Kiran Bedi Essay in Marathi and Speech : Today, we are providing किरण बेदी मराठी निबंध भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. S...
Kiran Bedi Essay in Marathi and Speech : Today, we are providing किरण बेदी मराठी निबंध भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mi Shetkari Boltoy Marathi Nibandh and Speech to complete their homework.
किरण बेदी मराठी निबंध Kiran Bedi Essay in Marathi and Speech
धडाडी म्हणजे काय, याचं जिवंत उदाहरण म्हणजेच किरण बेदी. भारतातील पहिली महिला आय. पी. एस. अधिकारी डॉ. किरण बेदी.
पहिलेपणाची खुमारी काही औरच असते. अर्थात हे पहिलेपण निभावणं नेहमीच सोपं, सुलभ ठरत नाही; विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. एखादी गोष्ट मिळणारी किंवा करणारी पहिली स्त्री असं आपण म्हणतो, तेव्हा त्यामागे असते ती प्रचंड मेहनत आणि जिद्द; पण त्यातून घडत असतो तो इतिहास.
Read also : माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध
Read also : माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध
९ जून १९४९ रोजी अमृतसर येथे जन्मलेल्या किरण बेदी यांनी कला शाखेतील पदवी तसेच राज्यशास्त्राची पदवी घेतली. समाजशास्त्रात तर पीएच.डी. केली.
किरण बेदी रीतसर प्रशिक्षण घेऊन पोलीस दलात दाखल झाल्या. कॉलेजमध्ये असतानाच किरण बेदी एन.सी.सी.मध्ये सहभागी झाल्या. एन.सी.सी.मधील बेस्ट कॅडेट अवॉर्डही त्यांनी मिळवले.
किरण यांना टेनिस खेळाची आवड होती. आपल्या बहिणीसह त्यांनी टेनिसची अनेक बक्षिसे जिंकली होती.
१९७२ मध्ये त्यांची आय.पी.एस.मध्ये निवड झाली. मुलाखतीच्या वेळी त्यांना पोलीस खाते हे पुरुषांचे क्षेत्र आहे, त्याचे शिक्षण खडतर व कठीण आहे म्हणून त्यांनी हे क्षेत्र निवडू नये, असं वारंवार सांगण्यात आलं; पण त्यांचा निश्चय ठाम होता.
Read also : मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध
Read also : मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध
माऊंट अबू येथील प्रशिक्षणानंतर उत्तम यश मिळवून १९७५ पासून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. अनेक संघर्षमय प्रसंगाना तोंड देताना त्यांची चिकाटी, जिद्द दिसून आली.
त्यांनी विशेषतः लोकाभिमुख कार्य केलं. स्त्रियांचे प्रश्न, तुरुंग सुधारणा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, तस्करी रोखणे यावर व अशा अनेक प्रश्नांवर आशियाई देशात व संयुक्त राष्ट्रसंघात भरलेल्या परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.
तिहार तुरुंगात महानिरीक्षक म्हणून नेमणूक ही कमी प्रतीची मानली जायची, तिथं किरण यांची नेमणूक झाली. आपल्या वागणुकीने त्यांनी तेथील कैद्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या तक्रारींना दाद दिली. कैद्यांसाठी अभ्यासवर्ग, योगासने, विणकाम, शिवणकाम, दूरदर्शन दुरुस्ती इ. गोष्टी सुरू केल्या.
Read also : माझे आजोबा मराठी निबंध
Read also : माझे आजोबा मराठी निबंध
कैद्यांच्या अडचणी सोडवत असतानाच 'अमली पदार्थांचे सेवन आणि घरगुती हिंसाचार' या विषयात संशोधन करून 'डॉक्टरेट' मिळवली.
दिल्ली येथील नवज्योत पाठशाळेत झोपडपट्टीतील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात स्त्रियांसाठी साक्षरता व व्यावसायिक शिक्षण दिले जाते.
त्यांच्या सामाजिक भरीव कार्यामुळेच अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं.
रेमन मॅगसेसे फाउण्डेशनचा 'शांतता' पुरस्कार, सर्वांगीण आणि नावीन्यपूर्ण प्रयोगशील व्यवस्थापनासाठी जोसेफ बायस फाउण्डेशनचा (स्वित्झर्लंड) पुरस्कार. तसेच भारतातील न्यायव्यवस्थेत लक्षणीय बदल घडवून आणू शकेल असे कार्य केल्याबद्दल 'मॅरिसन टॉम गिशॉफ' पुरस्कार, मानव कल्याण, स्त्रियांचे हक्क, विशेष सेवा आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी असलेल्या बांधिलकीसाठी 'प्राइड ऑफ इंडिया' पुरस्कार, भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते 'पोलीस शौर्य पदक', मद्य, मादक पदार्थ, एडस् आणि तंबाखू सेवन या विरुद्ध मोहीम उघडून लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारल्याबद्दल 'इंटरनॅशनल इक्युमेनिकल फोरम' या असोसिएन ऑफ ख्रिश्चन कॉलेजेस ऑण्ड युनिव्हर्सिटीजतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि २००५ मध्ये 'मदर टेरेसा अवॉर्ड.'
Read also : मी निसर्ग बोलतोय मराठी निबंध
Read also : मी निसर्ग बोलतोय मराठी निबंध
प्रामाणिकपणे आपली कारकीर्द पूर्ण करणाऱ्या किरण बेदी समाजसेवक अण्णा हजारेबरोबर सामाजिक प्रश्न सोडविण्यात हिरिरीने, त्याच उत्साहाने जनतेच्या मागे खंबीरपणे उभ्या राहतात. संवेदनशील मनाच्या किरण बेदी 'व्हॉट वेंट राँग?' सारखं पुस्तक पुढच्या व्यक्तीस अपराधी बनण्यापासून वाचवणे (टू सेव्ह द नेक्स्ट व्हिक्टीम) या उदात्त हेतूने लिहितात.
अशा तडफदार आणि खंबीर 'आद्य' महिला आय.पी.एस. अधिकारी डॉ. किरण बेदी यांना मानाचा सॅलूट!
COMMENTS