Shetkaryachi Manogat Nibandh in Marathi Language : Today, we are providing शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ...
Shetkaryachi Manogat Nibandh in Marathi Language : Today, we are providing शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Shetkaryachi Manogat Essay / Nibandh in Marathi Language to complete their homework.
शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी - Shetkaryachi Manogat Nibandh in Marathi
मे महिन्याचा उकाडा संपला. पावसाची रिमझिम सुरू झाली. वातावरणात थंडावा जाणवू लागला. या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी घरातील सर्व मंडळींनी वर्षा सहलीचे आयोजन केले. शनिवाररविवार असे दिवस पाहून कर्जत जवळील पात्रज या गावी आम्ही वर्षासहलीला गेलो. राहण्याची व्यवस्था केलेल्या घरी उतरून, पोटपूजा करून रिमझिमत्या पावसातच आम्ही फिरायला बाहेर पडलो. Read also : एका पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी
गावातून थोडे दूर चालत येताच शेतजमीन दिसली. गावातील स्त्री-पुरुष मंडळी शेतीच्या कामात गुंतलेली होती. एका बाजूला बैलांना सोबत घेऊन नांगराला जुंपणे चालू होते. तर दुसरीकडे काही पुरुष मंडळी व स्त्रिया पडणाऱ्या पावसात डोक्यावर इरली घेऊन, ओणवी होऊन कामे करत होती. सर्वजण आपापल्या कामात गुंग होती हे पाहून मीच एका वृद्धाला हसून म्हटले, “काय आजोबा शेतीची तयारी अगदी जोरात चालू आहे वाटतं?" यावर त्या वृद्धाने वर बघून हसत हसत उत्तर दिले, “होय बाबा; पण तुम्ही कोणत्या गावचे पाहुणे? यापूर्वी या गावात पाहिलं नाही.” मी म्हणालो, “तुमचा गाव बघायलो आलोय." Read also : नदी बोलू लागली तर मराठी निबंध
यावर ते वृद्ध म्हणाले “बरायं बराय”. पुढे मीच त्यांना प्रश्न विचारले, तेव्हा ते अधिक बोलते झाले, “मी सर्जेराव पाटील. ही आळेवाडीतील आमच्या वाडवडिलांची जमीन आहे. या शेतात राबणारे आम्ही सर्वजण एकाच कुटुंबातील आहोत. शाळेत काय दोन-चार इयत्ता होतो. थोडे लिहायला वाचायला येते, इतकेच शिक्षण. मी माझ्या आजोबांच्या वेळेपासून त्यांच्या सोबतच शेतात काम करू लागलो. शेतीतल्या सर्व कामकाजांची माहिती अनुभवातून घेतली. Read also : मी पृथ्वी बोलत आहे मराठी निबंध
पण खरी अशी परिस्थिती आहे की, आम्ही शेतात कितीही राबलो, तरी सारे पीकपाणी या लहरी पावसावर अवलंबून असते. आता पावसाला सुरुवात झाली म्हणून शेतीची कामे सुरू केली. गेल्यावर्षीही असेच झाले व नंतर पावसाने जी दडी मारली ती मारली. वर आलेली पिके नंतर पाण्याअभावी सुकून गेली होती. यावर्षी असे झाले नाही म्हणजे मिळवले. नाहीतर आमच्या तोंडचे पाणी पळेल. यावर मी विचारले, शासनाकडून तुमच्यासाठी विविध स्वरूपाच्या योजना राबवल्या जातात. त्याचा लाभ मिळतो का? गेल्या वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शासनाकडून काही मदत मिळाली का? यावर ते म्हणाले “आम्हा शेतकऱ्यांसाठी सरकार योजना राबवते ते आम्हाला बातमीत कळते; पण त्या योजना केवळ कागदावर राहतात. त्यातील काही सुरू झाल्याच तर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी दिरंगाई होते आर्थिक नुकसान भरून देण्यासाठी या उपाययोजना असल्या तरी त्याची पाहणी करून जाणारे अधिकारी आणि त्याची कागदपत्रे यांची पूर्तता होईपर्यंत कचेरीत कितीतरी हेलपाटे घालावे लागतात." Read also : रस्त्याचे मनोगत मराठी निबंध
“तुम्ही पारंपरिक शेतीऐवजी शेतीत काही नवे प्रयोग करता की नाही", यावर ते म्हणाले, “होय तर, आकाशवाणी आणि दूरदर्शनमुळे शेतीविषयक नवी माहिती मिळते. कृषी खात्याकडून आमच्या गावात शिबीराचे आयोजन होते. तिथे बि-बियाणांबाबत, कृषी अवजारांबाबत माहिती मिळते. फवारणीची औषधे, किडींवर नियंत्रण या बाबत उपाययोजना सांगितल्या जातात. त्याचबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून मी कुक्कुट पालनाचाही व्यवसाय सुरू केला आहे." Read also : शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
“तुमच्या घरातल्या नव्या पिढीबाबत काय सांगाल? त्यांनाही शेती हाच व्यवसाय स्वीकारायचा आहे का?" “यावर ते वृद्ध म्हणाले, “आमची नवी पिढी सुशिक्षित आहे; पण ही पिढी शिक्षणासाठी शहरातच असते. कधी सुट्ट्यांत ते गावी येतात. शहरी जीवनाचा पगडा त्यांच्यावर अधिक आहे. तेव्हा ही मुले या मातीत उतरतील का? हे सांगता येत नाही. मी जीवात जीव असेपर्यंत या काळ्या आईची सेवा मात्र करेन बाकी पुढचे पुढे." एवढे बोलून ते वृद्ध आपल्या कामाकडे वळले.
आम्हाला देखील पुढे जायचे होते. आम्ही त्यांचा निरोप घेतला.
This essay is provided to you by Target Publication. Please visit there website here in order to fine good Marathi books.
Shetkaryanche manogat mi bandh Marathi
ReplyDeletehttps://marathiinfopedia.co.in/shetkaryache-manogat/