Autobiography of Soldier in Marathi Language : Today, we are providing एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध For class 5, 6, 7, 8, 9, 10...
Autobiography of Soldier in Marathi Language : Today, we are providing एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Autobiography of Soldier in Marathi Language to complete their homework.
एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध Autobiography of Soldier in Marathi Language
आणि युद्धात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल शहीद मेजर सुरेंद्र शंकरराव कदम यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात येत आहे."
२६ जानेवारी २०११ या प्रजासत्ताकदिनी शासनाने आयोजित केलेला सोहळा मी शहीद शंकरराव कदम मोठ्या अभिमानाने स्वर्गातून पाहतो आहे.
शहीद मेजर सुरेंद्र यांची आई, पत्नी, मुलगा संग्राम या कार्यक्रमास उपस्थित आहेत. त्यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते धनादेश व पुरस्कार घेताना पाहून मी कृतकृत्य झालो.
Read also : एका पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी
Read also : एका पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी
मी कॅप्टन शंकरराव कदम, मेजर सुरेंद्रचे पिता. मीही भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालो. मलाही मरणोत्तर कीर्तिचक्र मिळाले आहे.
शाळेत असताना लष्करातील एका निवृत्त अधिकाऱ्याच्या व्याख्यानाने मी खूप प्रभावित झालो होतो. दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवूनही आईवडिलांच्या मनाविरुद्ध लष्करात कॅप्टन बनण्याचं ध्येय ठेवून भरती झालो. मी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावं, अशी इतर आई-वडिलांप्रमाणेच माझ्याही आईवडिलांची इच्छा होती.
प्रचंड जिद्दीने आणि खडतर अभ्यासक्रम पूर्ण करीत मी कॅप्टन झालो. डेहराडून येथील 'आय. एम. ए.' च्या ट्रेनिंगच्या वेळेस आजारी असूनही निर्धाराने ते ट्रेनिंग पूर्ण केले. लष्करात भरती होईपर्यंत माझे आई-वडील नाराज होते; पण भरती झाल्यावर मात्र मला त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. एवढेच नाही तर त्यांना माझा अभिमान वाटतो, असं कित्येकदा त्यांनी बोलूनही दाखवलं.
Read also : शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी
Read also : शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी
भारत-पाक युद्धाच्या वेळी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. अतिशय दुर्गम भागात आम्ही होतो. सतत १२ तास ‘सर्च ऑपरेशन' चालू होतं.
अंदाधुंद गोळीबार सुरू झाला, आपले सैनिक, त्यांचे सैनिक जीवाची बाजी करून, निधड्या छातीने युद्धात रंगले होते. देशप्रेमाने झपाटलेले! धाड् धाड् घाइ धाड् बंदुकीच्या फैरी झडत होत्या. कर्णकर्कश किंकाळ्या ऐकू येत होत्या. आँ! मलाही एक गोळी लागली, वर्मी घाव घालणारी! मी जमिनीवर कोसळलो.
माझ्या मुलानेही लष्करात जाऊन देशसेवा करावी, हे माझं स्वप्न माझ्या मुलानं पूर्ण केलं. माझ्या पावलावर पाऊल टाकलं, त्यामुळे मी खूप समाधानी आहे. देशाचं रक्षण करता करता, पराक्रम गाजवत त्यालाही वीरमरण आलं याचा मला अभिमान वाटतो.
Read also : पुतळे बोलू लागले तर मराठी निबंध
Read also : पुतळे बोलू लागले तर मराठी निबंध
त्याचा मुलगा संग्रामही खेळण्यातली बंदूक घेऊन मित्रांना धाड-धाड करीत गोळ्या घालताना मी पाहिलंय. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात.
आमच्या घरातील ही तिसरी पिढीही देशसेवाच करणार तर!
मला मृत्यूचं भय केव्हाच नव्हतं. जन्माला आलेला जीव कधी ना कधी जाणारच; मग मिळालेला हा जन्म भारतमातेच्या चरणी अर्पण करताना कसलं आलंय दुःख?
मुलाच्या मृत्यूने मी क्षणभर हेलावलो; पण क्षणभरच!
Read also : माझे आवडते शिक्षक निबंध मराठी
मुलाच्या मृत्यूने मी क्षणभर हेलावलो; पण क्षणभरच!
Read also : माझे आवडते शिक्षक निबंध मराठी
देशाला स्वातंत्र्यात ठेवण्यासाठी सैनिक अहोरात्र, जीवाची पर्वा न करता सीमेचं रक्षण करतात, म्हणून आपण निश्चिंतपणे जीवन जगू शकतो, ही महत्त्वाची गोष्टच समाज, राजकीय नेतेमंडळी विसरत चालली आहेत. फक्त राष्ट्रीय सणांनाच त्यांना हुतात्म्यांची आठवण येते. वीरपुरुषांचे पुतळे धुतले जातात, त्यांना हार घालून भाषणे रंगतात. एरवी मात्र त्यांच्या कुटुंबीयांची साधी आठवणही त्यांना होत नाही, याची खंत मात्र जरूर वाटते.
COMMENTS