Today, we are publishing विज्ञान आणि मानव निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Article Vidnyan Ani ...
Today, we are publishing विज्ञान आणि मानव निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Article Vidnyan Ani Manav Essay In Marathi language in completing their homework and in competition.
विज्ञान आणि मानव निबंध मराठी - Vidnyan Ani Manav Essay In Marathi
मानवाचा इतिहास हा त्याच्या भौतिक प्रगतीचाही इतिहास आहे. निसर्गातील कोणताही सजीव अधिक सुखदायक परिस्थिती प्राप्त करण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. माणूस हा निसर्गातील सर्वात बुद्धिमान सजीव आहे, त्यामुळे तो तर हा प्रयत्न सजगपणे, विचारपूर्वक करतो. वर्षानुवर्षे आणि पिढ्यान्पिढ्या मानवाने अनुभवांच्या आणि निरीक्षणांच्या आधारे सुखाचा शोध घेतला.
गरज ही संशोधनाची जननी असते. मानवाला विज्ञानाचे पंख लाभले आणि त्याने गगनभरारी घेतली. सुरुवातीला माणसाला अग्नी निर्माण करता येऊ लागला. त्याचे खाद्यजीवन सुधारले. चाकाचा शोध लागला आणि मानवाला गती मिळाली. धातूंचा शोध लागला. धान्यनिर्मितीचे प्रयोग सुरू झाले. वस्त्रप्रावरणे वापरणे आवश्यक झाले. माणसाची घरे आधुनिक झाली. माणूस समूहप्रिय असल्यामुळे विचारांची देवाणघेवाण करू लागला. नव्यानव्या वैज्ञानिक शोधांचा उपयोग वेगवेगळ्या मानवसमूहांना होऊ लागला.
एकोणिसाव्या शतकात कारखानदारी वाढली. विसाव्या शतकात मानवी जीवन अधिकच यंत्रवत् झाले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तर विज्ञानाची प्रगती आश्चर्यकारक वेगाने होत गेली. आज सगळे जग जणू एक झाले आहे. मानवी संपर्कव्यवस्थेत क्रांती झाली आहे. संगणकाचे अधिराज्य प्रस्थापित झाले आहे. इंटरनेटमुळे कोणतीही माहिती क्षणार्धात मिळू लागली आहे. वाहनांचा वेग वाढला आहे. अर्थव्यवहार झपाट्याने करता येत आहेत. नवनवीन औषधांमुळे विविध रोगांवर नियंत्रण आले आहे. बालमृत्यूंचे प्रमाण घटले आहे. मानवाचे सरासरी आयुष्यमानही वाढलेले आहे.
हे सुखद चित्र पाहताना आपल्याला असे वाटले की माणूस जणू सुखाच्या परमोत्कर्ष बिंदूवर आहे. पण वस्तुस्थिती तशी आहे का? मानवी लोकसंख्या भरमसाट वाढली आहे. या लोकसंख्येला अन्न-वस्त्र-निवारा-औषधे पुरवताना एकूण व्यवस्थेवरच ताण येत आहे. वाहने वाढली त्याप्रमाणात प्रदूषणही वाढले आहे. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे अन्नधान्य आणि पाणीही आता सुरक्षित राहिलेले नाही. नैसर्गिक साधनसामुग्रीचा असंतुलित वापर होत आहे. ही साधनसामुग्री कधीतरी संपणार याचा विचार न करता ती लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न मानवाकडून होत आहे. दोन महायुद्धे आणि त्यानंतरची छोटी-मोठी युद्धे यांमुळे संहारक अस्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. एड्स, कॅन्सर आदी प्राणघातक रोगांवर अजूनही विज्ञानाला पूर्ण विजय मिळविता आलेला नाही.
'विज्ञानाने मानव सुखी झाला काय?' या प्रश्नाचे ठामपणे होकारार्थी उत्तर देता येत नाही. विज्ञानामुळे भौतिक सुखे जरूर मिळाली, पण अंतिम सुख मानवजातीला मिळालेले नाही.शांततामय सहअस्तित्व आणि पर्यावरण-रक्षण यातूनच मानवाला अंतिम सुख लाभणार आहे. त्यासाठी विज्ञानाला ख्रिस्त-बुद्धांच्या करुणेची जोड द्यायला हवी. 'मज लोभस हा इहलोक हवा' या कवितेत बा. भ. बोरकरांनी एक सुंदर विचार नोंदवला आहे :
मार्साचा मज अर्थ हवा अन् फ्रॉइडाचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरि गांधींचा मज राम हवा
सुखी होण्यासाठी मानवाला विज्ञानाची मदत घ्यायलाच हवी, पण करुणा आणि कर्तव्य यांना विसरून चालणार नाही. विज्ञान थोर आहे, पण करुणा आणि कर्तव्य ही मूल्ये त्याहूनही थोर आहेत.
COMMENTS