निसर्गाच्या सहवासात निबंध - निसर्ग पर्यटन निबंध मराठी ऐन सरत्या श्रावणात आपणही कोठेतरी २-३ दिवस वर्षासहलीला जाऊयात. अशी सूचना आमच्या वर्...
निसर्गाच्या सहवासात निबंध - निसर्ग पर्यटन निबंध मराठी
ऐन सरत्या श्रावणात आपणही कोठेतरी २-३ दिवस वर्षासहलीला जाऊयात. अशी सूचना आमच्या वर्गशिक्षकांनी मांडताच वर्गात उत्साहाला अगदी उधाण आलं! वेगवेगळ्या ठिकाणांचा विचार पुढे आला पण कोकणातल्या गुहागरजवळची देवराई पहायची आणि थोडेसे समुद्र किनाऱ्यावर भटकायचे हा बेत सगळ्यांनाच फार आवडला.
त्यामुळे आमचा काही प्रवास कोकण रेल्वेने, काही एस.टी.ने, काही पायी असा होणार होता. दादरहून सर्वांनी कोकण रेल्वेने चिपळूणपर्यंत आणि मग एसटीने जायचे ठरले. ठरलेल्या दिवशी आम्ही सर्व विद्यार्थी शाळेच्या मैदानावर जमलो. तिथून दादर स्टेशनवर गेलो. कोकण रेल्वेचा प्रवास सुरू झाला.
Related Essay : वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान निबंध
पावसाचे दिवस होते. सारी सृष्टी सुखात दिसत होती. झाडे, डोंगर, दऱ्या, शेते यांनी हिरवीगार शाल पांघरली होती. हळूहळू ढगांच्या पडद्याआडून सूर्यनारायण वर येत होते. हिरव्या साडीला छानशी सोनेरी किनारच असल्यासारखे दिसत होते. त्या सौंदर्याचे वर्णन करायला शब्दच मुके झाले होते. आणि पाहता पाहता आभाळ भरून आले. आसमंतात ढगांचा विरळ पडदा निर्माण झाला आणि बघता बघता पावसाच्या अवखळ सरी धरणीवर कोसळू लागल्या. श्रावणसरीच त्या, आल्या तशा गेल्या.
ऊन-पावसाचा खेळ पहात पहात आम्ही चिपळूणहून गुहागरला कधी पोचलो ते कळलेच नाही.
दुसन्या दिवशी आम्ही देवराई पहाण्यासाठी निघालो. गप्पा मारत मारत, इकडे तिकडे पहात आम्ही आमच्या वाटाड्याच्या मागे निवांत चालत होतो, तेवढ्यात तो म्हणाला, “ही बघा देवराई तुमच्या शहरी भाषेत वृक्षवृंद" बापरे! किती ही झाडे, मी तर जागच्या जागी डोळे विस्फारून पहातच उभी राहिले.... .
Related Essay : निसर्ग माझा गुरु मराठी निबंध
समोर जे हिरवेगार रान दिसत होते त्याला नुसते वृक्षवृंद कसे म्हणता येईल? त्याला रान म्हणणे सुद्धा चुकच आहे. कारण रानाच्या कित्येक पट येथे वृक्ष आहेत. कमीत कमी चारपाचशे तरी झाडे असतील. राई, पुष्ट आणि भरगच्च आहे. प्रत्येक झार्ड भरपूर उंच आहेत आणि त्याच्या वृक्षसंभारामुळे सूर्यप्रकाश थोपवून धरला जातो. खाली सावल्यांची नुसती जाळीजाळी दिसत होती. देवराईत सूरमाड, फणस,कांचन, बेल, पिंपळ, वड आहेत. काही वडाच्या पारंब्या मातीत रुतून पुन्हा वृक्षामध्ये रुपांतरीत झाल्या आहेत, खुपशा वृक्षांवर लठ्ठ वेलींची वेटोळी माजलेली आहेत. एक एक वेल मांडी एवढी जाड आणि पिलदार. मला वाटलं देवराई कमीत कमी १०० वर्ष तरी जुनी असेल.
देवराईतून परत फिरताना मन अगदी जडावले. शब्द जणू मुके झाले. निसर्गाच्या सहवासातून मानवी महासागरात, प्रदूषणात परत यावसंच वाटत नव्हतं, पण येणे प्राप्तच होते.
COMMENTS