Garden Essay in Marathi Language : Today, we are providing बाग उद्यान मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students c...
Garden Essay in Marathi Language : Today, we are providing बाग उद्यान मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Garden Essay Nibandh / Essay in Marathi Language to complete their homework.
बाग (उद्यान) मराठी निबंध - Garden Essay in Marathi Language
उद्यान म्हणजे बाग. ऐतिहासिक काळात मोठमोठ्या बागा होत्या. भरपूर लांब-रुंद अशा त्या बागा होत्या. भव्यता हा त्या उद्यानांचा विशेष होता. अनेक त-हेचे मोठेमोठे वृक्ष त्या उद्यानात डौलने डुलत असत. त्या काळात कोणत्या ना कोणत्या तरी देवदेवतांचे देवालय बागेत असे. राज्य करणारा राजा जेवढा रसिक, सौंदर्याची जाण असणारा; तेवढी त्या उद्योगाची शोभा वाढलेली असे. भव्य वृक्ष, बहरलेल्या वेली- फलभारांनी वाकलेली फळझाडे त्या उद्यानांत पाहवयास मिळत. एखादा तलाव व त्यात विहार करणारे पक्षी, कमळांनी सुशोभित अशी एक-दोन तळी अशी त्या काळाच्या उद्यानांची रचना असे. राजा-राणीला विश्रांतीसाठी या बगिच्यांचा उपयोग होत असे. प्रजाजनालाही फिरण्याची, विश्रांती घेण्याची सोय असे. सर्व प्रकारच्या वेली उद्यानात आपले सुस्वरूप फुलांद्वारे उघड करीत. भव्यता हा त्या उद्यानांचा विशेष असे. रक्षकांच्या पहाऱ्यात ही उद्याने जपली जात. प्रदूषणापासून मुक्त अशी ही उद्याने असत. ती केवळ विश्रांतिस्थाने असत. Read also : Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh
आजची उद्याने आकाराने लहान असली, तरी ती निर्माण करण्यात सामाजिक दृष्टिकोण ठेवलेला असतो. केवळ विश्रांतीच्या चार घटका सुखाने घालवणे हा एकमेव हेतू ठेवून ती तयार केलेली नाहीत. वृद्धांना विश्रांती, प्रौढांना शांती आणि लहान मुलांना मौज-मजेची मेजवानी मिळावी हा त्या मागचा हेतू ठेवलेला दिसतो.
घाई गर्दीच्या नित्याच्या वेळेतून काही क्षण सुखाने घालविता यावेत यासाठी त्यांची योजना केलेली असते. मुलांना त्यांची हौस पुरविता यावी म्हणून आधुनिक पद्धतीने खेळाची साधनेही उपलब्ध होतील, याची खबरदारी घेतलेली असते. चार-पाच वर्षांपासून ते दहा-बारा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या खेळाची साधने या उद्यानात असतात. मुले त्याचा भरपूर उपयोग करून घेतात. लहान लहान मुलांच्या बरोबर त्यांचे आई-वडीलही मुक्तपणे मुलांत रममाण झालेले दिसतात. त्यानाही आजच्या उद्यानात रमता येते. मनाचा मोकळेपणा मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव नकळत वावरताना दिसतो. आजच्या उद्यानात मुलांच्या दृष्टिकोणातून विचार केलेला दृष्टीस पडतो. Read also : Pandharichi Vari Essay in Marathi
स्वच्छता हा या उद्यानस्थळांचा प्राण असतो. स्वच्छता राखली जावी यासाठी यंत्रणाही कार्यरत असते. शिवाय येणाऱ्या लोकांवर काही बंधने घातलेली असतात. विविध रंगांची, मन वेधून घेणारी फुलझाडे बागेत दिसतात. या फुलझाडांना हात लावण्यास अगर त्यांची फुले तोडण्यास बंदी असते. गवतांचे विविध आकाराचे गालिचे मुद्दामहून तयार केलेले असतात. डोळ्यांना प्रसन्नता लाभावी,हा त्या मागील हेतू असतो.युवक-युवातींचे गप्पागोष्टींचे स्थान म्हणूनही काही उद्याने दिसतात. आजची उद्याने भव्य नाहीत, पण सौंदर्याचा दृष्टिकोण या उद्यानांना लाभलेला असतो. शास्त्रीय दृष्टिकोण ठेवून सामाजिक जीवनाला रम्यता प्राप्त करून देण्याचा उद्देश आजच्या उद्यानात ठेवलेला असतो. प्रदूषणाने वेढलेल्या शहरी जीवनात स्वच्छ, सुंदर, प्रसन्न वातावरण असलेली ही लहान-लहान बेटेच (ओअॅसिस) असतात. लहान लहान मुलांची पर्यटनस्थळेच असतात. प्रौढांनाही शांतिसुखाचे समाधान देणारी, निसर्गाचे सौम्य दर्शन घडवणारी, आत्मोन्नतीची सुख साधने असतात. या उद्यानांचा तजेलदारपणा राखण्यात व सुरक्षित ठेवण्यात सुबुद्ध नागरिकांनी प्रयत्नशील राहावे अशीच अपेक्षा या आजच्या बागबगिच्यांनी केली, तर ते चुकीचे होईल का? Read also : फुलांचे आत्मवृत्त निबंध मराठी
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS