My Mother Essay in Marathi Language : Today, we are providing माझी आई निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students ca...
My Mother Essay in Marathi Language : Today, we are providing माझी आई निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Majhi Aai Essay in Marathi Language (My Mother Essay in Marathi Language) to complete their homework.
Majhi Aai Essay in Marathi Language - माझी आई निबंध मराठी
जीवनातील सर्व पदव्यांनी गुच्छ होऊन स्वागताला जावे, इतकी 'आई' ही पदवी सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले जाते. आई म्हणजे वात्सल्याचा अविरत वाहणारा झराच! साऱ्या दैवतांत 'आई' हे दैवत थोर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या मखमली पेटीत 'आई' ही दोन अक्षरे कोरलेली असतात. आईचे प्रेम, तिच्या हळुवार स्मृती आपण सर्वजणच जपत असतो. बालपणी मुलांना जपणारी, त्यांच्यावर योग्य संस्कार करणारी आई म्हणजे आपला पहिला गुरू! साने गुरुजी नेहमी म्हणत, "आई माझा गुरू, आई कल्पतरू!" आई म्हणजे ममतेच्या महन्मंगल नदीवर गजबजलेलं पवित्र तीर्थक्षेत्र आहे असे म्हणतात, ते योग्यच आहे. Read also : माझा दादा मराठी निबंध
आई आपल्या मुलांसाठी काय करत नाही? स्वतः तप्त उन्हाचे चटके सहन करते, पण मुलांना मात्र मायेची सावली देते; आपली मुले चांगली व्हावीत म्हणून ती त्यांच्यावर शिक्षणाचे, सद्गुणांचे चांगले संस्कार करते. त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. डोळ्यात तेल घालून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेते. स्वत:ची हौसमौज बाजूला सारून ती आपल्या मुलांचे हट्ट पूर्ण करत असते. मुलांचे काही चुकले तर ती रागावते, वेळीप्रसंगी कठोरही बनते; परंतु आईच्या रागामागे वात्सल्याचे सागरच दडलेले असतात. आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठे व्हावे एवढीच तिची माफक अपेक्षा असते. त्यामुळेच एका क्षणी मुलांना रागावणारी, मारणारी आई दुसऱ्याच क्षणी त्यांना प्रेमाने जवळ घेते. म्हणूनच थोर कवी मोरोपंत म्हणतात,
" प्रसादपट झाकती परि परा गुरूंचे थिटे
म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे ।”
My Mother Essay in Marathi - माझी आई निबंध मराठी
'आई थोर तुझे उपकार' या गाण्यात म्हटल्याप्रमाणे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. आईच्या मायेला अंत नसतो. ती मोठ्या मायेने आपल्या बाळाचे संगोपन करीत असते.
माझी आईही माझ्यासाठी खूप काही करत असते. अगदी लहानपणी मला बोटाला धरून 'चाल चाल राणी' करून पहिली पावले टाकायला तिनेच मला शिकवले होते. माझ्या सर्व लहरी सांभाळून मुळीच न कंटाळता ‘हा घास काऊचा, हा घास चिऊचा' असे म्हणून तिनेच मला मऊ मऊ भाताचे घास भरवले होते. Read also : Majhi Aaji Nibandh Marathi
आता मी शाळेत जाऊ लागल्यावर माझी शाळेची सर्व तयारी तीच करून देते. माझे छोटेसे दप्तर, त्यात पोळी भाजीचा छोटासा डबा सांभाळत आईचे बोट धरूनच मी रोज शाळेत जाते. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आईच्या हातचे काहीतरी गरम गरम खाऊन खेळायला पळायचे हा माझा रोजचा दिनक्रम. खेळून आल्यावर हातपाय धुऊन परवचा म्हणायची सवय आईनचे मला लावली आहे. Read also : Majhi Aai Marathi Nibandh Lekhan
माझी आई मला अभ्यासातही मदत करते. मी परीक्षेत चांगले गुण मिळवले की ती मला शाबासकी देते. माझ्या आईला अव्यवस्थितपणा, गबाळेपणा मात्र बिलकुल खपत नाही. आईच्या रोजच्या सांगण्याशिकवण्यामुळेच मलाही आता व्यवस्थितपणाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे मी आईच्या मनासारखे वागण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या सर्वांगीण वाढीकडे लक्ष पुरवणारी माझी आई म्हणजे माझे सर्वस्व आहे.
very nice essay on my mother i like very much
ReplyDelete