Majhi Aaji Essay in Marathi Language : Today, we are providing माझी आजी निबंध मराठी मधून For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Stude...
Majhi Aaji Essay in Marathi Language : Today, we are providing माझी आजी निबंध मराठी मधून For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Essay on My Grandmother / Majhi Aaji in Marathi Language to complete their homework.
माझी आजी निबंध मराठी मधून - Majhi Aaji Essay in Marathi Language
माझे आई-बाबा दोघेही नोकरी करतात. त्यामुळे मी जास्त काळ माझ्या आजीच्याच सहवासात असते. माझी आजी चांगली शिकलेली असल्यामुळे तिच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळतात.
ठेगणी-ठुसकी व किरकोळ शरीरयष्टीची माझी आजी खूप प्रेमळ आहे. 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' अशा या माझ्या आजीला काय येत नाही ते विचारा. Read also : Essay on My House in Marathi
अभ्यासात तर ती हुशार आहेच. पुस्तकातल्या कविता ती माझ्याकडून पाठ करून घेते. तशीच अडलेली गणितेही ती लगेच सोडवून देते. तिची शिकवण्याची पद्धत इतकी छान आहे की प्रथम अवघड वाटलेला विषय नंतर एकदम सोपा वाटू लागतो. Read also : Majhi Aaji Nibandh Marathi
माझी आजी कविता करते. शाळेतील वेशभूषा स्पर्धेत गेल्या वर्षी तिने माझ्यासाठी 'झाशीवाली रणरागिणी' हे गाणे लिहून माझ्याकडून साभिनय म्हणून घेतले. तसेच मी दुसरीत असताना 'ढमा ढमा ढोलकं' हे डोंबारणीचे गाणे माझ्याकडून बसवून घेतले. दोन्ही वर्षी स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला.
याशिवाय संक्रांतीला हलव्याचे दागिने बनवणे, हलवा ठेवण्यासाठी छोटे बटवे तयार करणे, माझ्या बाहुलीसाठी छोटीसी गादी-उशी-पांघरूण तयार करणे, मण्यांच्या विविध वस्तू बनवणे असे आजीचे आवडते छंद आहेत. या सर्व कामात माझी तिच्यामागे लुडबूड चालू असतेच. Read also : Majhi Aai Marathi Nibandh Lekhan
अशी ही माझी गुणी आजी सर्वांना मदत करायला तयार असते. म्हणून ती सर्वांनाच हवीहवीशी वाटते.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS