My Mother Essay in Marathi Language : Today, we are providing प्रयत्नांति परमेश्वर निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12....
My Mother Essay in Marathi Language : Today, we are providing प्रयत्नांति परमेश्वर निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Essay on Hard Work in Marathi (Shramache Mahatva Essay in Marathi Language) to complete their homework.
यत्नांति परमेश्वर निबंध मराठी - My Mother Essay in Marathi Language
परमेश्वर म्हणजे कोण? तो कोठे असतो? असा नेहमी प्रश्न पडतो; पण खरे पाहता परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात असतो म्हणूनच जनसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हटले जाते. महात्मा फुले, महर्षी कर्वे, पंजाबराव देशमुख, मदर टेरेसा यांनी आयुष्यभर समाजसेवा केली म्हणूनच आज त्यांची नावे मोठ्या गौरवाने घेतली जातात.
मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे, आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. त्याचे जीवन हे एका शिखराप्रमाणे असते. त्यासाठी त्याला प्रयत्नरूपी पायऱ्या चढाव्या लागतात. 'जीवन असतं प्रयत्नांचं एक शिखर, प्रयत्न ज्याचे जास्त तोच असतो उंचावर!' शेरपा तेनसिंगनं एव्हरेस्ट चढण्यासाठी प्रयत्न केले. आज तो इतिहासात अमर झाला. आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. पुष्कळशी माणसे ध्येयवादी असतात, ते प्रयत्न करतात. काही फक्त दैवावर विश्वास ठेवून हातावर हात देऊन बसतात. ते कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. माणसाने कठोर परिश्रम करून सतत प्रयत्नशील राहून अंतराळात प्रवेश केला आहे. मंगळ ग्रहावर यंत्रमानव पाठवला आहे, अथांग सागराचा तळही त्याने शोधून काढला आहे. समर्थ रामदासांनी म्हटले आहे ते यथार्थ आहे. “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे"
प्रयत्नांबरोबरच उद्योगाची जोडही हवी. तरच कोणत्याही कार्यात यश मिळू शकते. जो सतत उद्योगात असतो त्याच्याजवळ लक्ष्मी व सरस्वती पाणी भरत असते. त्याला या जगात मानही मिळतो, काही संतांनी म्हटले आहे, “अशक्य ते शक्य करी सायासे' दुसऱ्या महायुद्धात जपान बेचिराख झाले होते; पण त्या लोकांनी हिंमत सोडली नाही, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून नवे जपान त्यांनी निर्माण केले. म्हणतात ना, मातीचे सोने झाले. तसेच बेचिराख झालेला जपान आज सर्व जगात अधिक प्रगत व उद्योगशील राष्ट्र समजले जाते. जपान हे राष्ट्र आज सर्वांसमोर एक आदर्श आहे. विद्यार्थ्यांनी जपानचे उदाहरण समोर ठेवून
जर प्रत्येक क्षेत्रात प्रयत्न केले तर त्यांना त्यांच्या आयुष्यात यश हमखास मिळेल. “कार्यात यश मिळो अथवा न मिळो प्रयत्न करण्यास कधीही माघार घेऊ नये”, असे लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे. देवाने आपल्याला दिलेल्या हाताचा व बुद्धीचा उपयोग करून यशाच्या शिखरावर चढले पाहिजे. प्रयत्न करणे हे माणसाच्या हातात असते. यश मिळणे अथवा न मिळणे हे आपल्या भाग्यावर अवलंबून असते. भाग्य अनुकूल असेल तर प्रयत्नांबरोबर यशही नक्कीच मिळेल.
COMMENTS