In this article, we are providing Nibandh on Maza avadta shikshak in Marathi language for class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10. Stude...
In this article, we are providing Nibandh on Maza avadta shikshak in Marathi language for class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10. Students can read माझा आवडता शिक्षक निबंध मराठी and use in completing theit homework. If you guys want more marathi essays, then you can our other essays.
माझा आवडता शिक्षक मराठी निबंध - Maza avadta shikshak Marathi Essay
'गुरूविण कोण दाखवील वाट कोण दाखवील वाट?'
रेडिओवर गाणे लागले होते. उद्याच शाळेत गुरूपौर्णिमा साजरी होणार होती. मला आमच्या वर्गशिक्षकांनी त्यानिमित्त भाषणही करावयास सांगितले होते. खरं तर काहीही सुचत नव्हतं पण ते गाण लागलं आणि माझ्या डोळ्यासमोर एकदम जाधवबाईंची मूर्ती साकारली.Related Essay : निसर्ग माझा गुरु मराठी निबंध
इ.५ वीत जेव्हा मी या शाळेत नव्याने आलो तेव्हा साऱ्यांसारखा मी भांबावलेला,भेदरलेला होतो. कुणा शिक्षकाशी बोलायचं म्हणजे खूप भीती वाटायची. जाधव बाई तर माझ्या वर्गशिक्षिकाही होत्या. त्यांच्या प्रेमळ हसण्याने मात्र माझी भीती हळूहळू कमी होत गेली. वरच्या वर्गातील मुले म्हणत “लकी आहात रे ! जाधव बाई आल्या ना तुम्हाला” त्या शब्दांचं महत्व त्या वयांत कळालं नव्हतं परंतु आता मात्र कळतय.
Related Essay : माझी आजी निबंध मराठी मधून
उंच धिप्पाड बांध्याच्या बाईंना पाहिलं की भीतियुक्त आदरच निर्माण होई. त्यांचा नीटनेटकेपणा, लाघवी हसणं समोरच्या विद्यार्थ्याला आपलसं करून टाकी. मराठी व गणित हे दोन विषय बाई शिकवीत. पण दोन्ही तास संपूच नये असे वाटे. मराठीची गोडी मला त्यानीच लावली. वेळोवेळी लेखक, लेखिका, कवी यांची बाई सचित्र माहिती सांगत. त्यांच्या बोलण्याने त्या मंडळींविषयी मनात कुतूहल निर्माण होई. कच्च्या मुलांना बाई अगदी येईपर्यंत गणित समजावून सांगत. त्यामुळे तो विषय आमच्या वर्गाला कधीच अवघड वाटला नाही.
Related Essay : शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात बाईंचा उत्साह आम्हाला लाजवतो. स्नेहसंमेलनात बाई आगळा-वेगळा कार्यक्रम बसवतात. मुलांमध्ये गुण आणि खोड्याही त्या पुरेपुर जाणतात म्हणून त्या साऱ्यांनाच खूप खूप आवडतात.मला तर खूपच.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS