My Father Essay in Marathi Language : Today, we are providing माझे बाबा निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students ...
My Father Essay in Marathi Language : Today, we are providing माझे बाबा निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maze Baba Marathi Essay (My Father Essay in Marathi) to complete their homework.
माझे बाबा दिसायला किंचित उग्र व कडक शिस्तीचे वाटतात. पण ते मनाने फारच प्रेमळ आहेत. आम्हा मुलांवर तर त्यांचा फार जीव. माझ्या अभ्यासातील प्रगतीकडे त्यांचे बारीक लक्ष असते. माझे सामान्यज्ञान वाढावे म्हणून ते निरनिराळी सचित्र पुस्तके आणून माझ्याकडून वाचून घेतात. ते नवीन माहितीही छान समजावून सांगतात.
अभ्यासाबरोबरच मी भरपूर खेळावे असे त्यांना वाटते. म्हणून ते मला स्वतः मैदानावर घेऊन जातात. तेथे इतर मुलांबरोबर पकडापकडी, चोर-पोलीस, बॅट-बॉल वगैरे खेळताना मला खूप मजा वाटते.
सुट्टीच्या दिवशी दुपारी कॅरम, पत्त्यांचे डाव वगैरे खेळ बाबा माझ्याबरोबर खेळतात. कधी कधी आई व ताईही या खेळात सामील होतात. मग आम्हा चौघांचा खेळ खूपच रंगतो. माझे बाबा सध्या मला सायकल चालवायला शिकवीत आहेत.
माझे बाबा खूप सपजूतदार असून अकारण रागावलेले किंवा चिडलेले मी तरी त्यांना पाहिले नाही. त्यामुळे आमचे घर नेहमी आनंदी व उत्साही असते. माझ्या बाबांसारखे बाबा सर्वांनाच मिळावेत असे मला नेहमी वाटते.
माझे बाबा निबंध मराठी मधे - Majhe Baba Nibandh Marathi Madhe
'आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला?' असा प्रश्न गाण्यातल्या मुलांना पडला असला तरी मला मात्र आई इतकेच बाबाही आवडतात. दोघांचेही माझ्यावर खूप प्रेम आहे.माझे बाबा दिसायला किंचित उग्र व कडक शिस्तीचे वाटतात. पण ते मनाने फारच प्रेमळ आहेत. आम्हा मुलांवर तर त्यांचा फार जीव. माझ्या अभ्यासातील प्रगतीकडे त्यांचे बारीक लक्ष असते. माझे सामान्यज्ञान वाढावे म्हणून ते निरनिराळी सचित्र पुस्तके आणून माझ्याकडून वाचून घेतात. ते नवीन माहितीही छान समजावून सांगतात.
अभ्यासाबरोबरच मी भरपूर खेळावे असे त्यांना वाटते. म्हणून ते मला स्वतः मैदानावर घेऊन जातात. तेथे इतर मुलांबरोबर पकडापकडी, चोर-पोलीस, बॅट-बॉल वगैरे खेळताना मला खूप मजा वाटते.
सुट्टीच्या दिवशी दुपारी कॅरम, पत्त्यांचे डाव वगैरे खेळ बाबा माझ्याबरोबर खेळतात. कधी कधी आई व ताईही या खेळात सामील होतात. मग आम्हा चौघांचा खेळ खूपच रंगतो. माझे बाबा सध्या मला सायकल चालवायला शिकवीत आहेत.
माझे बाबा खूप सपजूतदार असून अकारण रागावलेले किंवा चिडलेले मी तरी त्यांना पाहिले नाही. त्यामुळे आमचे घर नेहमी आनंदी व उत्साही असते. माझ्या बाबांसारखे बाबा सर्वांनाच मिळावेत असे मला नेहमी वाटते.
माझे बाबा निबंध मराठी - My Father Essay in Marathi Language
"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असे म्हणतात; पण आईप्रमाणेच बाबांचे अस्तित्वही आपल्या जीवनात महत्त्वाचे असते. संसाररूपी रथ दोन चाकांवर चालतो त्यामुळे आपल्याला दोघांचेही तितकेच महत्त्व आहे. आपल्याला वडिलांच्या कृपाछत्राची पण आवश्यकता असते. । माझे बाबा प्राध्यापक रामचंद्र विष्णू सोमण. त्यांचे मूळ गाव महाड. माझ्या आजोबांची आर्थिक स्थिती बेताचीच होती. त्यामुळे बाबांना गरिबीची झळ सोसावी लागली. गरिबीतून वर आलेल्या माणसाचे जीवन सोन्याप्रमाणे मौल्यवान असते. माझे बाबा प्रथम महाडच्या, नंतर पुण्याच्या शाळेत शिक्षक होते. बडोदा येथे सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, फर्म्यसन कॉलेज, विलिंग्डन कॉलेज सांगली येथे प्राध्यापक होते. त्यांना प्राचार्य होण्याची जिद्द होती म्हणून ते पुणे सोडून विदर्भातील अकोला येथील सीताबाई आर्टस् कॉलेजात प्राध्यापक झाले. त्यानंतर कारंजा येथील गोएनका कॉलेजचा शुभारंभ त्यांच्या हातून झाला. Read also : My Mother Essay in Marathi
माझे बाबा खूप लोकप्रिय होते, प्रसिद्ध सिनेनट पृथ्वीराज कपूर बाबांना म्हणाले होते, “आपल्यासारखे प्राध्यापक मुंबईसारख्या शहरी हवे होते." माझ्या बाबांची विद्वत्ता, प्रखर बुद्धी व व्यासंग अद्वितीय होते. माझे बाबा म्हणजे ज्ञानाचा खजिना होते. त्यांना इंग्रजी, मराठी व संस्कृत भाषेचे सखोल ज्ञान होते. ते एक उत्तम वक्ता होते. माझ्या बाबांमध्ये आचार-विचारांची गीताई, सुविचारांची पाणपोई, संस्कारांची शिदोरी व माणुसकीची गंगा होती. ते परोपकारी, प्रेमळ, कष्टाळू स्वभावाचे होते. दुःखी व गरीब लोकांना ते नेहमी मदतीचा हात देत असत. ते सर्वांना दया दाखवत असत. त्यांच्या मते न्यायाला दयेची झालर असावी. त्यांचे विद्यार्थ्यांशी नाते मित्रत्वाचे होते. त्यामुळे विद्यार्थी वडिलांबरोबर होळी खेळत असत. गप्पागोष्टी करत असत. त्यांच्या गप्पांमधूनही ते एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान देत असत. विलक्षण प्रतिभा असलेली असामान्य व्यक्ती म्हणजे माझे बाबा. विविध पैलूंनी झगझगणारे माझ्या बाबांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आठवणींची गाथा सांगितली तर एक मोठे पुस्तक तयार होईल. त्यांच्याबद्दल म्हणावे लागेल, Read also : माझा दादा मराठी निबंध
“मूर्ती साधी तरी दिसे विद्वत्तेचे तेज।
सरस्वतीची मूर्ती, दिसे साधी तरी दिसे
व्यासंगाची झेप।
सरस्वतीची अखंड सेवा व्रत होते हेच।"
अशा या माझ्या बाबांबद्दल मला मोठा अभिमान आहे. माझे बाबा म्हणजे ज्ञानाचा खजिना होते. जो कधी संपतच नव्हता. कोणत्याही विषयावर बोला ते आपल्याला त्याचे पूर्ण ज्ञान देतील. अशा या सर्वगुणसंपन्न बाबांची मी मुलगी आहे याचा मला मोठा अभिमान आहे. Read also : Majhi Aaji Nibandh Marathi
Too good and interesting essay. Best suggested for this topic
ReplyDelete