Ekvisavya Shatkatil Avhane Marathi Nibandh : Today, we are providing एकविसाव्या शतकातील आव्हाने मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10...
Ekvisavya Shatkatil Avhane Marathi Nibandh : Today, we are providing एकविसाव्या शतकातील आव्हाने मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use 21 व्या शतकातील आव्हाने निबंध (Ekvisavya Shatkatil Avhane) to complete their homework.
एकविसाव्या शतकातील आव्हाने - 21 व्या शतकातील आव्हाने - Ekvisavya Shatkatil Avhane Marathi Nibandh
विसाव्या शतकाच्या अंतिम दशकातच एकविसाव्या शतकाच्या स्वागताची उत्कंठा निर्माण झाली होती. एकविसावे शतक सुरू झाले आणि या शतकातील काही वर्षे उलटूनही गेली. या शतकातील काही आव्हानांचा अंदाज आपल्याला आधीपासून होता. आता तर ही आव्हाने थेट आपल्यासमोर येऊन उभी ठाकली आहेत.
विसाव्या शतकातील दोन महायुद्धे आणि त्यानंतर दोन महासत्तांमध्ये चाललेले शीतयुद्ध यांनी वैज्ञानिक संशोधनाला विलक्षण गती दिली. संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. माहिती मिळविण्यासाठी इंटरनेटसारखे प्रभावी माध्यम उपलब्ध झाले. राष्ट्राराष्ट्रांमधील अंतर झपाट्याने कमी झाले. विविध व्यापारी करारांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. सारे जग जणू एक झाले. जागतिकीकरण ही एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी घडलेली एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. विविध आव्हांनाना या प्रक्रियेचा संदर्भ आहे. Read also : Garden Essay in Marathi Language
कोणतेही आव्हान हे समस्येशी निगडित असते. प्रदूषण ही एक फार मोठी समस्या आहे. वाहनांचा अतिवापर, कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर, निसर्ग ज्याला सामावून घेत नाही असा प्लॅस्टिकचा कचरा, बेसुमार वृक्षतोड यांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. ओझोनच्या थरामध्ये छिद्रे निर्माण होऊन पृथ्वीचे तापमान वाढत आहे. धुव्रप्रदेशातील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याचाही धोका आहे. पर्यावरण-रक्षणाचे प्रभावी उपाय योजून या आव्हानांचा मुकाबला करावा लागणार आहे.
लोकसंख्या वाढ ही सर्व जगाला भेडसावणारी समस्या आहे. भारताला या आव्हानाचा प्राधान्यक्रमाने सामना करावा लागणार आहे. कॅन्सर, एड्स आदी रोगांचा प्रसार झपाट्याने होत आहे. या रोगांविरुद्धची मोहीम विविध पातळ्यांवर राबविली जात आहे. पोलिओपासून मुक्ती मिळण्यासाठी पल्स पोलिओसारखे उपक्रम केले जात आहेत. अशीच आणखी काही आव्हाने विचारपूर्वक करावयाच्या प्रयत्नांनी परतवून लावता येतील. Read also : महागाईचा भस्मासूर मराठी निबंध
श्रीमंत आणि गरीब यांमधील रुंदावणारी दरी हे एक मोठे सामाजिक आव्हान आहे. ज्यांच्याकडे सर्व काही आहे असा आहे रे वर्ग' आणि ज्यांना जीवनावश्यक साधनेही मिळत नाहीत असा 'नाही रे वर्ग' यांचा समन्वय साधला गेला नाही तर वर्गसंघर्ष अटळ होईल. बेकारी हा वरील समस्येचाच एक पैलू आहे. पुरेसे शिक्षण घेऊनही काम मिळत नसेल तर तरुणांना वैफल्य येते. ते गैरमार्गाला लागतात आणि त्यामुळे समाजातील गुन्हेगारी वाढत जाते. एकविसाव्या शतकातील बदलत जाणारी कुटुंबव्यवस्था हेही मला एक मोठे आव्हान वाटते. वृद्धांसाठी वृद्धाश्रम आणि बालकांसाठी पाळणाघरे काढावी लागणे ही एका परीने समाजाची शोकांतिका आहे. माणसामाणसांमधील अंतर वाढत जाणे ही अनेक समस्यांची अंतिम परिणती आहे. एकविसाव्या शतकात या आव्हानांचा प्रत्यय विशेषत्वाने येईल.
या आव्हानांचा प्रतिकार कसा करता येईल? समस्यांचे स्वरूप पाहूनच प्रतिकाराचा मार्ग निवडावा लागेल हे खरे, परंतु मुख्य सूत्र मानवतावादी विचारांच्या प्रस्थापनेचे असावे लागेल. बाबा आमटे, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. अमर्त्य सेन आदी कृतिशील विचारवंतांकडून प्रेरणा घेऊन कार्य केले तर आव्हानांचा प्रतिकार अशक्य नाही. समाज कसा असावा याविषयी बाबा आमटे यांनी लिहिले आहे : Read also : My Favourite Person Marathi Essay
येथे नांदतात श्रमर्षी, या भूमीला क्षरण नाही येथे ज्ञान गाळते घाम, विज्ञान दानवशरण नाही येथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही...
असा समाज निर्माण करणे, हेच एक मोठे आव्हान आहे. ते अवघड आहे,
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS