Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh : Today, we are providing रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 1...
Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh : Today, we are providing रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Railway Station Varil Ek Taas Nibandh / Essay in Marathi Language to complete their homework.
रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी - Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh
कॉलेजमधून थकून, भागून घरी आलो. हातपाय धुवून आलो ते आईने पत्र हाती दिले. नागपूरहून आलेले ते पत्र माझ्या ताईचे होते. ती संध्याकाळी सहा-साडेसहाला दादरला येणार होती, अस्मादिकांना तिला आणायला जायचे होते स्टेशनवर ! ताई येणार या खुशखबरीने मन आल्हादले ! झटपट तयार होऊन मी स्टेशनवर पोचलो. फलाटावर तिकिटांची रांग पाहन मनोमन हादरलो; पण रांगेत ऐकू आले की 'नागपूर-दादर एक्सप्रेस डेढ घंटा लेट है।' तेव्हा सुटकेचा नि:श्वास सोडला.
रेल्वे स्टेशनवर पदार्पण करताच मनाला जाणवले की हे स्टेशन नसून जगाची छोटी प्रतिकृती आहे. हे स्थानक म्हणजे प्रशस्त फलाट, गाड्यांचे आगमन-निर्गमन दाखवणारे विद्युत फलक, दर मिनिटाला धडधडत येणाऱ्या रंगीबेरंगी गाड्या, फलाट सोडताना त्यांच्या शिट्या, त्यातच कावरून दिल्या जाणाऱ्या विविध भाषांतील सूचना हेच सिद्ध करते की, विविधता हे रेल्वे स्थानकाचे खास वैशिष्ट्य असते. Read also : पंढरीची वारी मराठी निबंध
फलाट तिकिट घेऊन मी निश्चिंतपणे आत प्रवेशलो. अठरापगड जातींची व भिन्नभिन्न रंगांची वस्त्र-प्रावरणे धारण केलेल्या माणसांनी फलाट फुलून गेला होता. मी विचारात पडलो, 'ही एवढी माणसे - धावत पळत प्रवास का करतात?' याचे उत्तर म्हणजे यंत्रयुग ! धावपळ हा त्याचा अविभाज्य भाग झाला आहे. इकडे तिकडे पाहत वेळ काढत होतो. ध्वनिक्षेपकावरून विविध सूचना दिल्या जात होत्या; पण मला त्यातील एकही वाक्य कळले नाही. सराईत मात्र त्या ऐकून लोकल पकडण्यासाठी या फलाटावरून त्या फलाटावर पळत होते.
एका बाजूला काही स्त्रिया व मुली यांची जणू फॅशनपरेडच भरली होती. सुबक, सुंदर दागिन्यांचे एक चालते-बोलते प्रदर्शन भासले मला ते! बालापासून वृद्धांपर्यंत व रंकापासून रावांपर्यंत सर्वांचे तेथे एक अपूर्व संमेलनच भरले होते. या गर्दीतच फेरीवाले, हमाल व विक्रेते यांची धावपळ चालच होती. माझ्या मनात विचार आला. रेल्वे फलाट हा खरा समाजवादी आहे. येथे सर्व समान आहेत. श्रीमंत-गरीब, शिक्षित-अशिक्षित असा भेदभाव येथे नाही. सर्वांना एकाच फलाटावर थांबावे लागते. मग तिकिट कोणत्याही श्रेणीचे का असेना ! Read also : मी पृथ्वी बोलत आहे मराठी निबंध
इतके सगळे पाहनही माझा वेळ काही जाईना. आपण आता काय करावे असा विचार करत होतो तोच 'मारले, मारले', असा आरडाओरडा ऐकला. पुढे सरकलो ते एका मध्यमवयीन महिलेचे पाकिट मारले गेले होते. बिचारी दुःखी झाली होती. तितक्यात काही साहसी तरुणांनी त्या चोराला पकडले, पण त्याने ते पाकिट गायब केले होते.
रेल्वे फलाट हा आप्तस्वकीयांच्या सुखदःखांचा जणू साक्षीदार आहे ! ही सर्वसमावेशक आगगाडी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीकच नव्हे का? असा मी विचार करत होतो तोच 'नागपूर एक्स्प्रेस आ रही है।' ही घोषणा ऐकली व मी ताईच्या स्वागताला सिद्ध झालो. Read also : रस्त्याचे मनोगत मराठी निबंध
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS