Today, we are publishing नदी बोलू लागली तर मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay on Nadi bolu...
Today, we are publishing नदी बोलू लागली तर मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay on Nadi bolu lagli tar Essay in Marathi in completing their homework and in competition.
नदी बोलू लागली तर मराठी निबंध - Nadi bolu lagli tar Essay in Marathi
दरवर्षी मे महिन्यात मी आजोळी हरिद्वारला जाते. तिथे गेले की मी हमखास गंगातीरी जातेच जाते, दररोज संध्याकाळी गंगेच्या तीरावर आरती केली जाते, दिवे सोडले जातात. तेथे अनेक प्रवासी अगदी परदेशीसुद्धा आलेले असतात. संध्याकाळी तेथले वातावरण अगदी भारून गेलेले असते. त्यामुळे मी एकही संध्याकाळ गंगातीरी गेल्याशिवाय राहात नाही.
परवासुद्धा अशीच आरती झाली. लोकांनी सोडलेले, लांब चाललेले दिवे मी बघत बसले होते. माझी अगदी तंद्रीच लागली होती. तितक्यात मला कोणीतरी म्हणालं, "काय गं, एवढं काय पाहतेस्माझ्याकडे?" बघते तर काया पाण्यातून साक्षात गंगानदीच माझ्याकडे बघून हसत होती. मला म्हणाली, "इतकी का मी तुला आवडते? अगदी दररोज नित्यनियमाने इथे येतेस, तासन्तास बसतेस?" मी म्हटले, "होय ना. माझ्या गावी नदी नाही ना? तिथेही मी तुझी आठवण काढत बसते. खरंच तू किती चांगली आहेस गं!"
"अगं, माझे कामच आहे ते!" नदी बोलू लागली. “भगिरथाने मला स्वर्गातून पृथ्वीवर आणले आणि माझ्या काठाकाठानेच मानवी संस्कृती विकसित होत गेली. माझ्याच अंगाखांद्यावर खेळत-बागडत जवाहर लहानाचा मोठा झाला अन् स्वातंत्र्याची चळवळ यशस्वी करून भारताचा पंतप्रधान झाला. माझ्याच काठावर पिकलेले अन्न खाऊन ही मुले मोठी झाली.
ज्याला कोणीही नाही अशा कोणीही गंगामैय्याकाठी यावे आणि आपले उदरभरण करावे, पण खरं सांगू कोणीही कोणते पाप करावे आणि गंगा नदीत स्वतःला बुचकळून काढून घेऊन शुद्ध करावे. सुरवातीला मला त्यांची कीव येत असे. मी त्यांना त्यांच्या पापक्षालनासाठी मदतही करत असे. पण हळूहळू या पापे करणाऱ्यांची संख्या एवढी वाढली आहे की मी एकटी त्यांना कोणतीही मदत करू शकणार नाही.
माझ्या काठी पहिल्यांदा आश्रयाला फक्त ज्यांना कोणी नाहीत तेच येत होते. पण आता मात्र आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती, रोगजर्जर माणसे यांनाही आणून सोडतात. माणूस फार स्वार्थी झाला आहे. प्रत्येक गोष्टीतून फक्त स्वतःचा फायदाच विचारात घेतो. पण आपणही कोणाचे काही तरी देणे लागतो, थोडेसे आपणसुद्धा दुसऱ्यासाठी झिजावे हे विसरून गेलो आहोत.
हिमालयातून येतांना मी अगदी शुद्ध पाण्याने भरलेली असते. वाहत वाहत येतांना अनेक वस्त, पदार्थ माझ्याबरोबर येतात. पण हे सगळं निसर्गातीलच असल्यामुळे माझ्या शुद्धतेत किंवा पावित्र्यात बाधा येत नाही.
पण स्वार्थाने उंच झालेल्या माणसाने मात्र माझा, माझ्या शुदधतेचा विचार न करता माझ्या पाण्यात कारखान्यातील दूषित पाणी आणून सोडले. गावची घाण आणून सोडली. त्या दूषित पदार्थांमुळे माझ्याच पाण्याचा वास मलाच नकोसा होतोय. तीर्थ' म्हणून वापरल्या जाणाऱ्या माझ्या पाण्याची ही अवस्था या कलीयुगातील माणसांनी केली आहे.
कधी कधी ही घाण, हा वास अगदी नकोसा वाटतो; पण काय करणार? मीच मला कसं सोडून जाणार? भारत सरकारने माझं पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. तेव्हा पुन्हा मला माझा पूर्वीचा निर्मळपणा लाभेल या आशेवरच मी दिवस घालवतेय.
तुला मी नेहमीच इथे आलेली बघते. माझ्या काठावर तुला अशी बसलेली पाहून मला अगदी राहवलंच नाही. म्हणून मी तुझ्यापाशी माझं मन मोकळं केलं. तुझ्याशी बोलून मला फार बरं वाटलं. चल! निघते आता.
COMMENTS