Autobiography of An Old Temple in Marathi : Today, we are providing भग्न देवालयाचे आत्मवृत्त निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11...
Autobiography of An Old Temple in Marathi : Today, we are providing भग्न देवालयाचे आत्मवृत्त निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Autobiography of An Old Temple Nibandh / Essay in Marathi Language to complete their homework
भग्न देवालयाचे आत्मवृत्त निबंध मराठी - Autobiography of An Old Temple in Marathi
झाडाझुडपांतून अस्पष्ट दिसणारे ते पुरातन देऊळ आम्हाला खुणावत होते. आजूबाजूला दाट हिरवी झाडी होती. शांत, प्रसन्न वातावरणात पक्ष्यांची किलबिल कानावर पडत होती. दूरवर डोंगरावरून खाली कोसळणारा पांढराशुभ्र झरा पाहून मनात विचार आला, ही तर स्वर्गातून पृथ्वीवर अवतरणारी दूधगंगाच! आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत, झपाझप पावले टाकत आम्ही मैत्रिणी छोटी टेकडी चढून त्या पुरातन मंदिराजवळ आलो, पण समोरील दृश्य पाहून मन हेलावून गेले. मंदिराची बरीच पडझड झालेली दिसत होती. गाभाऱ्यातील मूर्तीची बरीच वर्षे कुणी पूजा केलेली नव्हती. भिंतीवरील कोरीव नक्षीकाम अतिशय सुबक होते, पण त्यावर ठिकठिकाणी जाळी, जळमटे पसरलेली होती. आम्ही मुलींनी एक-दोन तासांतच ते मंदिर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून टाकला. देवळात तुपाचा दिवा लावून व देवाला भक्तिभावाने नमस्कार करून फुले वाहिली. 'श्रमदान' करण्याच्या हेतूनेच तर आम्ही या टेकडीवरच्या देवालयात आलो होतो. काम पूर्ण होताच आम्ही निघालो. इतक्यात..... Read also : मी पृथ्वी बोलत आहे मराठी निबंध
...इतक्यात एक घनगंभीर आवाज आला, “मुलींनो, तुम्ही जे सत्कार्य केले त्याबद्दल धन्यवाद!" आम्ही मुली चमकून आजूबाजूस पाहू लागलो, पण मनुष्यच काय, एखादे चिटपाखरूही दिसत नव्हते. आता मात्र आमचे धाबे दणाणले! उगीचच या निर्मनुष्य टेकडीवर आलो, असे वाटू लागले.
"अरेच्च्या! तुम्ही मुली अशा घाबरू नका... मी.... मी भग्न देवालय बोलत आहे. अतोनात दुःख झाले तर दगडालाही वाचा फुटते असे म्हणतात ना, ते खरे आहे! आज मी माझी व्यथा तुमच्यापाशी व्यक्त करीत आहे! Read also : Shetkaryachi Manogat Nibandh in Marathi
"कित्येक वर्षांपूर्वी एका धनाढ्य सावकाराने हे मंदिर बांधले. सावकार अतिशय श्रीमंत, परंतु धार्मिक व दयाळू होता. मोठ्या धुमधडाक्यात, जल्लोशात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात ‘देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. काही दिवसांतच टेकडीवरील वर्दळ वाढू लागली. भजन-कीर्तनात भक्तगण रमू लागले. टाळमृदंगाच्या मंजूळ स्वरांनी सारा परिसर मंत्रमुग्ध बनला. नवरात्रीच्या उत्सवापूर्वी धनिक सावकाराने देवीसाठी रत्नजडित सोन्याचा मुकुट व सोन्याचांदीचे अलंकार तयार केले. सगळे गावकरी आनंदित झाले. नवरात्रोत्सव जोरदार साजरा करायचा असे जो-तो म्हणू लागला.
“परंतु नियतीच्या मनात मात्र काहीतरी निराळेच होते. नवरात्रोत्सव सुरू झाला. सारे मंदिर लक्ष दिव्यांच्या ज्योतींनी उजळून गेले. देवीच्या जयघोषाने सारे आवार दुमदुमून गेले. एके रात्री मात्र, सारे भक्तगण आरती म्हणण्यात दंग झाले असतानाच अचानक दरोडेखोरांनी मंदिरावर हल्ला चढविला. Read also : Pustakachi Atmakatha Essay in Marathi
"ज्यांनी ज्यांनी प्रतिकार केला त्या सर्वांना आपले प्राण गमवावे लागले. देवीचा सोन्याचा मुकुट आणि अलंकारांसाठी त्या क्षुद्र माणसांनी भक्तजनांची कत्तल केली. 'नरेचि केला हीन किती नर!' असे मला वाटले. समोरचे अंत:करण हेलावून टाकणारे दृश्य पाहून माझ्यासारख्या पाषाणालाही पाझर फुटला! मंदिर बांधणारा तो बिचारा धनिक सावकारही दरोडेखोरांना प्रतिकार करता करता गतप्राण झाला.
“या दुर्दैवी घटनेनंतर लोकांचा जणू या देवावरील, मंदिरावरील विश्वासच उडाला! एके काळी भक्तजनांनी फुललेले हे आवार हळूहळू निर्मनुष्य होत शेवटी अक्षरशः भकास वाटू लागले. सोने आणि चांदी मृत्तिकेसमान मानणारे संत तुकाराम कुठे आणि द्रव्यापायी निष्पाप भक्तांची कत्तल करणारे क्रूर दरोडेखोर कुठे! देवा, खरोखर तुझी लीला अगाध आहे!Read also : Fulache Atmavrutta Nibandh in Marathi
“तर अशी ही माझी कर्मकहाणी. आज कित्येक वर्षांनी या देवळाच्या पायऱ्यांना श्रद्धाळू भक्तांचा स्पर्श झाला. आज मनाच्या गुहेत साकळलेली स्मृती जागृत झाली आणि मी तुम्हा मुलींना माझी कर्मकहाणी सांगितली. भाविकांच्या पदस्पर्शाने आज मला अत्यानंदाने भरून आले आहे. पूर्वीसारखीच भक्तांची वर्दळ इथे पुन्हा कधी सुरू होईल याची वाट पाहत बसणे, एवढेच आता माझ्या हाती उरले आहे!"
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS