Saakshar Bharat Samarth Bharat Nibandh : Today, we are providing साक्षर भारत समर्थ भारत निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ...
Saakshar Bharat Samarth Bharat Nibandh : Today, we are providing साक्षर भारत समर्थ भारत निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Saakshar Bharat Samarth Bharat Nibandh / Essay in Marathi Language to complete their homework.
साक्षर भारत समर्थ भारत निबंध मराठी - Saakshar Bharat Samarth Bharat Nibandh
भारताला १५ ऑगस्ट,१९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले व भारत देश हा लोकशाही राष्ट्र म्हणून सर्व जगात ओळखलाजाऊ लागला. पारतंत्र्यातून मोकळा होताच भारतासारखा बलायव सक्षम देशाला प्रगतीच्या वाटा मोकळ्या झाल्या. प्रगतीच्या वाटेकडे देशाची पावलेवेगाने पडू लागली. उद्योगधंदे, शिक्षण, शेतीव्यवसाय, विज्ञान क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रे या सर्वच क्षेत्रांत परिवर्तन करण्याचा प्रयत्न होऊलागला; परंतु या प्रयत्नांचे भरघोस यश आपल्याला अजूनही मिळालेले नाही. Read also : एका पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी
देशाची वाढती लोकसंख्या, प्रचंड दारिद्रय, बेकारी, अनारोग्य ह्या सर्व गोष्टी प्रगतीच्या मार्गातील मोठे अडथळे झालेले आहेत. या सर्व मुळाशी आहे अज्ञान व निरक्षरता.
भारत कृषिप्रधान देश आहे. येथील शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. शेतकरी आपल्या देशाचा आत्मा आहे; पण अजूनही इथला शेतकरी निरक्षर आहे. त्या निरक्षरतेचा फायदा सावकार घेत आहे; त्यामुळे कर्जबाजारी होऊन आजचा शेतकरी खूप कष्ट करूनही दरिद्री आहे. त्याची सर्व शक्ती दारिद्रयाशी झगडण्यात नष्ट होत आहे. आज शेतीव्यवसायातही विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. शेतीविकासाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागलेला आहे; परंतु हे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूशकलेले नाही. निरक्षर शेतकरी त्याच्या निरक्षरतेमुळे व अज्ञानामुळे हे तंत्र आत्मसात करू शकलेला नाही. Read also : भ्रमणध्वनी / मोबाइल : शाप की वरदान
शेतकऱ्यांप्रमाणेच भारतातील आदिवासी व गरीब समाज ज्ञानाला वंचित राहिलेला आहे. हा समाज अजूनही रूढी, परंपरा, अंधश्रद्धांच्या चिखलात रुतलेला आहे. त्याच्या विकासासाठी अनेक योजना आखूनही त्या योजनांचा लाभ निरक्षरतेमुळे व अज्ञानामुळे ते घेऊशकत नाही. विज्ञानाचे क्षेत्र विकसित होऊनही वैज्ञानिक सुखसोयींचा लाभ त्यांना घेता येत नाही. या समाजातील अज्ञान जोपर्यंत नाहीसे होत नाही तोपर्यंत आदिवासींचा विकास साध्य होणार नाही.
महात्मा फुलेंसारख्या थोर समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. स्त्रीशिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले. आज एक स्त्री शिकली तर ती एका कुटुंबाला सुसंस्कृत करू शकते. ही विधाने फक्त फलकापुरतीच मर्यादित आहेत. आजही खेड्यातील, खालच्या जातीतील स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. आपली भावी पिढी सुसंस्कृत, कार्यक्षम, सुजाण नागरिक बनायला हवी असेल तर या देशातील प्रत्येक स्त्री साक्षर व्हावयास हवी. त्यासाठी सरकारनेच कडक कायदा करावयास हवा.
लोकसंख्याही राष्ट्रीय संपत्ती आहे; पण शिक्षणाच्या अभावाने हीच लोकसंख्या राष्ट्राच्या प्रगतीला अडथळा होत आहे. आजही अनेक लोक अज्ञानामुळे अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. आज आमच्या प्रगत विज्ञानाने आपले यान अंतराळात पाठवून विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले आहे; तरीही बहजन समाज अजूनही नवस करून, बळी देऊन अंधश्रद्धेसारख्या झाडाला खतपाणी घालून आपले अज्ञानवाढवित आहे. वैद्यकीय उपचारांबाबतही अजूनही समाज अज्ञानी आहे. जादूटोणा, लागण, करणी यांसारख्या भोंद कल्पनांवर विश्वास ठेवून ते आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करीत आहेत. Read also : APJ Abdul Kalam Essay in Marathi
भारतात लोकशाही राज्यपद्धती आहे. आपल्या लोकप्रतिनिधीची निवड सारासार विचार करून त्यांना आपल्या लोकशाहीचा पाया भक्कम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे; परंतु येथील निरक्षर लोक प्रलोभनाला बळी पडतात व आपलालोकप्रतिनिधी निवडताना चूक करतात. यातूनच भ्रष्टाचार वाढत आहे. देशाची प्रगती खुंटत आहे. तेव्हा भारतासारख्या बलाढ्य देशाच्या प्रगतीचे मार्ग सुरळीत करण्यासाठी साक्षरता प्रसाराची अत्यंत आवश्यकता आहे. सर्वच स्तरांवर शिक्षण सक्तीने झाल्यास एक साक्षर भारत- समर्थ भारत तयार होईल.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS