Maharashtrachi Sanskruti Marathi Nibandh : Today, we are providing महाराष्ट्राची संस्कृती मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ...
Maharashtrachi Sanskruti Marathi Nibandh : Today, we are providing महाराष्ट्राची संस्कृती मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maharashtrachi Sanskruti Nibandh / Essay in Marathi Language to complete their homework.
महाराष्ट्राची संस्कृती मराठी निबंध - Maharashtrachi Sanskruti Marathi Nibandh
प्रत्येक देशाचा वेगळा असा एक इतिहास आहे. प्रत्येक देशाच्या परंपरा, रीतीरिवाज, धर्म वेगवेगळे आहेत. देशाच्या राज्यकारभारातही वेगळेपणा असतो. त्याचप्रमाणे ज्या राज्यांनी हा देश बनलेला असतो त्या राज्यांचा एक वेगळा इतिहास आहे. त्या राज्यांच्या चालीरीती, जडणघडण, भाषा, पेहराव, संस्कृती वेगवेगळ्या आहेत. ज्या मातीने व्यक्तीची जडणघडण केली त्या मातीत तो एकरूप झालेला असतो. माणूस ज्या ठिकाणी जन्मला, लहानाचा मोठा झाला, जिथे त्याच्यावर संस्कार घडले त्या जागेचा किंवा त्या ठिकाणाचा त्याच्यावर प्रभाव असतो त्या त्या जागेशी, तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेला असतो. महाराष्ट्र हे राज्य महान व्यक्तींचे राज्य आहे. मराठी माणसांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, अशा महान महाराष्ट्राची संस्कृती वाखाणण्यासारखी आहे. Read also : एकविसाव्या शतकातील आव्हाने
महाराष्ट्राची संस्कृती विशाल व समृद्ध आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात संतांचा फार मोठा वाटा आहे; म्हणून महाराष्ट्र हे ' संतांचे राष्ट्र' म्हटले जाते. या संतांचे अभंग, ओव्या, खेडोपाडी, घराघरांत पोहोचलेले आहेत. या महान संतांनी लोकाना सदाचाराची शिकवण दिली. एक काळ असा होता की, ज्या वेळी समाजात वर्णभेद, धर्मभेद, वंशभेद फोफावले होते; वाईट चालीरीती, अंधश्रद्धा यांचा लोकांवर खूपच प्रभाव होता; त्या काळात संतांनी समाजात असलेले जातिभेद विसरून संपूर्ण समाजालाभक्तिसाधनेचा मार्ग दाखविला. त्यांनी दिलेले तत्त्वज्ञान हे लोकशिक्षणाचे महत्त्वाचे साधन आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत संतांचा एवढा प्रभाव आहे की, आजच्या विज्ञानयुगात सुद्धा दरवर्षी पंढरपूरला एकादशीला यात्रेसाठी हजारोवारकरी नेमाने जातात. ही मानवी श्रद्धा पहिली की महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भव्यता करते. Read also : मी पृथ्वी बोलत आहे मराठी निबंध
महाराष्ट्राच्या संस्कृतीत जशी संताची परंपरा आहे. तशीच इथे साहित्यिकाचीही परंपरा आहे. ज्ञानेश्वरानी मराठीतूनचज्ञानेश्वरी लिहून त्याची प्रचीती दिली आहे.संत चोखामेळा सावतामाळी नरहरि लोनार, नामदेव शिंपी,तुकाराम कान्होपात्रा या सवीचे लिखाण हाच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमोल ठेवा आहे.अत्यंत प्राचीन लेखन परंपरांची ठेव या महाराष्ट्राच्या संस्कृतीने जपली आहे. Read also : राखी पौर्णिमा मराठी माहिती निबंध
महाराष्ट्राच्या संस्कृतीत श्रद्धेला खूप महत्त्व आहे. या संस्कृतीत आठवड्याचा प्रत्येक बार प्रत्येक देवतेचा असतो, तसेच सर्व सण, बार, उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे करतात. प्रत्येक सणाचे वेगळेपणजपलेले आहे. प्रत्येक सण हा निरनिराळ्या कारणांसाठी साजरा होतो. उदा. पोळा हा बैलाचा सण आहे, तर नागपंचमी हा मागाला पुजण्याचा सण आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीने निसगांपासून ते पशुपक्ष्याचे महत्त्व सणावारातून जपलेले आहे.या सणाच्या निमित्ताने इथले लोक एकत्र येतात. आपला आनंद एकमेकांत वाटतात, महाराष्ट्राच्या संस्कृतीत मराठी माणसाच्या पोशाखालाही खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रीयन माणूस धोतर, डोक्याला मुंडासे किंवा फेटा,पायात विशिष्ट चेपला,अंगरखाअसा पोशाख पुरुष घालता; तर स्त्रिया नऊवारी साडी, नथ, कपाळावर कुंकू असा पेहराव करतात. महाराष्ट्रीयन पोशाखातून, पद्धतीतून, रीतीरिवाजातून महाराष्ट्रसंस्कृतीचे दर्शन आपल्याला होते. Read also : पंढरीची वारी मराठी निबंध
महाराष्ट्राच्या संस्कृतीत संगीताचीही एक खास वेगळी परंपरा आहे. मराठी माणसाने शाब्दिक काव्यातील लावणी आणि पोवाडा हे महत्त्वाचे काव्य प्रकार मोठ्या अभिमानाने जपलेले आहेत. तमाशा हा लोकसंगीताचा प्रकार हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. शिवाय वासुदेव, कुडमुड्या जोशी, गोंधळी, वाघ्यामुरळी ही मराठी संस्कृतीची प्रमुख निदर्शक आहेत. Read also : गुढीपाडवा मराठी निबंध माहिती
महाराष्ट्राच्या संस्कृतीत व परंपरेत महाराष्ट्रीय देवदेवतांचे, त्यांच्या पूजनाच्या पद्धतीचे, मराठी माणसाच्या स्वभावाचे खास पैलू प्रकट होतात. अशा या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा आम्हा महाराष्ट्रीयांना नेहमीच अभिमान वाटतो.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS