One Hour in Hospital Essay in Marathi : Today, we are providing रुग्णालयातील एक तास निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12...
One Hour in Hospital Essay in Marathi : Today, we are providing रुग्णालयातील एक तास निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use One Hour in Hospital Essay (Nibandh) in Marathi Language to complete their homework.
रुग्णालयातील एक तास निबंध मराठी - One Hour in Hospital Essay in Marathi
“आरोग्यम् धनसंपदा !” ही उक्ती मनापासून मानणाऱ्या व ती खरी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमच्या कुटुंबात निरोगी राहाण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते. मी, आई, बाबा आणि आजोबा अशा छोट्याश्या कुटुंबात माझ्या आजोबांची व्यायामाची आवड प्रत्येकात रूजली आहे. भरपूर चालण्यावर, कसरतीवर भर देणाऱ्या माझ्या आजोबांना मी कधीच आजारी पाहिले नाही. वयाची पंच्याहत्तरी उलटूनही ते अगदी तरुण भासत. असेच एके दिवशी सकाळी फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या आजोबांचा एका दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे छोटासा अपघात झाला आणि एका खाजगी रुग्णालयात आजोबांना भरती करण्यात आले. Read also : फुलांचे आत्मवृत्त निबंध मराठी
घरातील एक माणूस आजारी असेल तर अख्खे घरच आजारी पडते, याची जाणीव झाली. आजोबांशिवाय घर सुने सुने वाटू लागले. आई-बाबा आपली कामे सांभाळून हॉस्पिटलच्या वाऱ्या करत होते. माझी सुट्टी चालू असल्याने एके दिवशी आजोबांजवळ मी थांबण्याचे ठरले. माझ्यावर हॉस्पिटलला जाण्याचा प्रसंग फक्त एकदाच आला होता. एकदा मित्राच्या आईला बघण्यासाठी सरकारी रुग्णालयात गेलो होतो, तोच एक अनुभव. तिथली परिस्थिती आठवून मला रुग्णालयात जावेसे वाटेना; पण आजोबांसाठी जाणे भागच होते. शेवटी मी रुग्णालयात जाण्यासाठी निघालो.
त्या रुग्णालयाची पायरी चढताच जाणवली ती सरकारी व खाजगी रुग्णालयातली तफावत. सरकारी रुग्णालयात पावलो पावली येणारा तो औषधांचा, रुग्णांचा उग्र वास इथे जाणवलाच नाही. मी त्या आश्चर्यातच आजोबांच्या बेडजवळ येऊन बसलो
औषधे दिल्याने आजोबांना नुकतीच झोप लागली होती. करण्यासारखे काहीच नसल्याने मी ते रुग्णालय व तेथील एकंदरित परिस्थिती न्याहाळू लागलो आणि मी त्यात कधी रमलो मला कळलेच नाही. Read also : जर परीक्षा नसत्या तर मराठी निबंध
खाजगी रुग्णालयातील स्वच्छता खरोखरचं वाखाणण्याजोगी होती. आया, मावशीबाई सतत झाडून घेत होत्या, फरश्या पुसत होत्या. आपला चेहरा दिसेल इतकी लादी स्वच्छ करत होत्या. सरकारी रुग्णालयातील अस्वच्छतेचा इथे लवलेशही नव्हता.
या रुग्णालयाच्या भिंती, कोपरे सरकारी रुग्णालयाप्रमाणे धुंकून रंगवलेल्या नव्हत्या. कोपऱ्याकोपऱ्यातून देवांचे फोटे लावून धार्मिकतेचा आधार घेत लोकांना थुकण्यापासून परावृत्त करण्याची त्या रुग्णालयाची पद्धत मला फार आवडली. इतरत्र नजर टाकली असता, अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक आपापल्या बेडवर आराम करत असल्याचे दिसले. त्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव आपण रुग्णालयात असल्याची जाणीव करून देत होते.
प्रत्येकाच्या बेडशेजारील टेबलावर ग्लुकोजच्या बाटल्या, निरनिराळी औषधे, सिरीज, इंजेक्शन यांचे ढीग लागले होते. कोणी बेडवर पडून कण्हत होते, तर काही फिरण्याचा प्रयत्न करत होते. साऱ्या रुग्णालयात औषधांचा वास भरून राहिला होता; पण तो सुसह्य होता. रुग्णालयात फेरफटका मारण्याच्या उद्देशाने मी उठलो. फिरताना लक्षात आले की, या रुग्णालयात सर्व आधुनिक सुविधा पुरवल्या जातात. तिथेच एका बाकड्यावर एका रुग्णाच्या नातेवाईकांची चर्चा कानावर आली. उपचारांच्या बिलाचा आकडा फुगत असून पैशांच्या जमवाजमवीच्या काळजीत ते असल्याचे जाणवले. आणि तिथेच सरकारी व खाजगी रुग्णालयात असलेली पैशांची मोठी तफावर जाणवली. गरीब माणसे सरकारी रुग्णालयाला का प्राधान्य देतात याचे उत्तर मिळाले.
गंभीर परिस्थिती असणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक अस्वस्थ होते, अश्रू ढाळत होते, तर दुसरीकडे बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या तसेच त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. असे मिश्रित भाव रुग्णालयातच पहायला मिळू शकतात, असे मनोमन वाटले. खरे पहाता, रुग्णालयाला जन्ममृत्युची सीमा म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. रुग्णालयातील रुग्णासाठी दोनच शक्यता असतात. एक बरे होऊन हसतमखाने घरी जाणे अथवा मत्यला आपलेसे करून जगाचा निरोप घेणे आणि या दोन्ही शक्यतांना सत्यात उतरवणारी व्यक्ती असते ती म्हणजे 'डॉक्टर'.
डॉक्टरांना देवाची उपमा दिली जाते ती उगाच नाही. डॉक्टर आपल्या जीवाचे रान करून रुग्णाचा जीव वाचवतात. रुग्णांच्या दृष्टिने पहाता आपले आर्थिक व मानसिक स्थैर्य नाहिसे करणाऱ्या रुग्णालयाची पायरी चढणे कोणालाच आवडत नाही. रुग्णालयातील निरनिराळ्या गोष्टींचा विचार करता करता, बाबा कधी आले जाणवलंच नाही. या सगळ्या गोष्टी, तो एक तास डोळ्यांत घोळवत मी तेथून निघालो.
This essay is provided to you by Target Publication. Please visit there website here in order to fine good Marathi books.
This essay is provided to you by Target Publication. Please visit there website here in order to fine good Marathi books.
COMMENTS