Mahatma Jyotiba Phule Essay in Marathi Language : Today, we are providing महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9...
Mahatma Jyotiba Phule Essay in Marathi Language : Today, we are providing महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mahatma Jyotiba Phule Essay in Marathi Language to complete their homework.
महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध - Mahatma Jyotiba Phule Essay in Marathi Language
कुठलीही सुधारणा म्हटली की तिच्या मुळाशी संघर्ष हा आलाच. कारण वर्षानुवर्ष जपत आलेल्या रूढीपरंपरा बदलण्याचा समाजाचा कल नसतो. प्रथम ह्या रूढीपरंपरा चुकीच्या आहेत, बदलत्या काळाबरोबर त्या जुन्या झाल्या आहेत, म्हणून बदलल्या पाहिजेत, यासाठी समाजमानस बदलण्याचे शिवधनुष्य पेलावे लागते. काही वेळा "हे बदललं पाहिजे" असं प्रत्येकाला वाटत असतं. पण “हे दुसऱ्याने करावे" असे वाटून पाऊल टाकण्यासाठी कुणी तयार होत नाही. महात्मा फुले यांनी मात्र प्रचंड विरोध सहन करीत, फार मोठा संघर्ष करीत स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, दलितोद्धार ह्या क्षेत्रामध्ये मोठी सुधारणा घडवून आणली. 'महात्मा' हा शब्दही थिटा पडावा असे महान कार्य त्यांनी केले. Read also : Janseva Hich Ishwar Seva Marathi Nibandh
जोतिबा फुल्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले. भरपूर वाचन केले आणि ते बहुश्रुत झाले. शिक्षण घेऊन प्रगल्भ झालेल्या मनाला समाजातील अनिष्ट प्रथांची जाणीव झाली. स्त्रियांची परिस्थिती अतिशय दयनीय होती. स्त्रियांचा बालविवाह होत असे. एखादी खी बालवयातच विधवा झाली तर तिचे अपरिमीत हाल होत असत. तिला केशवपन करून स्वयंपाक घराच्या कामाच्या रगाड्याखाली चेपून टाकले जात असे. केशवपनाची अनिष्ट रूढी बंद पडावी म्हणून जोतीराव फुल्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला होता. विधवांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी चळवळ उभारली. Read also : महात्मा गांधी निबंध मराठी
ह्या सगळ्या अनिष्ट रूढी बंद करायच्या असतील तर स्त्रियांनी शिक्षित होणे गरजेचे आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव त्या शिक्षित झाल्यानंतरच त्यांना होईल ह्या विचाराने त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली. "आधी केले मग सांगितले." या न्यायाने त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला शिकवले. मुलींना शिकवण्याचे त्यांनी सावित्रीबाईंवर सोपवले. लोकांनी मारलेले दगडगोटे, चिखल सारं काही सावित्रीबाईंनी हसतमुखाने झेलले. पण मुलींना ज्ञानदान करण्याच्या निश्चयापासून त्या ढळल्या नाहीत. स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य त्यांनी अव्याहत चालू ठेवले. Read also : लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध
दलितोद्धारासाठी त्यांनी स्वत:च्या घरचा पाण्याचा हौद दलितांना पाणी पिण्यासाठी खुला करून दिला. “परमेश्वर जर प्राणिमात्रांमध्ये भेदभाव करत नाही तर तो अधिकार मानवाला कोणी दिला? समाजातील एखाद्या वर्गासाठी ईश्वराने सर्व काही निर्माण केले आहे असा गर्व कुणी करू नये," अशी त्यांची धारणा होती. समाजातील विषमता दूर व्हावी ह्या विचाराने त्यांनी सर्व धर्माच्या नागरिकांना सत्यशोधक समाजाचे सदस्य करून घेतले. अशा ह्या जाणत्या नेणत्या समाजसुधारकाला माझा मानाचा मुजरा!
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
happy mahatma phule jyanti
ReplyDeleteThank you @Vikash
Delete