Guru Purnima Essay in Marathi Language : Today, we are providing गुरुपौर्णिमा विषयी निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & ...
Guru Purnima Essay in Marathi Language : Today, we are providing गुरुपौर्णिमा विषयी निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Guru Purnima Essay / Nibandh in Marathi Language to complete their homework.
गुरुपौर्णिमा विषयी निबंध मराठी - Guru Purnima Essay in Marathi Language
प्रत्येक महिन्यांत एक पौर्णिमा येते आपल्याला माहित आहे. पौर्णिमेच्या दिवशी रात्री आकाशांत ताटली सारखा गोल आणि पूर्ण प्रकाशित चंद्र दिसतो. चंद्राच्या प्रकाशाला चांदणे म्हणतात. पूर्ण चंद्र बघायला खूप छान वाटते. चंद्राचा प्रकाश शांत असतो. आषाढांत जी पौर्णिमा येते ना, त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात.
गुरूपौर्णिमेला गुरूची पुजा करायची असते. गुरूला नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. मित्रांनो! चंद्र दररोज थोडा थोडा प्रकाशित होतो व पौर्णिमेला पूर्ण गोल प्रकाशित होतो, त्याप्रमाणेच आपले गुरुजी रोज नवेनवे ज्ञान, शिकवण आपल्याला देतात आणि आपण खूप मोठे प्रकाशमान व्हावे, असा प्रयत्न करतात. मग त्यांच्या पायावर डोके ठेवायला हवेच नां? Read also : माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध
आई-बाबा आपले पहिले गुरू आहेतच, पण शाळेत गेल्यावर नवे गुरू आपल्याला मिळतात. ते आपल्याला ज्ञान देतात. शाळेतले गुरू आपल्याला भाषा, शास्त्र, गणित, इतिहास, भूगोल हे विषय तर शिकवतातच; पण त्याबरोबर गाणे सभेत बोलणे, मैदानावर उत्तम खेळणे, चांगले लेखन करणे ह्या गोष्टी शिकवतात.
धीटपणा, स्वच्छता, मित्रांशी मिळून- मिसळून वागणे, चांगला विचार करणे ह्या गोष्टी पण शाळेतल्या गुरूकडून शिकायला मिळतात. आम्ही दरवर्षी शाळेत गुरूपौर्णिमा हा दिवस साजरा करतो, वर्ग सजवतो. व्हरांडा झाडून स्वच्छ करतो. नंतर सर्व गुरुजींना सुगंधी फुले देतो आणि एकत्र येऊन गुरूला वचन देतो.
गुरुजी! तुम्ही वर्षभरांत जे जे आम्हाला ज्ञान दिले ते ते सर्व आम्ही घेतले आहे. त्याप्रमाणे वागण्याचे आणि खूप खूप मोठे होण्याचे आम्ही नक्की प्रयत्न करू. तुमचे नाव मोठे करु.. Read also : परीक्षेच्या निकालाचा दिवस निबंध
नंतर गुरुजी आपले विचार सांगतात.
"मुलांनो! आयुष्याच्या वळणावरती आपल्याला वेगवेगळा गुरू भेटतो, वाट दाखवितो, त्या वाटेवरुन तुम्ही गेला तर जे जे तुम्हाला हवे ते सर्व मिळेल. गुरुचा आशीर्वाद आहे.
गुरुपौर्णिमा हा दिवस गुरू आणि शिष्य दोघांसाठी महत्त्वाचा असतो.
This essay is provided to you by Target Publication. Please visit there website here in order to fine good Marathi books.
COMMENTS