Today, we are publishing राष्ट्रधर्म हाच खरा धर्म निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Nationalism...
Today, we are publishing राष्ट्रधर्म हाच खरा धर्म निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Nationalism Essay in Marathi Language in completing their homework and in competition.
राष्ट्रधर्म हाच खरा धर्म निबंध मराठी - Nationalism Essay in Marathi Language
सर्वधर्म समभाव हे भारताचे वैशिष्ट्य आहे. धर्माच्या नावाखाली भारतात भेदाभेद केला जात नाही. धर्म म्हणजे काय ? प्रश्न सोपा आहे, उत्तरही तेवढेच सोपे. माणसाने कसे जगावे, कसे वागावे हे सांगणारी नियमावली म्हणजे धर्म. सर्वचजण चांगल्या रितीने जगा, समाजात नीट वागा, एकमेकांना सहाय्य करा असे धर्म सांगतात. बरेच जण तसे वागतातही. धर्मानही हेच सांगितले आहे.
Related Essay : देशभक्ति निबंध लेख मराठी
प्रत्येकजण हा त्याची जन्मभूमी, त्याच्या देशामुळे ओळखला जातो. उदाहरणार्थ, इंग्लंडचा इंग्लिश, अमेरिकेचा अमेरिकन, तर भारताचा भारतीय, कुणी त्याला जात विचारत नाही. या संदर्भात एक मजेशीर कथा आठवते. पंडित जवाहरलाल नेहरू उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. जात असताना त्यांच्यासोबत काही भारतीय खिश्चन विद्यार्थी होते. त्यांना वाटले, विदेशात आहे खिश्चन धर्म. मग ते सर्वजण आपल्याला जवळ करतील. कारण आपण आहोत खिश्चन, तेही खिश्चन, पण तसे घडले नाही. विदेशातील लोकांनी त्यांचा देश कोणता हे विचारले. उत्तर आले भारत, म्हणजे तुम्ही भारतीय तर ! भारतीय लोकांशी का नाही तुम्ही मैत्री करत ? त्यांना का तुम्ही दूर ठेवता ? हा प्रसंग पं. नेहरूंनी त्यांच्या आत्मवृत्तात लिहिला आहे.
तुमचा धर्म कोणता हे गौण होते. तुम्ही कुठल्या देशातून आलात हे महत्त्वाचे होते.
काश्मीर विषयी भारताची बाजू राष्ट्रसंघात मांडण्यासाठी न्या छागला याना पाठवायचे ठरले. छागला इस्लामधर्मी आणि पाकिस्तानही इस्लाम राष्ट्र. ते भारताची बाजू मांडण्यात कसूर तर करणार नाहीत ना? अशी शंका अनेकांनी बोलून दाखवली. छागलांनी या असल्या प्रचाराला कृतीनेच उत्तर द्यायचे ठरवले.
Related Essay : मानवता धर्म मराठी निबंध
न्या छागला प्रख्यात विधिज्ञ. राष्ट्रभक्ती नसानसातून भरलेली त्यांनी राष्ट्रसंघात प्रभावशाली भाषण केले. राष्ट्रसंघातील जी काही उत्कृष्ट भाषणे म्हणून ओळखली जातात, त्यात न्या. छागलांच्या या भाषणाचा आवर्जून उल्लेख केला जातो.
न्या. छागला त्यांना दिलेली कामगिरी बजावून मायदेशी परतले, ते संसदेपुढे भाषणासाठी गेले. त्यांना सर्वांनी उभे राहून अभिवादन केले. त्यांच्या विद्वतेची, त्यांच्या राष्ट्रप्रेमाची ही पावतीच नव्हे काय? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्य आठवते.
तुजविण जनन ते मरण.
राष्ट सर्वश्रेष्ठ, बाकीचे सर्व नंतर न्या. छागलांनी हे दाखवून दिलं. अनेकांनी अनेक प्रसंगी ते सर्वांसमोर उकलून दाखवलंय.
Related Essay : सरदार वल्लभ भाई पटेल मराठी निबंध
मानवाने धर्म निर्माण केलेले आहेत. त्यांच्या मुळे आपसात दही का निर्माण व्हावी हे न समाजणारे कोड़े आहे. राष्ट्रधर्मच सर्वश्रेष्ठ धर्म होय.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS