Kalpana Chawla Essay and Detail in Marathi : Today, we are providing कल्पना चावला माहिती मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ...
Kalpana Chawla Essay and Detail in Marathi : Today, we are providing कल्पना चावला माहिती मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Kalpana Chawla Essay and Detail in Marathi to complete their homework.
कल्पना चावला माहिती मराठी निबंध Kalpana Chawla Essay and Detail in Marathi
चाँद तारे तोड लाऊँ
सारी दुनिया पर मैं गऊँ
बस, इतनासा ख्वाब है!
१ जुलै, १९६१ रोजी दिल्लीजवळच्या कर्नाल नावाच्या खेड्यात जन्माला आलेल्या कल्पनानं पाहिलेलं स्वप्न तिन सत्यातही उतरवलं!
शाळेत असताना कल्पनाने एकदा आकाशाचे मोठे चित्र काढले. त्या चित्रामध्ये ग्रह, तारे, आकाशात उडणारी विमाने, अवकाशयानही रेखाटले. पर्यावरणासंबंधीचा हा प्रकल्प, जणू तिच्या स्वप्नाचे प्रतीक!
लहानपणापासूनच कल्पना साहसी होती. सर्वसामान्य मुलींसारखं बाहुल्या खेळण्यापेक्षा सायकलवरून गावामधून वेगाने भटकायला तिला आवडे. शाळेत असताना भरतनाट्यम्बरोबरच ती कराटेही शिकली. खेळांप्रमाणेच अभ्यासातही रुची होतीच.
Read also : किरण बेदी मराठी निबंध
Read also : किरण बेदी मराठी निबंध
मोठेपणी आपण कोण व्हायचं, हे तिनं लहानपणीच ठरवलं होतं. आपल्या मुलीने डॉक्टर किंवा प्राध्यापक व्हावे, अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा; पण “मला इंजिनिअरच व्हायचंय" असं ठामपणे सांगितल्याने आई-वडिलांनी तिचे म्हणणे मान्य केले.
चंदीगडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कल्पनाने प्रवेश घेतला, त्यावेळी अख्ख्या कॉलेजमध्ये फक्त सात मुली होत्या. 'एरॉनॉटिक्स' हाच विषय हट्टाने घेऊन पंजाब विद्यापीठामध्ये ती पहिली आली.
उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतील एका विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन तिथंही एम.एस.च्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या यशाची परंपरा कायम राखली.
Read also : सुमंत मुळगावकर माहिती मराठी
Read also : सुमंत मुळगावकर माहिती मराठी
'एरोस्पेस इंजिनिअरिंग' या विषयात वयाच्या फक्त २७ व्या वर्षी डॉक्टरेट मिळवली. आता तिचं स्वप्न तिच्या नजरेच्या टप्प्यात आलं होतं. नासामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी पात्रता तिनं जिद्दीनं प्राप्त केली होती. अत्यंत कठीण चाचण्यांनंतर 'नासा'ने संशोधक म्हणून तिची निवड केली. विमानांना हवा असलेला विशिष्ट वेग कमीत कमी वेळात गाठणे, या विषयावर तिने संशोधन केले.
या संशोधनानंतर अवकाशयान विभागातून 'अवकाशयात्री' विभागात तिनं प्रवेश मिळविला. ह्युस्टन येथील प्रशिक्षणानंतर कोलंबियाच्या अवकाश मोहिमेसाठी तिची निवड झाली. आणि १९ नोव्हेंबर १९९७ रोजी तिने 'कोलंबिया' यानासोबत अवकाशात झेप घेतली. १९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर असे तब्बल १६ दिवस ती अंतराळात होती. अंतराळात 'भरारी' घेण्याचं तिचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरलं होतं.
Read also : महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध
Read also : महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध
पहिली भारतीय महिला अवकाशयात्री बनण्याचा 'बहुमान' तिला मिळाला. अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले तरी स्वतःची ओळख ती 'भारतीय कन्या' म्हणूनच करून देई.
“आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवू शकतो, त्यासाठी सतत परिश्रम करावे लागतात, त्याची तयारी ठेवा" असा संदेश देणारे, विमान उड्डाणांचा पाया रचणारे, जे आर. डी. टाटा, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा हे तिचे आदर्श होते.
त्यानंतर 'नासा'ने पुढच्या अंतराळ मोहिमेसाठी डॉ. कल्पना चावलाची मोहीम विशेषज्ञ' म्हणून नेमणूक केली. १६ जानेवारी, २००३ या दिवशी कोलंबिया यान अवकाशात झेपावले. १६ दिवसांच्या मोहिमेनंतर परतीचा प्रवास करताना फक्त ६० कि. मी. उंचीवर असताना यानामध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते हवेतच जळून नष्ट झाले आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत कल्पनाही १ फेब्रुवारी, २००३ रोजी अवकाशात विरून गेली.
Read also : प्रदूषणाचे दुष्परिणाम निबंध मराठी
Read also : प्रदूषणाचे दुष्परिणाम निबंध मराठी
अवघ्या ४२ वर्षांच्या आयुष्यामध्ये कर्तृत्वाचे उत्तुंग शिखर गाठणारी आकाशकन्या-कल्पना चावला तरुणांसाठी 'आदर्श' बनली.
'दिव्यत्वाची जेथे प्रचीती
तेथे कर माझे जुळती'
भारतीय हवामान खात्याची नवी वेबसाईट भारतीय मेटसेटचे नामकरण 'कल्पना' असे करण्यात आले. त्यामुळे अवकाश वीरांगना कल्पना चावला या जगात अमर झाली.
COMMENTS