Pani Vachava Essay in Marathi Language : Today, we are providing पाणी वाचवा निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Student...
Pani Vachava Essay in Marathi Language : Today, we are providing पाणी वाचवा निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Pani Vachava Essay / Nibandh Marathi Language to complete their homework.
पाणी वाचवा निबंध मराठी - Pani Vaachava Essay in Marathi Language
सगळे म्हणतात पाणी वाचवा!, पाणी वाचवा!
म्हणजे काय करून पाण्याला वाचवायचे मला कळतच नाही.
ही मोठी माणसं, वर्तमानपत्रवाले, सोप्या शब्दात कां सांगत नाहीत मला कळत नाही.
वाचवायचे म्हणजे पाण्यावर कोणते संकट आले आहे ते तरी कळायला हवे नां? नाही तर पाण्याला कसे वाचवणार आम्ही? Read also : Essay on Tree in Marathi Language
मी सरळ आईला विचारले, “आई सगळे सतत म्हणतात पाणी वाचवा! पाणी वाचवा! म्हणजे नक्की काय करायचं सांगशील का?
आई म्हणाली, “पाण्याला काऽऽही झालेले नाही मागच्या वर्षी पाऊस कमी पडला. यंदा अजून पाऊस पडला नाही. त्यामुळे गंगापूर धरणातले पाणी संपत आले. नळ एकदाच येतो. नळाला पाणी फक्त तासभरच असते. पाण्याची धार बारीक असते. कारण साठलेलं पाणी पुरवायचे आहे. कळलं?"
पण आपण काय करायचं ते सांग ना?
“तू ग्लासभर पाणी पिण्यासाठी घेतोस अर्धा पितोस आणि बाकीचं काय करतोस?' आई
“मोरीत टाकून भांडं ठेवून देतो.” मी Read also : प्रदूषणाचे दुष्परिणाम निबंध मराठी
"असं पाणी टाकायचं नाही. अर्धा ग्लासच पाणी घ्यायचं. हात धुतोस तू तेव्हा मोठा नळ सोडतोस आणि दोनचार मिनिटे हात धूत बसतोस. खूप पाणी वाहून जात, तेव्हा लोटीत पाणी घेऊन हात धुवायचा. लागेल तेवढेच पाणी वापरायचे.
आपली भांडीवाली नळाखाली भांडी घासते. नळ वाहत असतो असे करायचे नाही. बादलीत पाणी घ्यायचे व भांडी धुवायची. काही लोकांच्या घरांत संडासात फ्लश असतात. एकदा फ्लश सोडला तर बादलीभर पाणी वाहून जाते. पाणी भरतांना मी शीळं पाणी झाडांना घालते. मोरीत ओतून देत नाही. कळलं? Read also : जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा
पाणी वाचवा म्हणजे पाणी वाया घालवू नका. जपून वापरा. सांभाळून वापरा, कळलं का?
“हो आत्ता तू समजून दिल्यावर कळलं, मी पाणी नाही वाया घालवणार. आणि मित्रांना पण सांगेन, पाणी नासू नका. जपून वापरा."
आई, आपल्याला वाचयचं असेल तर पाण्याला वाचवले पाहिजे।
कारण पाण्याला जीवन म्हणतात बरोबर!
अगदी बरोबर. हुशार आहेस तू.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS