनोरंजनही होतं."
असे छंद जोपासण्यासाठी जिद्द आणि चिकाटी मात्र हवी बरं का! मोठी माणसे खर्चीक छंद जोपासतील; पण आपल्याला जमेल असा आणि आपलं वेगळेपण जपेल असा आणखी एक छंद सांगू?
“सांगा ना बाबा."
"विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षिसे मिळविण्याचा छंद तुम्हाला लागला तर?"
Read also : My Favourite Hobby Marathi Essay
Read also : My Favourite Hobby Marathi Essay
तो छंद तुमचं व्यक्तिमत्त्वच बदलून टाकेल, हो ना? मग आई, वडील आणि गुरुजनांना अभिमान वाटेल अशा वेगळ्या छंदाचा तुम्ही विचार करताय ना?"
COMMENTS